अयोध्येत बांधण्यात येणारी मशिद दिली एका कट्टर हिंदू व्यक्तीकडे …पुन्हा येणार आमने-सामने

अयोध्येत बांधण्यात येणारी मशिद दिली एका कट्टर हिंदू व्यक्तीकडे …पुन्हा येणार आमने-सामने

आपल्याला माहीत असेल की यूपीच्या धन्नीपुरात बाबरी मशिदीच्या पर्यायी बांधकामासाठी यूपी सरकारने पाच एकर जमीन दिली आहे. या जागेवर धनीपूर मशिद कॉम्प्लेक्स तयार करण्यात येणार असून येथे संग्रहालय कम्युनिटी किचन लायब्ररी यासारख्या वास्तू बांधल्या जातील. त्याचबरोबर या ठिकाणांचे क्यूरेटर म्हणून प्राध्यापक पुष्पेश पंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जे एक कट्टर हिंदू आहेत.

कोण आहेत पुष्पेश पंत:-

प्रोफेसर पुष्पेश पंत हे भारताचे सुप्रसिद्ध आणि आदरणीय प्राध्यापक फूड एक्सपर्ट आणि इतिहासकार आहेत. ते दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय रिलेशन विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुखही आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय विषयांवर त्यांनी लेखन व मार्गदर्शन केले आहे आणि बर्‍याच मासिकांकरिता लेखन ही केले आहे.

प्राध्यापक पुष्पेश पंत यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत आणि २०११ मध्ये प्रकाशित केलेले त्यांचे इंडिया: द कूकबुक हे पुस्तक बरेच प्रसिद्ध झाले. न्यूयॉर्क टाइम्सने हे पुस्तक २०११ चे सर्वोत्कृष्ट कूकबुक म्हणून डब केले होते. फूड एक्सपर्ट म्हणून त्यांनी अनेक टीव्ही कार्यक्रमही केले आहेत.

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित:-

प्राध्यापक पुष्पेश पंत यांच्या योगदानाचा विचार करता सन २०१६ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. त्याच वेळी त्याच्यावर एक मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ज्या अंतर्गत ते मशिदीत बनवलेल्या वास्तूची काळजी व देखभाल करणार आहेत. ही जबाबदारी मिळाल्यानंतर पुष्पेश पंत म्हणाले की मशिदीच्या आत एक कम्युनिटी किचन तयार केले जाईल. या कम्युनिटी किचनमध्ये 365 प्रकारचे व्हेज आणि नॉन-व्हेज बनवण्याची योजना केली आहे. मशिदीच्या सामुदायिक स्वयंपाकघरात गरीबांसाठी अन्न तयार केले जाईल व ते कमी खर्चात दिले जाईल.

विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी रामजन्मभूमीवर मंदिर बांधण्याच्या बाजूने निकाल दिला होता. कोर्टाने आपल्या निकालामध्ये यूपी सरकारला बाबरी मशिदीच्या पर्यायी बांधकामासाठी जमीन देण्यास सांगितले होते. त्यानंतर यूपी सरकारने मस्जिद तयार करण्यासाठी धन्नीपुरात पाच एकर जमीन दिली. या ठिकाणी मशिदीचे बांधकाम लवकरच सुरू केले जाईल. मशिद कॉम्प्लेक्समध्ये संग्रहालय कम्युनिटी किचन आणि लायब्ररी यासारख्या वास्तू तयार केल्या जाणार आहेत.

या ठिकाणी बांधलेल्या मशिदीचे नाव बाबरी मस्जिद असे असणार नाही तर ते धन्नीपूर मशीद म्हणून ओळखले जाईल. वास्तविक राम मंदिर आणि बाबरी मशिदीवरील वादामुळे या बांधलेल्या मशिदीचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *