कधीच चुकून सुद्धा गरोदर स्त्रियांनी करू नये या गोष्टीचे सेवन….अन्यथा आपल्या गर्भात असणाऱ्या बाळाला धोका झालाच समजा…त्यामुळे त्वरित सावध व्हा.

कधीच चुकून सुद्धा गरोदर स्त्रियांनी करू नये या गोष्टीचे सेवन….अन्यथा आपल्या गर्भात असणाऱ्या बाळाला धोका झालाच समजा…त्यामुळे त्वरित सावध व्हा.

 

गर्भधारणेदरम्यान स्त्रियांना स्वत: ची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, कारण यावेळी गर्भाशयात असणाऱ्या बाळाची काळजी घेतली पाहिजे तसेच आपल्या शरीराला देखील पोषण मिळणे आवश्यक आहे. म्हणून महिलांना  यावेळी पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.

त्यामुळे गर्भधारणेदरम्यान प्रत्येक गोष्ट अगदी काळजीपूर्वक खायला हवी, कारण काही निरोगी अन्नही आपणास हानी पोहोचवू शकते. गरोदरपणात चांगला संतुलन आहार घ्यावा, परंतु खाताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, अन्यथा ते आपल्यासाठी आणि आपल्या गर्भासाठी हानिकारक ठरू शकतात. गर्भधारणेदरम्यान कोणत्या गोष्टी खाऊ नयेत ते आज आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.

प्रतीकात्मक चित्र

पपई:-पपईमध्ये अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते, परंतु गर्भधारणेदरम्यान पपई खाणे टाळले पाहिजे. कारण पपई खाल्ल्याने अकाली प्रसूती होण्याची भीती असते. त्यामुळे आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच पपईचे सेवन करावे.

तसेच भाज्या आपल्यासाठी आणि बाळासाठी खूप पोषक असतात ह्यात काही शंकाच नाहीपरंतु आपल्याला आश्चर्य वाटेल की जगातील ७८लोक फळे आणि भाज्या न धुता खातातअस्वच्छ फळे आणि भाज्यांवर हानिकारक कीटकनाशके आणि जंतुनाशके तर असतातच परंतु त्यावर टॉक्सोप्लास्मा गोंडी आणि लिस्टेरिया सारखे रोगकारक घटक सुद्धा वाढत असतातन धुतलेली मोड आलेली कडधान्येकोबीलेट्युस ह्या काळात टाळले पाहिजेत.

प्रतीकात्मक चित्र

कच्ची किंवा मऊ उकडलेली अंडी:-

अंडी जेव्हा योग्यरित्या शिजवलेली असतात तेव्हा ती मोहक आणि खावीशी वाटतातआपल्यापैकी बऱ्याच जणांना मऊ उकडलेली आणि कमी शिजवलेली अंडी आवडताततथापिगरोदरपणात कमी शिजवलेली अंडी खाणे टाळावे कारण त्यांना साल्मोनेलाचा संसर्ग झालेला असू शकतो.

ह्या जिवाणूमुळे उलट्या आणि जुलाब होतातज्या अन्नपदार्थांमध्ये कच्च्या अंड्याच्या वापर झाला आहे उदाकस्टर्डमुसी ते पदार्थ सुद्धा खाण्याचे टाळले पाहिजेगरोदरपणात अंडी खाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे अंड्याचा बलक चांगला घट्ट होईपर्यंत अंडी शिजवणेकिंवा मग अंडे नसलेली सलाड ड्रेसिंग्समेयॉनीज आणि अंडी नसलेले खाद्यपदार्थ निवडणे हा दुसरा पर्याय आहेतुम्ही अंड्यांपासून संसर्ग होऊ नये म्हणून पाश्चराईज केलेली अंडी खाऊ शकता.

प्रतीकात्मक चित्र

गर्भधारणेदरम्यान आपल्या आहारात फळांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो, परंतु काही फळे गरोदरपणात खाऊ नयेत. पोषक आणि व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले अननस खूप आरोग्यदायी मानले जाते, परंतु गर्भवती महिलांनी त्याचे सेवन टाळले पाहिजे कारण अकाली प्रसूती होण्याची भीती त्यामुळे असते.

तसेच आपण म्हणाल की गरोदरपणात फळांचा रस घेणे हा नेहमीच चांगला पर्याय असतोपरंतु कच्ची फळे आणि भाज्यांमध्ये हानिकारक विषाणू आणि जिवाणू असण्याचा खूप जास्त धोका असतो. त्यामुळे फळांचा रस घेण्याची आपली इच्छा आपण घरी पूर्ण करू शकता जेणेकरून आपल्याला स्वच्छ आणि ताजा फळांचा रस मिळेल.

जर आपण हवाबंद डब्यातील ज्यूस आणले तर ते पाश्चराईझ केलेले आणि फ्रिज मध्ये ठेवलेले आणावेत. तसेच आपली प्रतिकार प्रणाली मजबूत नसते आणि पाश्चराईझ न केलेल्या ज्यूस मध्ये असलेल्या जिवाणूंमुळे संसर्ग होण्याचा धोका असतो.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *