डेंग्यू,कावीळ, मधुमेह, हृदयरोग, पोटाचे रोग, अशक्तपणा असे कोणतेही रोग असो…फक्त याप्रकारे या फळांचे करा सेवन…त्वरित रोगापासून आराम मिळालाच समजा

डेंग्यू,कावीळ, मधुमेह, हृदयरोग, पोटाचे रोग, अशक्तपणा असे कोणतेही रोग असो…फक्त याप्रकारे या फळांचे करा सेवन…त्वरित रोगापासून आराम मिळालाच समजा

आहारामध्ये फळांचा समावेश करणे अतिशय आवश्यक आहे. निरोगी आरोग्यासाठी नियमित एक किंवा दोन फळांचं सेवन करावं. आपल्या आरोग्याशी संबंधित कित्येक समस्यांवर नैसर्गिक औषधोपचार म्हणून फळे खाणे फायदेशीर ठरते. तसंच वेगवेगळ्या आजारांपासून आपला बचाव देखील होतो. यापैकी एक आरोग्यवर्धक फळ म्हणजे कीवी या फळामध्ये आरोग्यास पोषकतत्त्वांचा प्रचंड प्रमाणात साठा आहे.

डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांना कीवी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण डेंग्यूमुळे रक्तीतील प्लेटलेट्सची संख्या प्रचंड प्रमाणात कमी होते. कीवीतील औषधी गुणधर्मांमुळे रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यास मदत मिळते. डॉक्टर देखील आहारामध्ये कीवी फळाचा समावेश करण्याचा सल्ला देतात.

कीवी फळाच्या सेवनामुळे आरोग्यासोबतच आपल्या त्वचेलाही पोषण घटकांचा पुरवठा होतो. चवीला आंबट-गोड असणारं कीवी फळ खाल्ल्याने आरोग्याला मिळणारे लाभ जाणून घेऊया.

प्रतीकात्मक चित्र

कीवी फळामध्ये ल्युटिन नावाच्या पौष्टिक तत्त्वाचा समावेश आहे. हा घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. रेटिना सुरक्षित ठेवण्यासोबत डोळ्यांशी संबंधित आजारांपासून बचाव करण्याचे कार्य ‘ल्युटिन’ करते. डोळ्यांच्या आजारांचा धोका कमी करण्यासाठी आहारात कीवीचा समावेश करा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कीवीचे सेवन करणं फायदेशीर ठरेल.

प्रतीकात्मक चित्र

कीवी फळातील पोषकतत्त्वांमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. कारण कीवीमध्ये भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ असते. हे घटक रोगप्रतिकारक पेशी मजबूत करून घातक विषाणूंविरोधात लढण्यासाठी शरीराची शक्ती वाढवण्याचं काम करतात. याव्यतिरिक्त कीवी फळामध्ये व्हिटॅमिन ई, कॅरोटिनॉइड, पॉलिफेनोल आणि फायबरचे घटक देखील अधिक प्रमाणात आहेत. यामुळे कित्येक आजारांपासून आपलं संरक्षण होण्यास मदत मिळते.

प्रतीकात्मक चित्र

रक्तदाब नियंत्रणात असेल तर कित्येक प्रकारच्या हृदयविकारांपासून आपलं संरक्षण होण्यास मदत मिळते. सोबतच स्ट्रोकचा धोका देखील कमी होतो. कीवी फळामध्ये बायोअ‍ॅक्टिव्ह नावाचं कम्पाउंड आहे.

यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास बरीच मदत मिळते. रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी नियमित सकाळी कीवी फळाचे सेवन करावे. कीवी फळामुळे आपले वजन देखील नियंत्रणात राहते. वजन कमी करणाऱ्यांनी आपल्या डाएटमध्ये कीवीचा समावेश करावा. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं.

प्रतीकात्मक चित्र

कीवी फळ नियमित खाल्ल्यास आपल्या शरीरातील विषाक्त पदार्थ निघून जाण्यास मदत होते. यामुळे आपली त्वचा चमकदार होते आणि सुरकुत्या पण दूर राहतात.

पोटातील उष्णता कमी करण्याचं काम पण हे फळ करतं. अल्सर सारख्या गंभीर समस्यांपासून आपली सुटका होते. यात आयरन आणि फॉलिक ऍसिड पण असतं, त्यामुळे गर्भवती महिलांसाठी कीवी स्वर्गीय फळापेक्षा काही कमी नाही.

कीवीच्या गुणांची यादी खूप मोठी आहे. डायबिटीजच्या रुग्णांसाठी कीवीचं नियमित सेवन रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण कमी करतं आणि सारखेचं प्रमाण योग्य राखतं.जर आपल्याला गुडघ्याचं दुखणं असेल, हाडांमध्ये दुखत असेल तर आपण आपण कीवीचा आपल्या आहारात अवश्य समावेश करावा.

कीवीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असतं. असा दावा केला जावू शकतो की, केळातही तेव्हढंच पोटॅशिअम असतं जितकं की कीवीमध्ये, मग तरीही कीवी का खायचं? तर उत्तर आहे कॅलरीज. आज आपण जेवणात कॅलरीज मोजतो, म्हणून कीवी फिटनेस फ्रिक लोकांची पहिली पसंत ठरतं.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *