आणि या एका कारणामुळे हॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शन स्टीवन स्पीलबर्ग यांनी अमरीश पुरी यांना दिला होता हॉलिवूड चित्रपट…पण त्यानंतर जे झाले ते पाहून

आणि या एका कारणामुळे हॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शन स्टीवन स्पीलबर्ग यांनी अमरीश पुरी यांना दिला होता हॉलिवूड चित्रपट…पण त्यानंतर जे झाले ते पाहून

चित्रपट म्हटले की आपल्याकडे एक देखणा अभिनेता आणि सुंदर अभिनेत्री याच्या प्रेम कथेची ‘खिचडी’ असाच मिलाप पाहायला मिळतो, पण या खिचडीला झणझणीत ‘फोडणी’ देण्याचे काम करतो एक व्हिलन अर्थात खलनायक. बॉलिवूडच्या इतिहासावर एक नजर टाकली तर अनेक दमदार व्हिलन आपल्याला पाहायला मिळतील. प्राण, प्रेम चोप्रा आणि अमरीश पुरी हे यातील दिग्गजच.

मोठ्या पडद्यावर अभिनेत्याला तोडीस तोड टक्कर देणाऱ्या किंबहुना अनेकदा त्याच्यापेक्षा जास्त भाव खाऊन जाणाऱ्या अमरीश पुरी यांचा आज वाढदिवस आहे. हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणाऱ्या अमरीश पुरी यांचा जन्म आजच्या दिवशी अर्थात 22 जून 1932 रोजी पंजाबमधील नवांशहर येथे झाला.

‘मिस्टर इंडिया’ मधील ‘मोगॅम्बो’ असो, किंवा ‘घातक’मधील ‘शंभू नाथ’ किंवा ‘डीडीएलजे’मधील ‘बाबूजी’ किंवा ‘करण अर्जुन’मधील ‘ठाकुर दुर्जन सिंह’, अमरीश पुरी यांनी प्रत्येक भूमिका आपल्या दमदार आवाजाने आणि अभिनयाने अजरामर केली.

अमरीश पुरी यांचा 1967 पासून सुरु झालेला सिनेप्रवास शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे 2005 पर्यंत सुरु राहिला. 12 जानेवारी 2005 रोजी मुंबईत त्यांनी अंतिम श्वास घेतला. अमरीश पुरी यांनी मराठी, हिंदीसह कन्नड, पंजाबी, मल्ल्याळम, तेलुगू, तमिळ चित्रपटासह हॉलिवूडमध्येही काम केले आहे. त्यांनी जवळपास 400 पेक्षा जास्त चित्रपटात अभिनय केला.

बॉलिवूडमध्ये आजही त्यांच्या सारख्या खुंखार चेहऱ्याचा, घोगऱ्या पण संवाद फेकीदरम्यान अंगावर काटा आणणारा दमदार आवाजाचा व्हिलन पाहायला मिळत नाही.

मराठी चित्रपटाद्वारे कारकिर्दीचा श्रीगणेशा:-  

खूप कमी लोकांना माहिती आहे की अमरीश पुरी यांच्या कारकिर्दीची सुरुवात मराठी सिनेमापासून झाली होती. 1967 सालच्या ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ या नाटकावर आधारित सिनेमात अमरीश पुरी यांनी रेल्वे डब्यात गाणं गाणाऱ्या एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती.

वयाच्या 39 व्या वर्षी अमरीश पुरी यांनी ‘रेशमा और शेरा’ या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात सुनील दत्त, अमिताभ बच्चन आणि वहिदा रेहमान यांच्या मुख्य भूमिका होत्या. ‘रेशमा और शेरा’ सिनेमात त्यांनी रहमत खान नावाच्या व्यक्तीचे पात्र साकारले होते.

दिग्गज गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत अमरीश पुरी यांच्या आठवणी ताज्या केल्या होत्या. ‘अमरीश पुरी महान अभिनेते आणि महान व्यक्ती होते.

आज लोक त्यांची एक महान अभिनेते म्हणून आठवण काढतात, मात्र माझ्यासाठी ते महान अभिनेते तर होतेच पण एक महान व्यक्ती देखील होते’, असे उद्गार जावेद अख्तर यांनी काढले होते.

ज्यूरासिक पार्क (1993), शिंडलर्स लिस्ट (1993), कॅच मी इफ यू  कॅन (2002) यासारख्या हॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शन स्टीवन स्पीलबर्ग यांनाही अमरीश पुरी यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर भुरळ घातली. ‘माझ्या जीवनात मी अनेक चित्रपट पाहिले, मात्र यासारखा दमदार खलनायक मी कधीच नाही पाहिला’, असे विधान स्टीवन स्पीलबर्ग यांनी अमरीश पुरी यांच्याबाबत केले होते.

कुर्बानी, नसीब, हिरो, अंधाकानून, दुनिया, नगीना, मेरी जंग, सल्तनत, मिस्टर इंडिया, घातक, डीडीएलजे आणि करण अर्जुन या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका आणि त्यांचे डायलॉग आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात.

वयाच्या 73 व्या वर्षी अमरीश पुरीने या जगाला निरोप दिला. मुंबईतील पीडी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *