नारळ पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत गुणकारी फायदे…आपल्या अनेक आरोग्यविषयक समस्या होऊ शकतात कायमच्या नाहीशा…फक्त करावेत हे उपाय

नारळ पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत गुणकारी फायदे…आपल्या अनेक आरोग्यविषयक समस्या होऊ शकतात कायमच्या नाहीशा…फक्त करावेत हे उपाय

रोज सकाळी नारळ पाणी पिल्यानं संपूर्ण दिवसभर शरीरात एनर्जी राहते. नारळ पाण्यामध्ये प्रोटिन, खनिज आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे नारळ पाण्याचं सेवन केल्यानं भरपूर आरोग्यादायी फायदे आहेत.

नारळाच्या पाण्यात व्हिटामिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. नियमित नारळ पाणी प्यायल्याने आपली पचनक्रिया सुधारते. त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते. उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होण्यासही मदत होते.

तसेच मधुमेहाच्या रुग्णांना नारळाच्या पाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. होय, नारळाच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. आपल्या सर्वांना माहित आहे की मधुमेह रूग्णांनी गोड फळांचे सेवन,

करू नये कारण गोड फळांचे सेवन केल्याने रक्तातील साखर वाढते, परंतु मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी नारळ पाण्याचे प्रमाण खूप फायदेशीर मानले जाते. जरी नारळाचे पाणी चवीमध्ये गोड असले तरी ती नैसर्गिक साखर आहे. याचा परिणाम शरीराच्या साखरेच्या पातळीवर होत नाही.

मधुमेह:-

ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी नारळाचे पाणी सेवन करणे फायदेशीर मानले जाते. एका अभ्यासानुसार मधुमेहाचे रुग्णांनी नारळाच्या पाण्याचे सेवन केल्यास त्याच्या रक्तातील साखर नियंत्रित राहते.

तसेच नारळाच्या पाण्यात आढळणारे पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी इंसुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास देखील मदत होते, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. तसेच आरोग्य तज्ञांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज 1 कपपेक्षा जास्त नारळ पाण्याचे सेवन करू नये.

मुतखडा:-

नारळ पाण्यात असे गुणधर्म आहेत जे मुतखडा सहज बाहेर काढण्यात मदत करतात. नारळाच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीर हायड्रेटेड राहते, ज्यामुळे मूत्रपिंडाचा दगड होण्यापासून बचाव होतो. आपल्याला आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवायचे असेल तर नारळ पाण्याचे सेवन नक्कीच करावे.

हृदयरोगाचा धोका टाळतो:-

नारळ पाणी आपल्या शरीरातील उर्जा वाढवते. छातीतील जळजळ कमी करते. नारळ पाण्यामुळे रक्तवाहिन्यांमधील आजार, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत होते. नारळ पाण्यामुळे तुमचे वजन कमी होतं. नारळ पाणी शरीरात नको असलेले पदार्थ बाहेर काढते. याचबरोबर दररोज नारळ पाणी पिल्यानं वजनही नियंत्रणात राहते.

नारळपाण्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते:-

नारळपाण्याचं सेवन केल्यास रक्तदाब कमी होण्यास मदत होते. आपणास सांगू इच्छितो कि नारळाच्या पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण पुरेसे आहे, जे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते.

रोगप्रतिकारक यंत्रणा मजबूत बनवते:-

नारळ पाण्यात शरीराला डिटॉक्झिफाय करण्याचे गुणधर्म असतात. तसेच शरीरातील कोणत्याही आजाराच्या विषाणूंशी लढण्यासाठी नारळ पाण्याचे सेवन उपयुक्त ठरते. नारळ पाणी आपल्या शरीरातील पाण्याची पातळी समांतर ठेवण्याचं काम करतं. शरीरातील पेशींतील पोषक तत्वे आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्याचे काम नारळ पाणी करते. नारळ पाण्याचे सेवन शरीरातील कोणत्याही आजाराच्या विषाणूंशी लढण्यासाठी उपयुक्त ठरते.

तसेच

आपल्या पचनक्रियेचा मार्ग स्वच्छ ठेवण्याचे काम नारळ पाणी करते. नारळ पाण्याच्या सेवनाने आपल्या त्वचेची pH व्हॅल्यू एकसमान राहते. जास्त दारु पिल्यानंतर जेव्हा लोकांना हँग ओव्हर होतो तेव्हा नारळपाणी हे हँगओव्हरसाठी एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. अल्कोहोल आपल्या शरीराला निर्जलीकरण करते, तर हे नारळ पाणी शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा भरुन काढतो आणि हायड्रेशन वाढवतो.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *