मुखदुर्गंधी असू शकते ‘या’ आजाराचे लक्षण ….होऊ शकतात हे भयंकर आजार….आजचं सावध व्हा अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल

मुखदुर्गंधी असू शकते ‘या’ आजाराचे लक्षण ….होऊ शकतात हे भयंकर आजार….आजचं सावध व्हा अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल

तोंडाला दुर्गंधी येणे खूप सामान्य बाब आहे. परंतु कधी कधी त्याकडे दुर्लक्ष करणे मोठ्या आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. जर तुमच्या तोंडातून बराच काळ दुर्गंधीयुक्त वास येत असेल, तर तुम्ही डॉक्टरांना भेटणे फार महत्त्वाचे आहे कारण ते मधुमेहाचे लक्षणही असू शकते. तोंडाचा गंध मानवी श्वासोच्छवासाशी संबंधित असतो, म्हणूनच पुष्कळ वेळा तो फुफ्फुसातील कोणत्याही समस्येबद्दलदेखील माहिती देऊ शकतो. आपले शरीर आपल्याला देत असलेले सिग्नल पाहणे फार महत्त्वाचे असते.

मधुमेह:-

जर तुमच्या तोंडाला जास्त काळ वास येत असेल, तर सावधगिरी बाळगा. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मधुमेहाची लक्षणे तोंडाच्या गंधाने लवकर ओळखली जाऊ शकतात. या आजारात हिरड्यांशी संबंधित रोगाचा धोका वाढतो, ज्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते. जर एखाद्यास मधुमेह असेल तर तोंडाला एसीटोनसारखा वास येऊ शकतो. हे रक्तातील केटोनची पातळी वाढल्यामुळे होते. केटोनमध्ये एसीटोन असते. मधुमेहाच्या रुग्णांच्या तोंडात एसीटोनसारखा वास येत असेल, तर ते समजून घ्या की रक्तातील केटोन्सची पातळी वाढली आहे.

मूत्रपिंडाचा आजार:-

तोंडाचा वास मूत्रपिंडाच्या आजारामध्ये सामान्य लक्षण आहे. रक्त प्रवाहात युरियाचे प्रमाण वाढल्यामुळे बर्‍याच लोकांमध्ये तोंडाला दुर्गंध येऊ शकतो. निरोगी मूत्रपिंड युरिया फिल्टर करतात, परंतु जेव्हा ते असे करण्यास असमर्थ असतात तेव्हा तोंडाला दुर्गंधी येते. मूत्रपिंडाच्या आजारामुळे शरीरात चयापचय बदल होतो. यामुळे तोंड कोरडे होते, त्यामुळे श्वास खराब होतो.

फुफ्फुसांचा संसर्ग:-

फुफ्फुसांच्या संसर्गामुळेही श्र्वासांची दुर्गंधी येऊ शकते. जेव्हा फुफ्फुसात संसर्ग होतो तेव्हा श्लेष्म बाहेर पडतो तेव्हा तोंडातून वास येऊ शकतो. ब्राँकायटिस उद्भवते जेव्हा ब्रोन्कियल ट्यूब संक्रमित होते आणि सूज येते. या अवस्थेत, तीव्र खोकला सुरू होतो, ज्यामुळे श्लेष्मा आणि श्वासाचा वास येतो. फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया होणे हेदेखील एक बॅक्टेरिया किंवा विषाणूचा संसर्ग आहे. जेव्हा फुफ्फुसात संसर्ग होतो तेव्हा हवेची थैली फुगते. ती कफने भरली जाते तेव्हा तोंडाला दुर्गंधी येते.

यकृत रोग :

यकृत शरीरात रक्तातील साखर नियंत्रित करते. यकृत जर योग्यरित्या कार्य करत नसेल तर रक्ताच्या प्रवाहात विष तयार होते. आणि तोंडाला वास येऊ शकतो. गॅस्ट्रोएफॅगेअल रिफ्लक्स रोग हा दीर्घकाळ टिकणारा पचनशक्तीचा रोग आहे. जेव्हा पोटातील अ‍ॅसिड पुन्हा अन्ननलिकेमध्ये जाते तेव्हा असे होते. लक्षणे – सहसा छातीत जळजळ होणे, छातीत दुखणे, गिळण्यास त्रास होणे, कोरडा खोकला, आवाज कर्कश होणे इ.

उपचार- मुखदुर्गंधीच्या कारणाप्रमाणे उपचार करावे लागतात.

होमिओपॅथी- अठ्ठावीस वर्षाची हेमा सरकारी इस्पिळात सोल वर्कर म्हणून काम करायची. त्यामुळे तिला अनेक रूग्णांशी भेटण्याचा प्रसंग यायचा. व्यक्तिमत्व आकर्षक असूनसुध्दा हेमाच्या तोंडाला खराब वास यायचा. त्यामुळे रूग्णांशी किंवा रूग्णांच्या नातेवाईकांशी बोलताना हेमाला एक न्यूनगंड वाटायचा. तिला त्यांच्याशी आत्मविश्वासपूर्वक बोलायला संकोच वाटायचा.

तिने भीतभीतच ही समस्या होमिओपॅथीने दूर होईल का असे विचारले. तपासून पाहिले असता हिरडयांना बरीच सूज होती. हिरड्या लालभडक झाल्या होत्या. शिवाय काही ठिकाणाहून रक्तही येत होते. यावरचे औषध फक्त पंधरा दिवस घेतल्याने हेमाचा त्रास बंद झाला. आता ती संपूर्ण आत्मविश्वासाने आपले काम करून शकते.
हेक्ला लावा, मर्कसॉल, क्रिओसोट, लॅकेसीस अशी अनेक औषधे मुखदुर्गंधीवर विविधरित्या उपयोगी आहेत.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *