या अभिनेत्यांनी चक्क मंदिरात केली होतीत लग्न ….आपणाला पण आश्यर्य चकित करतील ही लग्न

या अभिनेत्यांनी चक्क मंदिरात केली होतीत लग्न ….आपणाला पण आश्यर्य चकित करतील ही लग्न

आपण बऱ्याच लग्नात लाखो आणि कोट्यावधी रुपये खर्च केल्याचे पाहिले आहे. विवाह हा एक आनंददायक प्रसंग असतो ज्यात जवळजवळ प्रत्येकजण मोकळ्या मनाने पैसे खर्च करतो.

बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या लग्नाबद्दल बोलायचं झालं तर इथं अनेक अभिनेत्याची भव्य लग्ने झाली आहेत, ज्यात पाण्यासारखे पैसे ओतले गेले आहेत. हे सर्व शाही विवाहसोहळे वर्षानुवर्षे लक्षात ठेवले जातील. तर काही बॉलिवूड जोडप्यांनी असे पण म्हटले आहे की त्यांच्या लग्नावर कोट्यावधी रुपये खर्च करण्याऐवजी ते अगदी साधेपणाने लग्न करतील. आज आम्ही तुम्हाला या लेखात अशा जोड्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी मंदिरात सात फेरे घेतले आहेत.

दिव्या खोसला -भूषण कुमार:-

म्युजिक कंपनी टी-सीरीज चे सर्वे सर्वा भूषण कुमारने अभिनेत्री दिव्या खोसला समवेत वयाच्या 21 व्या वर्षी सात फेरे घेतले. दिव्या आणि भूषण यांनी वैष्णो देवी मंदिरात साधेपणाने लग्न केले होते. या दोघांचे लग्न 13 फेब्रुवारी 2005 रोजी अगदी साधेपणाने झाले होते.

इशिता दत्ता – वत्सल सेठ:-

बॉलिवूड अभिनेत्री इशिता दत्ता आणि वत्सल सेठ ही इंडस्ट्रीमधील बरीच लोकप्रिय जोडी आहे. त्यांनी मुंबईतील इस्कॉन मंदिरात अगदी साध्या शैलीत लग्न केले. या लग्नाचे कोणतेही मीडिया कव्हरेज केले नव्हते, त्याने आपल्या लग्नाची बातमी कोणालाही कळू दिली नाही. तथापि, त्याच्या लग्नाला त्याचे जवळचे मित्र अजय देवगन-काजोल आणि सोहेल खान सारख्या काही जवळच्या मित्रांनीच हजेरी लावली होती.

श्रीदेवी – बोनी कपूर:-

सर्वात सुंदर अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर याची प्रेमकथा तुम्हाला सर्वांना माहितच असेल. मजेशीर गोष्ट म्हणजे बोनीने श्रीदेवीशी लग्न करण्यासाठी आपल्या पहिल्या पत्नी मोनाचा विश्वासघात केला होता. बोनी आणि श्रीदेवी यांचे 1996 साली एका मंदिरात लग्न झाले होते.

ईशा देओल-भारत तख्तानी :-

ईशा देओल आणि भारत तख्तानी

धर्मेंद्र आणि हेमाची एकुलती एक मुलगी ईशा देओल यांनी बिजनेस मॅन भारत तख्तानी यांच्यासमवेत मंदिरामध्ये  सात फेऱ्या घेतल्या. ईशाने 29 जून 2012 रोजी भारत यांच्याशी लग्न केले होते.

मोहित सूरी-उदिता गोस्वामी:-

मोहित सूरी-उदिता गोस्वामी

चित्रपट दिग्दर्शक मोहित सूरी आणि बॉलिवूड अभिनेत्री उदिता गोस्वामी यांनीही कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी मंदिरामध्ये लग्न करण्याचा पर्याय निवडला. 2013 मध्ये जुहूच्या इस्कॉन मंदिरात या दोघांनीही सात फेऱ्या  घेतल्या.पण तुम्हाला कदाचित हे माहित नसेल कि लग्नाआधी दोघांनी 9 वर्ष एकमेकांना डेट केले होते.

अभिषेक कपूर आणि प्रज्ञा यादव:-

अभिषेक कपूर हा बॉलिवूड इंडस्ट्रीमधील नामांकित दिग्दर्शकांपैकी एक आहे. चित्रपटाच्या पार्श्वभूमीशी सं-बंधित असलेल्या अभिषेकने २०१५ मध्ये प्रज्ञा यादवसोबत मुंबईतील इस्कॉन मंदिरात लग्न करून घेतले. एगदी साध्या पद्धतीने या दोघांनी लग्न केले होते.

संजय दत्त आणि रिया पिल्लई:-

बॉलिवूडमधील धाकड़ कलाकारांपैकी एक संजय दत्तने आपली दुसरी पत्नी रिया पिल्लई यांचा सोबत मंदिरात लग्न केले होते. त्या दोघांनी वर्ष 1998 मध्ये महालक्ष्मी मंदिरात लग्न केले होते.

कविता कौशिक आणि रोनित:-

कविता कौशिक आणि रोनित
सीरियल एफआयआरपासून घरा घरात लोकप्रिय झालेली टीव्ही अभिनेत्री कविता कौशिकने सोशल मीडियावर तिच्या लग्नाची घोषणा केली होती. कदाचित आपल्याला माहित नसेल पण कविताने जानेवारी २०१७ मध्ये केदारनाथच्या शिव-पार्वती मंदिरात आपला सर्वात चांगला मित्र रोनित विश्वास याचासोबत लग्न केले होते.

शम्मी कपूर आणि गीता बाली:-

लक्झरी जीवनशैली जगणारे शम्मी कपूर यांनी ही मंदिरात लग्न केले होते. खरं तर, दिवंगत अभिनेते शम्मी कपूर यांनी चित्रपट अभिनेत्री गीता बालीसमवेत मुंबईतील बाणगंगा मंदिरात सात फेऱ्या घेतल्या होत्या. १९५५ साली रिलीज झालेल्या रंग रातें चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांचेही प्रेम वाढले आणि मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्या दिवसांत दोघांनाही टॉप क्लास स्टार मानले जात असे.

संदीप आणि जेसी रंधावा:-

प्रख्यात नृत्यदिग्दर्शक संदीप सोपारकर आणि मॉडेल-अभिनेत्री जेसी रंधावाचे मुंबईतील इस्कॉन मंदिरात लग्न झाले होते. वास्तविक, दोघे बरेच दिवस एकमेकांना डेट करत होते आणि मग दोघांनीही साधेपणाने एकमेकांशी लग्न करण्याचा विचार केला.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *