यामुळेच मयंती लँगर यावेळी अँकरिंग करणार नाहीत….कारण जाणून तुम्ही सुध्दा थक्क व्हालं

यामुळेच मयंती लँगर यावेळी अँकरिंग करणार नाहीत….कारण जाणून तुम्ही सुध्दा थक्क व्हालं

क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलला शनिवारी प्रारंभ झाला आहे. आयपीएलमध्ये क्रिकेटर आणि पंचांची महत्वाची भूमिका असते पण जेव्हा खेळ थांबतो तेव्हा अँकरही या मध्ये मोठे योगदान देतात. येथे तुम्हाला आयपीएलच्या सर्वात सुंदर महिला अँकरबद्दल सांगत आहोत ज्यांच्या सौंदर्याने सर्वांनाचा वेड लावले आहे.

मंदिरा बेदी:-

मंदिरा बेदी ही एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे बहुतेक लोकांनी तिला टीव्हीवर किंवा मोठ्या स्क्रीनवर पाहिलेले आहे. मंदिरा बेदी या 48 वर्षाच्या आहेत परंतु ज्या प्रकारे त्यांनी आपल्या फिटनेसकडे लक्ष दिले आहे ते पाहून त्यांच्या वयाचा अंदाज बांधणे खूपच अवघड आहे. मंदिरा बेदी बऱ्याच काळापासून आयपीएलशी सं-बंधित आहेत. केवळ आयपीएलच नाही तर मंदिरा बेदी अनेक चित्रपटांसह वेब सीरिजमध्येही अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसल्या आहेत.

करिश्मा कोटक:-

आयपीएलमध्ये करिश्मा कोटकनेही तिच्या सौंदर्याने सर्वांना भुरळ घातली आहे. सध्या 38 वर्षाची असलेली करिश्मा आयपीएलच्या सर्वात सुंदर अँकरमध्ये गणली जाते. करिश्मा कोटक हिला आपण फ्रीकी अली या चित्रपटामध्ये बघितले आहे. याशिवाय ती बिग बॉस 6 मध्येही दिसली आहे. आयपीएल विश्वात करिश्मा कोटक हे नाव फार पूर्वीपासूनचं घेतले जाते.

लेखा वॉशिंग्टन:-

लेखा वॉशिंग्टन ही एक दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने अनेक तेलगू कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले आहेचं परंतु तिच्या सौंदर्याने आयपीएलच्या पहिल्या सत्रात सर्वांनाचं प्रेझेंटर म्हणून अगदी मंत्रमुग्ध केले होते. तिचे सौंदर्य सर्वानांच घायाळ करणारे आहे.

पल्लवी शारदा:-

पल्लवी शारदाचे सौंदर्य खूपचं मनमोहक आहे. पल्लवी २०१६ च्या आयपीएलमध्ये यजमान म्हणून दिसली होती. बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याच्यासोबत ती माय नेम इज खान या चित्रपटामध्ये ती कॅमिओ रोलमध्येही दिसली होती. केवळ आयपीएलच नाही तर पल्लवी शारदा ऑस्ट्रेलियाच्या टी -20 लीग बिग बॅश लीगचे होस्ट करतानाही दिसली आहे.

अर्चना विजया:-

अर्चना विजया आयपीएलच्या पाचव्या हंगामात प्रेझेंटर म्हणून दिसली होती. अर्चनाने तिच्या सौंदर्यामुळे सगळ्यांनाच भुरळ घातली होती. केवळ आयपीएलच नाही तर अर्चना विजया अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अँकरिंग करताना दिसल्या आहेत अर्चनाच्या सौंदर्यामुळे आयपीएल पाहणाऱ्यांना अर्चना विजयाबद्दल खूप आशा आहेत की त्यांना पुन्हा आयपीएलमध्ये पहाण्याची संधी मिळेल.

शिवानी दांडेकर:-

शिवानी दांडेकरने आपल्या सौंदर्याने सर्वांनाचं वेड लावले आहे. शिवानी दांडेकर हिला पाहून तिचे वय 40 वर्षे आहे यावर विश्वास ठेवणे कोणालाही थोडं अवघडचं जाईल. शिवानी ही प्रसिद्ध चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरची मैत्रीण देखील आहे. शिवानी दांडेकर ही दीर्घकाळ आयपीएलशी सं-बंधित होती व आपल्या सौंदर्यामुळे तिने सर्वानाच घायाळ केले होते.

रोचैल मारिया राव:-

रोचैल मारिया राव देखील आपल्या सौंदर्याने सर्वांना वेड लावते. आयपीएल सीझन 6 मध्ये ती एक प्रेझेंटर म्हणून पाहिली गेली. मारिया राव 32 वर्षांची असून तिने मिस इंडिया आंतरराष्ट्रीय 2012 चा किताबही जिंकला आहे. आयपीएलच नाही तर मारिया कपिल शर्मा शो आणि झलक दिखलाजा या शोमध्येही दिसली आहे. या व्यतिरिक्त तिने डेंजर प्लेअरमध्येही सहभाग घेतला आहे. तिचे टीव्ही अभिनेता कीथ सिएराशी लग्न झाले आहे.

मयंती लँगर:

मयंती लँगर हे आयपीएलमधील एक सुप्रसिद्ध नाव आहे. गेली अनेक वर्षे ती आयपीएलमध्ये अँकरिंग करताना दिसत आहे आपल्या सौंदर्यामुळे तिने सर्वानाच भुरळ घातली आहे आणि ती प्रसिद्ध क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीची पत्नी देखील आहे. मयंती लेन्गर नुकतीच आई बनली आहे. या कारणास्तव यावेळी आयपीएलमध्ये तिचा सहभाग नसल्यामुळे तिचे चाहते तिला खुपचं मिस करत आहेत.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *