पोटासंबंधी आपल्याला कोणतीही तक्रार असो…करा याप्रकारे ओव्याचे सेवन…आपल्या पोटाच्या आजरासहित अनेक रोग होतील नाहीशे.

पोटासंबंधी आपल्याला कोणतीही तक्रार असो…करा याप्रकारे ओव्याचे सेवन…आपल्या पोटाच्या आजरासहित अनेक रोग होतील नाहीशे.

आपल्याला माहित आहे कि घरातील किचनमध्ये सर्रास वापरला जाणारा मसाल्यातील एक पदार्थ म्हणजे ओवा. ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात त्यामुळेच किचनमध्येच नव्हे तर आयुर्वेदामध्येही ओव्याला खूप मोठे स्थान आहे. ओव्यामुळे केवळ खाण्याचा स्वादच वाढत नाहीत तर पोटासंबंधित अनेक समस्याही दूर होतात. चला तर मग जाणून घेऊ की आपल्याला ओव्याचे कोणकोणते फायदे आहेत.

प्रतीकात्मक चित्र

ओवा हा आजीच्या बटव्यातले पोटदुखीवरचे रामबाण औषध आहे. पण केवळ पोटदुखीवरच नाही तर सर्दी-खोकला शरीरामध्ये भरून राहिलेली थंडी, किंवा सतत नाकातून पाणी गळत असल्यासही आपण ओवा घेतल्याने फायदा होतो.

ओव्यामध्ये शरीरातील हानिकारक तत्वे बाहेर टाकण्यास मदत करणारी, तसेच पोटातील जळजळ रोखणारी तत्वे असतात. तसेच छातीमध्ये जमलेला कफ निघून येण्यासाठी देखील ओव्याचा उपयोग होतो. सायनसचा त्रास असणाऱ्या व्यक्तींकरिताही ओवा गुणकारी आहे.

प्रतीकात्मक चित्र

सर्दी पडसा ह्या वारंवार होणारया आजारापासून बचाव व्हावा यासाठी भारतीय घरांमध्ये ओवा वापरला जातो. एका कपड्यात किंवा डबीत ओव्याचीपूड ठेवून त्याचा सुगंध दिवसातून पाचसहा वेळा घेतल्यास नाकातील बंद पडलेल्या नासा खुलून सर्दीपासून आराम मिळतो. ओव्याचीपूड गुळामध्ये मिसळून त्याचे छोटे छोटे गोल गोळे बनवून रोज सकाळ संध्याकाळी घेतल्यास खोकला व अस्तमाच्या तसेच श्वसनाच्या आजारापासून मुक्तता होते.

बालकांमध्ये व वृद्धामध्ये कफ होणे हि समस्या फारच आम आहे. यावर उपाय म्हणून ओव्याचीपूड गरम पाण्यात किंवा जिरयाची बीज तोंडात चावून त्यावर गरम पाणी पिल्यास भरपूर आराम मिळतो.

प्रतीकात्मक चित्र

हृदयासंबंधी समस्या पासून मुक्तता:-ओव्याचीपूड एका कपभर गरम पाण्यासोबत नियमित सेवन केल्यास हृदयाच्या संबंधी विविध आजारांपासून आपल्याला मुक्तता मिळते. हृदयासंबंधी विविध समस्यांवर ओवा हे एक गुणकारी औषध मानले जाते.

प्रतीकात्मक चित्र

वजन घटविण्यासाठी देखील ओवा उपयुक्त आहे. ओवा घालून ठेवलेले पाणी प्याल्याने शरीराची चयापचय शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील चरबी घटू लागते.

हा उपाय करण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा रात्रभर भिजवून ठेवावा. सकाळी या पाण्यामध्ये एक चमचा मध घालून हे पाणी रिकाम्या पोटी प्यावे. जर आवडत असेल, तर हे पाणी आधी ओव्यासकट उकळून घेऊन मग गाळून घ्यावे आणि थोडे थंड झाल्यावर त्यामध्ये मध घालून प्यावे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *