पाहा आपण जे तूप खातो त्याची शुद्धता कशी तपासावी….शुद्ध व भेसळयुक्त तुपातील फरक कसा ओळखावा…जाणून घ्या सोपी पद्धत

पाहा आपण जे तूप खातो त्याची शुद्धता कशी तपासावी….शुद्ध व भेसळयुक्त तुपातील फरक कसा ओळखावा…जाणून घ्या सोपी पद्धत

स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी पारंपरिक भारतीय पदार्थांमध्ये तुपाचा समावेश केला जातो. आयुर्वेदातील माहितीनुसार तुपाच्या सेवनामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.

याव्यतिरिक्त तुपामुळे संपूर्ण शरीर डिटॉक्स होतं आणि आरोग्याला पोषण तत्त्वांचाही पुरवठा होतो. पूर्वीच्या काळी बहुतांश लोक घरामध्येच तूप तयार करत असतं. आता धकाधकीच्या आयुष्यामुळे घरामधील बऱ्याच सर्व गोष्टी बाजारातूनच खरेदी करून आणल्या जातात. पण तूप खरेदी करताना ते शुद्ध आहे की भेसळयुक्त? ही शंका वारंवार मनामध्ये येते.

भेसळयुक्त तूप खरेदी केल्याने पैशांसह आरोग्याचंही नुकसान होतं. बाजारात उपलब्ध असणारे तूप १०० टक्के शुद्ध असते, असा दावा संबंधित कंपन्यांकडून केला जातो. पण खरंतर यामध्ये अनेक प्रकारे भेसळ केलेली असते. भेसळयुक्त तुपाचा वापर केल्यास कित्येक आजारांची लागण होण्याची भीती असते. तूप भेसळयुक्त आहे की नाही? हे तपासून पाहण्यासाठी आपण सोप्या टिप्स जाणून घेऊया…

पहिली पद्धत:-

1-
एका भांड्यामध्ये एक चमचा तूप गरम करत ठेवा. जर तूप लगेचच वितळलं आणि त्यास गडद तपकिरी रंग आला तर हे तूप शुद्ध आहे. तसंच जर तूप वितळण्यास वेळ लागत असल्यास आणि त्यास हलका पिवळा रंग आल्यास तूप भेसळयुक्त आहे, हे लक्षात घ्यावे.

​दुसरी पद्धत:-

2-
तुपामध्ये भेसळ करण्यात आलीय की नाही, हे जाणून घेण्यासाठी नारळाच्या तेलाचाही वापर केला जाऊ शकतो. डबल-बॉयलर पद्धतीचा उपयोग करून एका जारमध्ये तूप वितळवत ठेवा आणि वितळवलेले तूप दुसऱ्या जारमध्ये भरा आणि जार फ्रीजमध्ये ठेवून द्या. जर तूप आणि नारळाच्या तेलाचा थर वेगवेगळ्या स्वरुपात जमा झाला तर तुम्ही वापरत असलेले तूप भेसळयुक्त आहे, हे लक्षात घ्या.

​तिसरी पद्धत:-

3-
टेस्ट ट्युबमध्ये एक मोठा चमचा तूप गरम करत ठेवा. यामध्ये चिमूटभर साखर आणि समान मात्रेत हायड्रोजन क्लोराइड (Hydrogen chloride) मिक्स करा. टेस्ट ट्युबच्या खालील बाजूस गुलाबी किंवा लाल रंग दिसल्यास तूप भेसळयुक्त आहे.

चौथी पद्धत;-

4-
आपल्या हातावर एक चमचा तूप घ्या आणि थोड्या वेळाने ते आपोआप विरघळू लागल्यास तूप शुद्ध आहे, हे समजून जा. तसंच तूप हातावर रगडल्यानंतरही घट्ट होत असेल आणि त्यास कोणत्याही प्रकारचा सुगंध येत नसेल तर तूप भेसळयुक्त आहे.

​पाचवी पद्धत:-

5-
भेसळयुक्त तूप ओळखण्याची आणखी एक पद्धत. तुपामध्ये थोडेसे आयोडीन सोल्युशन मिक्स करा. यानंतर आयोडीन सोल्युशनचा रंग बदलल्यास तुपामध्ये स्टार्चची भेसळ करण्यात आलीय, हे लक्षात घ्यावे. या साध्या-सोप्या पद्धतींची मदत घेऊन आपण शुद्ध की भेसळयुक्त तूप वापरत आहात, हे जाणून घेऊ शकता. आरोग्याचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *