काळे डाग, मोडी, सुरकुत्या, तेलकटपणा, डार्क सर्कलमुळे आहात हैराण? तर आजचं करा टोमॅटोपासून हा उपाय…परिणाम आपल्या समोर असतील

काळे डाग, मोडी, सुरकुत्या, तेलकटपणा, डार्क सर्कलमुळे आहात हैराण? तर आजचं करा टोमॅटोपासून हा उपाय…परिणाम आपल्या समोर असतील

नितळ, सुंदर आणि डागविरहीत असलेला चेहऱ्यामुळेही आत्मविश्वास वाढतो. सुंदर डोळे  देखील आपले सौंदर्य खुलवतात. पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनातील थकवा, ताणतणाव, चिंता, अपुरी झोप यामुळे डोळ्यांच्या आसपास तयार होणाऱ्या काळ्या वर्तुळांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य बिघडते. अनुवांशिक, अपुरी झोप, रात्री उशिरापर्यंत काम, मद्यसेवन, धूम्रपान, जागरण यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होतात.

डोळ्याच्या आसपास असणारी त्वचा अतिशय संवेदनशील असते. या भागात अत्यंत निमुळत्या रक्तवाहिन्या आणि धमण्या असतात. या भागातील रक्तप्रवाहामध्ये अचानक अडथळा निर्माण झाल्यानं डार्क सर्कलची समस्या निर्माण होते. डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करा. डार्क सर्कलपासून सुटका मिळवण्यासाठी टोमॅटोचा फेसपॅक वापरणं फायदेशीर ठरेल. जाणून घेऊया टोमॅटो फेस पॅकची माहिती

बेसन आणि टोमॅटो:-

बेसनमधील गुणधर्म त्‍वचेवरील मृत पेशी काढण्याचे कार्य करतात आणि त्वचा खोलवर स्वच्छ देखील करते. लिंबूमुळे त्वचेचा रंग आणि पोत सुधारण्यास मदत होते.

फेसपॅकची विधि :

दोन ते तीन चमचे टोमॅटोचा रस, दोन चमचे बेसन आणि अर्धा चमचा लिंबूचा रस. एका वाटीमध्ये तिन्ही सामग्री एकत्र घेऊन पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोळ्यांच्या आसपास 20 मिनिटांसाठी लावा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता.

टोमॅटो आणि लिंबू फेसपॅक:-

लिंबूमध्ये नैसर्गिक स्वरुपात ब्‍लींचिंगचे गुणधर्म आहेत. ज्यामुळे डार्क सर्कल कमी होण्यास मदत मिळते. टोमॅटो आणि लिंबूचा रस समान मात्रेत घेऊन मिक्स करा. हा रस आता डार्क सर्कलवर लावा आणि हलक्या हातानं १५ मिनिटांसाठी मसाज करा. यानंतर थंड पाण्यानं चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा.

डोळ्यांची निगा :

डोळ्यांखालच्या सुरकुत्या आणि काळी वर्तुळं कमी करण्यासाठी डोळ्यांवर काकडी किंवा बटाट्याचे काप ठेवा. २० मिनिटं काकडीचे काप डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांचा ताण कमी होण्यास मदत होते. दुसरा उपाय म्हणजे दोन टी बॅग्ज ओल्या करून रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून द्या. सकाळी दहा मिनिटं या बॅग्ज डोळ्यांवर ठेवा. दहा मिनिटांहून अधिक वेळ टी बॅग्ज डोळ्यांवर ठेवू नका.

टोमॅटो, काकडी आणि पुदिन्याचा फेसपॅक:-

काकडीमुळे त्वचा हायड्रेट राहण्यासोबतच त्यावरील पिगमेंटेशन देखील दूर होतं. पुदिन्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो.

विधि :

सर्वप्रथम टोमॅटो, पुदिन्याची पाने आणि काकडीचे तुकडे करून त्याची पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट २० मिनिटांसाठी डोळ्यांच्या आसपासच्या त्वचेवर लावा. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्यानं धुऊन घ्या.

डोळ्यांना द्या विश्रांती :

हल्ली आपल्यापैकी अनेकांचा बराचसा वेळ कम्प्युटरसमोर काम करण्यात जातो. यामुळे डोळ्यांवर भरपूर ताण पडतो. यासाठी प्रत्येकाने दिवसातील काही वेळ स्क्रीनसमोरून बाजूला होऊन डोळ्यांना विश्रांती देण्याचा प्रयत्न करावा.

टोमॅटो आणि बटाट्याचा फेसपॅक:-

वचेचा रंग उजळण्यासाठी बटाट्याचा वापर केला जाऊ शकतो. टोमॅटो आणि बटाट्याचा पेस्ट तयार करून घ्या. हा फेस पॅक डोळ्यांच्या काळ्या वर्तुळावर तीस मिनिटांसाठी लावून ठेवा आणि त्यानंतर डोळे स्वच्छ धुऊन घ्या.

डोळ्यांसाठी ही काळजी घ्या

– सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळ्यांचा थकवा कमी करण्यासाठी पुरेशा प्रमाणात झोप घ्या. यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होईल.- खारट पदार्थांच्या सेवनाने डोळ्यांखाली सूज येते. नियमित व्यायाम आणि भरपूर पाणी पिण्यामुळे डोळ्यांखालील फुगीरपणा कमी होतो.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *