सुपारी खाण्याचे आरोग्यदायी असे फायदे…वजन कमी करण्यापासून ते कामोत्तेजनेत वाढ…याप्रकारे रोज करत जा सुपारीचे सेवन.. पण जर

सुपारी खाण्याचे आरोग्यदायी असे फायदे…वजन कमी करण्यापासून ते कामोत्तेजनेत वाढ…याप्रकारे रोज करत जा सुपारीचे सेवन.. पण जर

भारतातील अनेक लोक सुपारीचा उपयोग माउथ फ्रेशनरच्या रुपात करतात. सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यामध्ये सुपारीचे खास स्थान राहिले आहे. पूजन सामग्रीमध्ये सुपारीचा उपयोग केला जातो. आयुर्वेदामध्ये सुपारीचे विविध उपाय सांगण्यात आले आहेत.

सुपारीमध्ये कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीनसोबतच मिनरल्सही असतात. त्याचबरोबर टॅनिन, गॅलिक अ‍ॅसिड आणि लिगनीन हे घटक आढळून येतात. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, सुपारीचे खास उपाय आणि फायदे…

दातांसाठी लाभदायक :

३ सुपार्‍या भाजून घ्या. भाजलेल्या सुपार्‍यांचे बारीक चूर्ण तयार करून घ्या. या चुर्णामध्ये ५ थेंब लिंबाचा रस आणि एक ग्रॅम काळे मीठ मिसळून घ्या. दररोज दिवसातून दोन वेळेस या मिश्रणाने दात घासल्यास लाभ होईल.

डायबिटीजमध्ये लाभदायक :

डायबिटीजमुळे अनेक लोकांना तोंड कोरडे पडण्याची समस्या असते. तुम्हालाही हीच समस्या असेल तर तोंडामध्ये सुपारीचा एक तुकडा ठेवा.

दात किडणार नाहीत :

सुपारीमध्ये अँटी-बॅक्टीरिअल गुण असतात. यामुळे सुपारीचा उपयोग दात खराब होय नयेत म्हणून मंजन स्वरुपात केला जाऊ शकतो. दात किडले असतील तर सुपारी जाळून मंजन तयार करून घ्या. दररोज या मंजनाने दात घासल्यास लाभ होईल.

उच्च रक्तदाबामध्ये लाभदायक :

सुपारी खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. एका संशोधनानुसार सुपारीमध्ये उपलब्ध असलेल्या टॅनिन तत्वामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

डिप्रेशन दूर होते : सुपारी खाल्ल्याने तंत्रिका तंत्र उत्तेजित होते. एका संशोधनानुसार सुपारी चघळत राहिल्यास तणाव दूर होतो.

अँटीऑक्सीडेंट गुण – सुपारीमध्ये अँटीऑक्सीडेंट असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ आणि फ्री रॅडिकल्स बाहेर काढण्यास मदत करतात. यामुळे आपले शरीर रोगांपासून दूर राहते.

पण जर आपण सुपारीचे अति सेवन केले तर त्याचे आपल्याला नुकसान सुद्धा होऊ शकते  वैद्यकीय पत्रिकेमध्ये प्रसिद्ध झाले आहे. सुपारी खाणाऱ्या व्यक्तींना नैराश्याची समस्या असू शकते, असा इशारा यात देण्यात आला आहे. सुपारीच्या व्यसनाचे प्रमाण मोठे असलेल्या भारतासारख्या देशाच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण आहे.

जर्नल ऑफ सोशल सायकॅट्री अँड सायकेट्रिक एपिडेमिलॉजी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनामध्ये सतत सुपारी चघळण्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

तैवान, चीन येथील संशोधकांनी हा अभ्यास केला. सुपारी खाणाऱ्या व्यक्तींमध्ये नैराश्य, अस्वस्थता, उच्चरक्तदाब यासह शरीरात मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल असते, असे संशोधनामध्ये दिसून आले. लाल पेशींच्या तुलनेमध्ये पांढऱ्या पेशींचे प्रमाणही अशा व्यक्तींच्या शरीरामध्ये वाढते असल्याचे या अभ्यासात दिसून आले.

सिगारेट व दारूचे व्यसन असलेल्या व्यक्तींमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक असते, असे आतापर्यंतच्या अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहे. मात्र सुपारीबद्दल असे निश्चित संशोधन आतापर्यंत झाले नव्हते. भारतात सुपारी खाण्याचे प्रमाण मोठे आहे.

महाराष्ट्रात ग्रामीण भागात सुपारी खाणे हा महिलांच्याही जीवनशैलीचा भाग आहे. शहरांमध्ये सुंगधी सुपारी खाण्याचे प्रमाण अधिक आहे, याकडे टाटा रुग्णालयाच्या तंबाखूविरोधी मोहिमेचे प्रमुख डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी लक्ष वेधले. त्यामुळे तैवान, चीन या देशांमध्ये केलेला हा अभ्यास भारतासारख्या सुपारीजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या देशांसाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ताजेतवाने वाटते, काम करताना उत्साह येतो, मरगळ झटकली जाते, अशी कारणे पुरुष सुपारी खाण्यासाठी देतात. तर कामाचा फडशा पाडण्यासाठी आपण सुपारी खातो, असे कारण महिला देतात,

असेही या अभ्यासात आढळले. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या व्यसनांमुळे नैराश्य अधिक बळावते. सुपारीचे व्यसन लवकर सुटतही नाही. त्यामुळे सुपारी खाणे हे धूम्रपानाइतकेच धोकादायक असल्याचे ‘हेलिस सेखसारिया इन्स्टिट्युट फॉर पब्लिक हेल्थ’चे संचालक डॉ. पी. सी. गुप्ता यांनी सांगितले.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *