या हिवाळयात करा याप्रकारे डिंकाच्या लाडूचे सेवन…मिळतील आपल्याला अनेक अश्यर्यकारक फायदे..शिवाय आपले हे गंभीर रोग होतील नाहीसे

या हिवाळयात करा याप्रकारे डिंकाच्या लाडूचे सेवन…मिळतील आपल्याला अनेक अश्यर्यकारक फायदे..शिवाय आपले हे गंभीर रोग होतील नाहीसे

हिवाळ्यात लोकांना बर्‍याचदा डिंक लाडू खायला आवडतो. थंडी आणि डिंकाचे लाडू हे समीकरण ठरलेलं असतं. भारतात हिवाळ्यात डिंकाचे लाडू बनवले जातात. डिंक, गव्हाचं पीठ, तुप,खोबरं, गुळ आणि भरपुर सुका मेवा वापरून हे लाडू बनवले जातात. थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात ऊर्जा आणि उष्णता निर्माण करण्याचं काम डिंक करतं. हे लाडू स्त्रीच्या गरोदरपणातही खायला दिले जातात.

डिंकाच्या लाडूचे फायदे:-

थंड हवामानात ते शरीर उबदार ठेवण्याचे कार्य करते.

सर्दीबरोबरच, ते लोकांना हंगामी विषाणूच्या संसर्गापासून वाचवते

रोग प्रतिकारशक्ती वाढते- डिंकाचे लाडू आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात आणि हे लाडू खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. रोग प्रतिकारशक्ती क्षमता वाढल्यामुळे आपण सहसा आजारी पडणार नाही.

हाडे मजबूत होतात- डिंकाचे लाडू हाडे मजबूत होण्यासाठी फायदेशीर ठरतात आणि हे लाडू खाल्ल्याने हाडे ठिसूळ होत नाहीत. म्हणून झोपण्याच्या आधी दररोज रात्री कोमट दुधासोबत डिंक लाडू खावे. कोमट दुधासोबत लाडू खाल्ल्याने हाडे आणि स्नायूंवर चांगला परिणाम होतो.

अशक्तपणा दूर होतो- डिंक लाडू शरीरातील अशक्तपणा दूर करण्यास मदत करतात आणि हे लाडू खाल्ल्याने शरीराचा अशक्तपणा कायमचा जातो. म्हणून ज्या स्त्रियांना अशक्तपणाचा त्रास असेल अश्यांनी दररोज डिंक लाडू खावे.

बद्धकोष्ठता दूर करते- डिंकचे लाडू बद्धकोष्ठता असलेल्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरते आणि हे लाडू खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेच त्रास असेल तर आपण दररोज रात्री गरम दुधासोबत डिंक लाडू खावे.

हे पुरुषांमधील लैंगिक दुर्बलतेची समस्या देखील दूर करते.

प्रेग्नेंन्सीनंतर डिंगाचे लाडू खाल्ल्याने ताकद मिळते. यामुळे आई आणि बाळ दोन्हीही हेल्दी राहतात. ब्रेस्टफीडिंग मदरसाठी हे फायदेशीर असते. हे मिल्क प्रोडक्शन वाढवते. ज्या महिलांचे वजन कमी आहे, त्यांनी रोज डिंकाचे लाडू खाऊन दूध प्यायल्याने वजन वाढेल आणि कमजोरी दूर होईल.

रक्ताचे प्रमाण वाढवते- शरीरात रक्ताची कमतरता असल्यास जर हे लाडू खाल्ले तर शरीरात रक्त वाढवते म्हणून ज्या लोकांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी आहे अशा लोकांनी लाडू आवर्जून खावेत.

लक्षात ठेवा या गोष्टी- डिंकचे लाडू चवीला गोड असतात म्हणून शुगरचा त्रास असणाऱ्या रुग्णांना खायला देऊ नका.
जास्त डिंक लाडू खाल्ल्याने पोटात गडबड होऊ शकते म्हणून दिवसातून दोनपेक्षा जास्त लाडू खाऊ नका.

डिंकचे लाडू अत्यंत गरम उर्जायुक असतात म्हणून जास्त प्रमाणात सेवन केल्याने मळमळ होऊ शकते आणि उलट्यांचा त्रास देखील होऊ शकतो. आपणास उच्च रक्तदाब असल्यास डिंकचे लाडू खाऊ नका.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *