या अभिनेत्रींनी तरुण वयातच दिला होता या जगाला निरोप…पण एकीचा मृत्यू तर होता अगदी रहस्यमय की तिची ओळख …

या अभिनेत्रींनी तरुण वयातच दिला होता या जगाला निरोप…पण एकीचा मृत्यू तर होता अगदी रहस्यमय की तिची ओळख …

आपल्याला माहित असेल कि बॉलिवूडची सुरुवात 1913 मध्ये झाली होती आणि हिंदी सिनेमा आज तागायत यशस्वीरित्या चालू आहे, आपल्या अनोख्या आणि आकर्षक अशा चित्रपटामुळे बॉलिवूडने संपूर्ण जगाला वेड लावले आहे. त्याचबरोबर आजच्या या काळात टॉलीवूडही काही कमी नाही आहे.

आता तर दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही बॉलिवूडशी स्पर्धा सुरू आहे पण आज आम्ही तुम्हाला साऊथ फिल्म इंडस्ट्रीच्या काही सुंदर अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत, ज्यांनी अगदी लहान वयातच या जगाला निरोप दिला, पण लोक अजूनही या अभिनेत्रींचे चांगलेच चाहते आहेत आणि आज सुद्धा त्याचे चित्रपट तसेच गाणी अगदी आवर्जून पाहत असतात, चला तर मग आज त्या अभिनेत्रींविषयी जाणून घेऊया.

प्रत्युषा:-

या यादीमध्ये अभिनेत्री प्रत्युषाचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. केवळ 20 वर्षांच्या तरुण वयातच प्रत्युषाने या जगाला निरोप दिला, 2002 मध्ये प्रत्युषाने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. तेलुगू फिल्म,

अभिनेत्री प्रत्युषा ही तिचा बालपणीचा मित्र सिद्धार्थ रेड्डीच्या प्रेमात होती आणि २००२ मध्ये या दोघांनीच एकत्र येऊन विष प्यायले होते. पण यावेळी सिद्धार्थला जीवनदान मिळाले, तर प्रत्युषा या जगातून निघून गेली. असं म्हणतात की, सिद्धार्थचे कुटुंबिय या नात्याच्या विरोधात होते आणि यामुळेच या दोघांनी हे मोठे पाऊल उचले होते.

सौंदर्य:-

सौंदर्य ही दक्षिण भारतीय चित्रपटांतील एक अतिशय सुंदर अभिनेत्री होती. पण दिनांक 17 एप्रिल 2004 मध्ये सौंदर्य ही भारतीय जनता पार्टी आणि तेलगू देशम पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ करीमनगरला जात होती.

पण ज्या खाजगी विमानाने सौंदर्य जात होती ते विमान काही मिनिटांतच क्रॅश झाले आणि यामध्येच सौंदर्यचा दुर्दैवी अंत झाला. या विमानात सौंदर्याव्यतिरिक्त त्यांचे बंधू अमरनाथ, हिंदु जागरण समितीचे सचिव रमेश कदम आणि पायलट जॉय फिलिप हे देखील उपस्थित होते. या अपघातात या चौघांचा देखील मृत्यू झाला होता

दिव्या भारती:-

आपल्याला माहित असेल कि दिव्या भारती हिने अगदी लहान वयातच हिंदी चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावले होते. पण ५ एप्रिल १९९३ रोजी दिव्याने अचानक या जगाचा निरोप घेतला असे म्हणतात कि फ्लॅटच्या खिडकीतून पडून दिव्याचा मृत्यू झाला होता, ज्या दिवशी दिव्याचा मृत्यू झाला, त्याच दिवशी ती चेन्नईहून शूटींग करून परतली होती.

तसेच मृत्यूच्या वर्षभराआधी दिव्याने साजिद नाडियाडवाला सोबत गुपचूप लग्न केले होते, असे मानले जाते. मात्र लग्नाच्या काही महिन्यानंतरच दिव्याच्या रहस्यमय मृत्यू झाला होता. तिचा मृत्यू का झाला, कसा झाला, हे रहस्य आज इतक्या वर्षांनंतरही कायम आहे. दिव्याच्या मृत्युकडे संशयाने पाहणारे लोक तिचा कथित पती साजिद नाडियाडवाला याला तिच्या मृत्यूसाठी जबाबदार धरतात. पण हे कधीच सिद्ध होऊ शकले नाही.

स्मिता रेशीम:-

सिल्क ही दाक्षिणात्य अभिनेत्री असून तिने साउथ इंडस्ट्रीमध्ये आपले नाव कमावले होते. तसेच ‘द डर्टी पिक्चर’ हा सिनेमा सिल्क स्मिताच्या जीवनपटावर बनलेला होता पण 23 सप्टेंबर 1996 रोजी सिल्कने फाशी घेऊन आत्महत्या केली, सिल्कचा मृतदेह तिच्या राहत्या घरी पंख्याला लटकलेला दिसला होता.

तिच्या आत्महत्येच्या बातमीने मात्र साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली होती. पण पोलिसांनी आत्महत्या म्हणून हे प्रकरण बंद केले होते. मात्र काही लोकांचे म्हणणे आहे, की तिच्या मृत्यूच्या मागे दुसरे कारण आहे. अशाप्रकारे 18 वर्षांपर्यंत साउथ फिल्म इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीने लोकांना वेड लावून या जगाचा निरोप घेतला.

आरती अग्रवाल:-

तेलगू अभिनेत्री आरती अग्रवाल हिचे अमेरिकेतील न्यू जर्सी येथील रूग्णालयात निधन झाले होते. ती केवळ 31 वर्षांची होती, हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला होता. तसेच आरतीच्या मॅनेजरने सांगितले की, “आरती लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त होती आणि त्यांना फुफ्फुसांचा आजार देखील होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.

२००१ मध्ये आरतीने तेलुगू ‘नुव्वा नकू नाचव’ या चित्रपटातून अभिनयात प्रवेश केला होता आणि हा चित्रपट सुपरहिट देखील ठरला होता. तिने ‘नुव्वा लेका नेनु लेनु’, ‘इंद्र’ आणि ‘वसंतहॅम’ या चित्रपटात काम केले. तसेच 2005 मध्ये को-स्टार तरुणाशी प्रेमसंबंध सुरू झाल्याने तिने एकदा आत्महत्येचा प्रयत्नही केला होता.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *