सकाळी ताक पिण्याचे फायदे….आपण कोणत्याही समस्येमुळे त्रस्त असाल…तर फक्त सकाळी करा याप्रकारे ताकाचे सेवन….निरोगी आयुष्य मिळालेच समजा

सकाळी ताक पिण्याचे फायदे….आपण कोणत्याही समस्येमुळे त्रस्त असाल…तर फक्त सकाळी करा याप्रकारे ताकाचे सेवन….निरोगी आयुष्य मिळालेच समजा

दही अथवा ताक शरीरासाठी उत्तम आहे हे तर आपल्याला माहीतच असेलच. कारण अगदी प्राचीन काळापासून जेवणासोबत दही अथवा ताक वाढण्याची पद्धत आहे. विशेषतः जड जेवणासोबत फोडणीचे अथवा मसाला ताक पिणे फायदेशीर ठरते. आयुर्वेदात तर ताकाला अमृतपेय असं म्हटलं जातं.

कारण ताकामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स अर्थात विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. शरीरातील उष्णता आणि दाह कमी करण्यासाठी ताक एखाद्या औषधाप्रमाणे काम करतं.

दह्यात भरपूर पाणी टाकून घुसळून ताक केलं जातं. जरी दह्यापासून ताक तयार होत असलं तरी दही आणि ताक यांचे शरीरावर होणारे फायदे वेगवेगळे असतात. ताक प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहतं. ज्यामुळे शरीराची पाण्याची पातळी संतुलित राहण्यास मदत होते.यासाठीच ताकाचे फायदे जरूर जाणून घ्या. त्यासोबतच जाणून घ्या सकाळी ताक पिण्याचे फायदे काय होतात.

शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो:-

ताक हे थंड पेय असल्यामुळे ते प्यायल्यामुळे शरीराला त्वरीत थंडावा मिळतो. उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. एक ग्लास ताकात जिरे पावडर, पुदिना, कोथिंबीर आणि मीठ मिसळून प्यायल्यामुळे तुमची तहान लगेच भागते. शिवाय बाहेरील उष्ण वातावरणामुळे शरीरात निर्माण झालेली उष्णता कमी होण्यास मदत होते. तुम्ही ताकात एखादा बर्फाचा तुकडा टाकू शकता. मात्र बर्फ न टाकाताही ताक पिण्यामुळे तुमच्या शरीराला  त्वरीत थंडावा मिळू शकतो. बाजारातील कोल्ड ड्रिंकपेक्षा हे नैसर्गिक पेय नियमित पिणे शरीरासाठी नक्कीच लाभदाययक ठरू शकते. ज्या महिलांना मॅनोपॉजच्या काळात अंगातून दाह जाणवतो त्यांनी नियमित ताप पिल्यास त्यांना नक्कीच आराम मिळू शकतो. सकाळी ताक पिण्याचे फायदे चांगले होत असल्यामुळे रात्रीपेक्षा सकाळी ताक पिणे फायदेशीर ठरते.

तसेच ह्यामध्ये भरपूर पाणी टाकून ते बराच वेळ घुसळण्यामुळे ताक निर्माण होते. त्यामुळे दह्यापेक्षा ताकामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. ताकामध्ये नव्वद टक्के पाणी आणि पोटॅशिअमसारखे इलेक्ट्रोलेट असतात.

ज्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीराला सर्व कार्य सुरळीत करण्यासाठी पाण्याची गरज असते. जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा डिहायड्रेशनचा धोका निर्माण होतो. मात्र जर तुम्ही नियमित ताप पित असाल तर तुमचे शरीर सतत हायड्रेट राहते आणि डिहाड्रेशन होत नाही.

त्वचेसाठी उत्तम:-

ताक नियमित पिण्याची सवय फक्त तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या सौंदर्यासाठीही चांगली आहे. कारण ताक पिण्यामिुळे तुमची पचनशक्ती सुधारते. ज्याचा परिणाम असा होतो की तुमच्या शरीरातील सर्व टॉक्सिन्स यामुळे बाहेर टाकले जातात. त्याचप्रमाणे ताकामधील लॅक्टिक अॅसिड तुमच्या त्वचेसाठी उत्तम ठरते.

ज्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा नितळ होते. ताक पिण्यामुळे तुमच्या त्वचेवरील टॅनिंगचे डाग, काळे डाग, पिंपल्सचे व्रण आणि काळसरपणा कमी होतो. ताक तुमच्या त्वचेला आतून मॉस्चराईझ करते, त्वचा चमकदार करते आणि तुम्हाला चिरतरूण ठेवते.

वजन कमी करण्यास मदत करते:-

ताक हे प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे खूप चांगले स्त्रोत आहे. शिवाय त्यात कॅलरिज आणि फॅट्स कमी असतात. ताक पिण्यामुळे तुमचे पोट बराच वेळ भरल्यासारखे राहते.

शिवाय त्यामुळे तुम्हाला हायड्रेटेड आणि उत्साही वाटू लागते. ज्यामुळे तुम्ही दिवसभरात अनावश्यक पदार्थ कमी  प्रमाणात खाता. ज्याचा परिणाम तुमच्या वजनावर होतो. ज्यांना झटपट वजन कमी करायचं आहे त्यांनी त्यांच्या डाएटमध्ये ताकाचा  समावेश जरूर करावा. कारण ताकामुळे तुमचे वजन तर कमी होतेच शिवाय तुमचे  पोषणही योग्य प्रमाणात होते.

हाडे आणि दातांसाठी उत्तम:-

ताक हे दह्यापासून तयार केले जाते. ज्यामुळे ताकात भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतात. एक कप ताकामध्ये जवळ जवळ शंभर मिग्रॅ कॅल्शिअम असतात. तुमच्या हाडांच्या आणि दातांच्या वाढीसाठी शरीराला सतत कॅल्शिअमची गरज असते. कारण त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.

जे लोक नियमित ताक पितात त्यांना  हाडांचे विकार अथवा दाताची दुखणी कमी प्रमाणात होतात. हाडे आणि दातांप्रमाणेच रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी, स्नायू मजबूत होण्यासाठी आणि ह्रदयाची स्पंदने व्यवस्थित चालू राहण्यासाठी शरीराला कॅल्शिअमची गरज असते. ताकामधून तुमच्या शरीराला लागणाऱ्या कॅल्शिअमचा योग्य पूरवठा केला जातो.

प्रतिकारशक्ती चांगली राहते:

कोरोनाच्या भितीचा प्रभाव आजही कमी झालेला नाही. कोरोनाला बळी पडणाऱ्या लोकांची प्रतिकार शक्ती कमी असल्याचं अनेक संशोधनात आढळलं आहे. यासाठी या काळात घरातील प्रत्येकाची प्रतिकारशक्ती मजबूत असायला हवी. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ताक अतिशय उपयुक्त आहे. कारण ताकामुळे तुम्हाला ऊर्जा तर मिळतेच शिवाय आजारपणातून वाचण्यासाठी तुमच्या शरीरात पुरेशी प्रतिकारशक्तीही निर्माण होते. 

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *