पालकच्या भाजीचे या प्रकारे करा सेवन…आपले कावीळ सारखे अनेक गंभीर रोग यामुळे होतील दूर…फक्त करा हे साधे घरगुती उपाय

पालकच्या भाजीचे या प्रकारे करा सेवन…आपले कावीळ सारखे अनेक गंभीर रोग यामुळे होतील दूर…फक्त करा हे साधे घरगुती उपाय

पालेभाज्यात अनेक सत्व असतात. मात्र पालेभाज्या खा म्हटलं तर आपलं तोंड वेडवाकडं होतं. निरोगी राहण्यासाठी आपला आहार देखील नीट असायला हवा. डॉक्टर नेहमी आहारात पालेभाज्याचा समावेश करा, असं सांगतात. आपण त्या सल्ल्यांना कधीच गंभीर घेत नाही.

पालेभाज्यात सर्वात सत्व असणारी भाजी म्हणजे पालक. आपल्या शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक पालकमध्ये असतात.

ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा शाकाहारी जेवण करायचे असेल, त्यांनी पालक खायला हवी. यात ए, बी, सी आणि के या जीवनसत्त्वांसह अनेक प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी पालक खाणे आरोग्यदायी आहे.

प्रतीकात्मक तस्वीरपालक हृदयविकार, आतड्याच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी भाजी असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. पालक खाल्ल्याने मेंदूच्या कार्यशक्‍तीमध्ये नियमितता येत असल्याचे अमेरिकास्थित कृषी संशोधन केंद्राच्या एका संशोधनात आढळून आले आहे.

पालकमधील व्हिटॅमिन “के’मुळे हाडांचा ठिसूळपणा घटत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.पालकांच्या पानांचा रस आणि नारळाचे पाणी समान मात्रेमध्ये मिसळून सकाळ संध्याकाळ घेतल्यास यामुळे मुतखडा विरघळून बाहेर पडेल.

कच्छ पालकही खूप गुणकारी आहे. यामुळे पाचन तंत्र व्यवस्थित राहते. खोकला किंवा फुप्फुसामध्ये सुज असल्यास पालकाच्या रसाने गुळण्या केल्यास लाभ होईल.

पचनक्रिया सुरूळीत ठेवण्यासाठी पालक खाण्याचा व डाळ पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण हे दोन्ही पदार्थ शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास मदत करतात. पण जर डाळ-पालक खाल्लं तर आपल्याला दोन्हींमधील पोषक तत्व एकत्र मिळू शकतात.

Spinach: Health Benefits, Nutrition Facts (& Popeye) | Live Science

सोबतच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवायची असल्यास हिवाळ्यात दररोज आपल्या आहारात पालकच्या भाजीचा समावेश करावा. डाळ व पालकमध्ये भरपूर प्रमाणात अ‍ॅंटीऑक्सिडंट्स असतात. डाळ-पालकमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते व कोणत्याही गंभीर संक्रमणाला लढा देण्यास शरीराला मदत मिळाल्यामुळे आपण आजारी पडत नाही.

पालकमध्ये व्हिटॅमिन ‘ई’ मोठ्या प्रमाणात आढळते व व्हिटॅमिन ‘ई’ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लाभदायक असते.

इतकेच नाही तर पालकची भाजी चघळण्यामुळे पायरोरिया आणि दातांच्या इतर अनेक समस्यांपासून मुक्तता मिळते. एखाद्याच्या घरात कावीळ असल्याससुद्धा, पालक आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

त्यासाठी आपल्याला रूग्णाला पालक आणि गिलोयचा समान प्रमाणात रस द्यावा लागेल. दररोज दोनदा हे करा, असे केल्याने कावीळ झालेल्या रूग्णाला बर्‍यापैकी विश्रांती मिळू शकते.

एनीमियाचा धोका सर्वात जास्त हा गर्भावस्थेमध्येच निर्माण होतो.आयर्नच्या कमतरतेमुळे ही समस्या होते. यामुळे गर्भवती महिलांच्या शरीरातील आयर्नच्या कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी डाल व पालकचा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो.

यामुळे शरीरातील आयर्नचे प्रमाण नियंत्रित राहून रक्तही अधिक प्रमाणात बनते. तर पालकमध्ये व्हिटॅमिन व डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पालकची डाळ खाल्ल्याने हाडे व स्नायू मजबूत व लवचिक होतात.

तसेच जर तुम्हाला चमकदार व तजेलदार त्वचा हवी असेल तर पालकच्या डाळीत लिंबूचा रस पिळून त्याचं सेवन केल्याने भरपूर फायदे मिळतात. यामुळे त्वचा चमकदार व सुरकुत्याविरहीत दिसते. स्किन पिगमेंट डिसऑर्डरमुळे होणा-या समस्या दूर करण्यासाठी नियमित आपल्या आहारात १ वाटी पालकची डाळ समाविष्ट करा.

ही एका अ‍ॅंटीऑक्सिडंचप्रमाणे कार्य करते व त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करते. मुरूमांची समस्याही पालकच्या डाळीच्या सेवनाने दूर करता येऊ शकते. सुर्याच्या युवी हानीकारक किरणांमुळे स्किन एजिंगचा धोका उद्भवतो. पालकमधील एमिनो अॅसिड स्किन एजिंगच्या समस्येपासून मुक्ती मिळवून देतं व डाळ मृत पेशींची पुन्हा निर्मिती करण्यास लाभदायक ठरते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *