आपल्या डायट मध्ये करा अननसचा समावेश… आणि या बारा रोगांपासून राहा सदैव दूर…होतील हे चमत्कारिक फा-यदे

आपल्या डायट मध्ये करा अननसचा समावेश… आणि या बारा रोगांपासून राहा सदैव दूर…होतील हे चमत्कारिक फा-यदे

अननस हे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी ने भरपूर प्रमाणत समृद्ध असते. तसेच अननसची चव सुद्धा खूप गोड असते. तसेच यात भरपूर मॅग्नेशियम असते. हे प्रामुख्याने मान्सून आणि हिवाळ्यातील फळ मानले जाते. हे खायला खूप मजेदार आणि चवदार असते. हे फळ, कोशिंबीर आणि मिष्टान्न म्हणून देखील वापरले जाते. अननस हे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. चला तर मग अननसच्या अशा काही गुणांबद्दल आपण जाणून घेऊ की ज्याद्वारे आपण पूर्णपणे निरोगी राहाल.

अननसमध्ये व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते.
हाडे मजबूत करण्यास अननस आपल्याला मदत करते.
तसेच सर्दी आणि खोकला यांच्यापासून आपण दूर राहतो.

कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी याचे सेवन आपण नेहमी करू शकतो.
तसेच याचे सेवन केल्यास आपले डोळे सुद्धा तेज होतात.

बर्‍याच वेळा आपण सर्दीमुळे अननस खाण्यास टाळाटाळ करतो परंतु तसे करून आपण आपले स्वतःचे नुकसान करतो कारण हिवाळ्याच्या मोसमात अननस खूप फायदेशीर आहे. कारण त्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणत असते आणि थंडीच्या दिवसात व्हिटॅमिन सी चा उपयोग आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होऊ शकतो.

रक्त परिसंचरण नीट होते – रक्ताभिसरण योग्यरित्या होण्यासाठी आपल्याला पोटॅशियमयुक्त आहार सेवन करणे खूप आवश्यक असते आणि अननसमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते ज्यामुळे आपले रक्त परिसंचरण ठीक होते.

डोळ्यांची दृष्टी सुधारते- अननसमध्ये उपस्थित असलेल्या विशेष गुणांमुळे आपल्या डोळ्याची दृष्टी सुधारते. भूतकाळात झालेल्या काही वैज्ञानिक संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे. त्यामुळे अननस आपल्या डोळयांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

हाडे बळकट होतात – अननसामध्ये असणारे मॅग्नेशियम, हाडे मजबूत करण्याबरोबरच शरीरात ऊर्जा देखील प्रदान करते.

मुतखड्याचा त्रास दूर होतो – ज्या लोकांना मुतखड्याचा त्रास होतो त्यांनी दररोज एक ग्लास अननसाचा रस पिला तर त्यांना त्वरित आराम मिळू शकतो.

त्वचा तेजस्वी बनते – जर अननसचे सेवन आपण नियमित केले तर यामुळे आपल्या चेहर्‍यावरील सुरकुत्या दूर होतात आणि आपला चेहरा तेजस्वी व सुंदर बनतो.

वजन कमी करण्यात उपयुक्त – वजन वाढल्याची तक्रार करणारे लोक या फळाचा वापर करू शकतात. याचा मोठ्या प्रमाणात फायदा आपल्याला होऊ शकतो. जर आपण काही दिवस अननसचा रस पिला तर आपल्याला याचा नक्कीच फायदा वजन कमी करण्यासाठी होऊ शकतो.

शरीराला ऊर्जावान ठेवते – अननस मध्ये असणारे जीवनसत्त्वे आणि इतर घटक आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करतात. कधीकधी असे घडते की आपल्याला जेवण करायला वेळ मिळत नाही, अशा परिस्थितीत आपण अननस खाऊ शकतो. दिवसाला आपल्याला ७३ टक्के मॅग्नेशियम एकटे अननस आपल्याला देऊ शकते. याद्वारे आपण ऊर्जावान राहू आणि आपल्या शरीराला आवश्यक पोषक पदार्थ देखील मिळतील.

रोग प्रतिकारशक्ती बळकट होते – जर आपल्या शरीरात रोग प्रतिकारशक्ती कमी असेल तर आपण अननसचे सेवन करणे आवश्यक आहे. अननस रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि त्याच वेळी हंगामी रोगांशी लढण्याची क्षमता देखील वाढवते.

शरीराच्या पाचन तंत्राची क्षमता वाढते – अननस पचन प्रक्रियेसाठी उत्कृष्ट फळ मानले जाते. अननसमध्ये फायबर असते जे पचन आणि आतड्यांच्या हालचाली प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ज्यामुळे पचन क्षमता मजबूत राहते.

थकवा दूर होतो – अननस मध्ये मुबलक खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. म्हणूनच असे म्हणतात की जर आपल्याला अशक्तपणा असेल तर अननसचे सेवन करावे यामुळे आपल्याला त्वरित ऊर्जा मिळते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *