जाणून घ्या डाळिंबाचे आपल्या आरोग्यासाठी असणारे असंख्य फायदे…पुरुषांसाठी तर वरदान आहे डाळींब…आपले त्या प्रकारचे रोग सुद्धा होतात ठीक.

जाणून घ्या डाळिंबाचे आपल्या आरोग्यासाठी असणारे असंख्य फायदे…पुरुषांसाठी तर वरदान आहे डाळींब…आपले त्या प्रकारचे रोग सुद्धा होतात ठीक.

डाळिंब हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. डाळिंब खाल्याने अनेक आजारांवर नियंत्रण मिळवता येते. पूर्वी भारतात अफगाणिस्तानातून डाळींब येत असत. पण आता महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यात विशेषत: महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या सोलापूर, नगर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात डाळिंबाची लागवड मोठया प्रमाणावर केली जात आहे.

डाळिंबामध्‍ये व्हिटामिन्‍स ए, सी, ई, बरोबरच फ्लोरीक अ‍ॅसीड या रासायनिक घटका बरोबराच अँटी ऑक्‍सीडेंट मोठ्या प्रमाणात आहेत . चला तर मग या लेखाद्वारे जाणून घेऊ कि आपल्याला डाळिंबाचे कोणकोणते फायदे आहेत.

डाळिंबचे सेवन अशक्तपणा - सूचक चित्र असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे

एनिमिया रुग्णांसाठी फायदेशीर:-
एनिमिया असणा-या रुग्णांना डाळिंबाचे सेवन खूप फायदेशीर ठरते. डाळिंबाचे दररोज सेवन केल्यास आपल्या शरीरातील रक्ताची पातळी वाढू लागते. एनिमियाच्या रूग्णांनी डाळिंबाचा आपल्या आहारात समावेश करावा. डाळिंबाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

डाळिंब - सूचक चित्र खाल्ल्याने पचनक्रियेवर मात केली जाते

पचनशक्ती वाढते:-

डाळींबातील औषधी तत्व हृदय, पोट, यकृत यांचं कार्य व्यवस्थित चालण्यास मदत करतात. डाळिंब खाल्ल्याने भूक लागण्याचे प्रमाण वाढते, वजन कमी करण्यासही डाळिंब ज्युस महत्वाचा ठरतो, उन्हाळ्यात डाळिंब ज्यूस अधिक महत्वाचा ठरतो. तहान कमी करतो. पचनशक्ती वाढते. त्वचा निरोगी राखण्यासही डाळिंब महत्वाची भूमिका बजावतं.

डाळिंबाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती - सूचक चित्र देखील बळकट होते

मधूमेहच्या रुग्णांसाठी उपयुक्त-
डाळिंब मधुमेह, हाडांच्या समस्या दूर ठेवण्यासाठी उत्तम औषध मानले जाते. तसेच याच्या सेवनाने जळजळ होणे, ताप, घसा आणि तोंडाच्या समस्या यापासूनही आराम मिळतो. याचबरोबर हृदयाचा आजार असणाऱ्या रुग्णांसाठी देखील अतिशय फायदेशीर आहे.

हृदयातील रूग्णांनी डाळिंबाचा आहारात समावेश करावा - सूचक चित्र

ह्रदय विकार होत नाही:-
डाळिंबामुळे आपल्या शरीरात पसरणाऱ्या फ्री रॅडीकल्सचा रक्त धामन्यांचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होते. कोलेस्ट्रेरॉलचेही प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे डाळिंबाचा हृदयविकाराच्या रुग्णांना फायदा होतो.

अल्झायमर होत नाही-
अल्झायमर सारख्या आजारामध्ये विसरभोळेपणा वाढण्याचा त्रास अधिक असतो. अशावेळी डाळिंब खाणे हितकारी ठरते.

हार्मोन्स नियंत्रणात ठेवते-
डाळिंबाचा रस ताण वाढवणारे हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे डाळिंब खाणे फायदेशीर ठरते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *