काय आपण सुद्धा रोज डोक्याखाली उशी घेऊन झोपता…तर आजचं बदला ही सवय…होतील हे चमत्कारिक फायदे…अनेक रोग सुद्धा होतील दूर

काय आपण सुद्धा रोज डोक्याखाली उशी घेऊन झोपता…तर आजचं बदला ही सवय…होतील हे चमत्कारिक फायदे…अनेक रोग सुद्धा होतील दूर

काही लोकांना सवय असते की, त्यांना उशी डोक्याखाली घेतल्याशिवाय झोपच येत नाही. तर काही लोका हलकी आणि सॉफ्ट उशी वापरतात. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या सवयी असतात. पण उशी डोक्याखाली घेऊन झोपण्याची सवय फार चांगली नाही. उलट उशी डोक्याखाली न घेता झोपण्याचे अनेक फायदेही आहेत. जाणून उशी न वापरण्याचे फायदे…

एका रिसर्चनुसार झोपताना डोक्याखाली जास्त जाड उशी घेतल्याने अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. जर उशी जास्त जाड असली, तर मान अवघडणे, पाठ दुखणे अश्या तक्रारी उद्भवू शकतात. ह्या तक्रारींमुळे रात्रभर शांत झोप लागत नाही. त्यामुळे पुढच्या दिवशी शरीर ताजेतवाने होण्याऐवजी सुस्तावलेले, निरुत्साही असते.

तज्ञांच्या मतानुसार जाड उशीवर झोपल्याने चेहरा निस्तेज दिसू लागतो. तसेच त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. डॉक्टर आर्थर टकर यांनी केलेल्या एका रिसर्चनुसार आपण झोपण्यासाठी वापरत असलेल्या उशीमधे अनेक किटाणू, त्वचेवरील मृत पेशी, धूळ, इत्यादी साठत असतात. उशीवर स्वछ धुतलेला नवीन अभ्र चढविला, की उशी साफ झाली हा एक मोठा गैरसमज असल्याचे डॉक्टर टकर म्हणतात.

पण असे नसून उशीवरील किटाणू, धूळ, मृत पेशी यांच्यामुळे त्वचेशी निगडीत समस्या उद्भवू शकतात. तसेच जास्त जाड उशीच्या वापराने मान आणि पाठीच्या स्नायूंवर जास्त ताण पडत असतो. त्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.

झोपण्यासाठी उशी निवडताना पातळ उशी निवडावी. तसेच ज्या कपड्यापासून ती उशी तयार केली गेली आहे, त्याची, किंवा त्याच्या रंगाची आपल्याला अॅलर्जी तर नाही, हे पाहणे देखील आवश्यक असते. खरे तर झोपताना उशी शक्यतो न वापरण्याचा सल्लाच तज्ञ देतात.

पण जर उशी वापरायचीच असेलं तर एखाद्या मऊ साडीची घडी किंवा तत्सम कपड्याची आणि तितक्याच उंचीची उशी डोक्याखाली घ्यावी. आजकाल बाजारामध्ये धुता येतील अश्या मटेरियलच्या उश्या उपलब्ध आहेत. शक्यतो त्या उशांचा वापर करावा. उशी जास्त कडक किंवा अगदीच मऊ नसावी. दर महिन्यामध्ये एकदा गाद्या आणि उश्या उन्हामध्ये वाळवाव्यात, किंवा ते शक्य नसल्यास व्हॅक्युम क्लीनरने स्वछ कराव्यात. उशीवरील अभ्रे नियमित बदलणेही आवश्यक आहे.

हे फायदे आपल्याला होऊ शकतात:-

पाठीच्या कण्याला मिळेल आराम:
जर तुमचा पाठीचा कणा फार आधीपासून दुखत असेल तर काही दिवस उशी न वापरता झोपून बघा. तज्ज्ञ सांगतात की, उशीचा वापर केल्याने आपली मान आणि पाठीच्या कण्याचा तणाव वाढतो. त्यामुळे अनेकदा मानेचा त्रास व्हायला लागतो. त्यामुळे उशी न वापरणे हा चांगला पर्याय ठरू शकतो.

त्वचेसंबंधी फायदा:

उशीचा सतत वापर केल्याने त्वचेवर सुरकुत्या पडू शकतात. कारण उशीमुळे चेहऱ्यावर दबाव पडतो. जे लोक उशीचा वापर करत नाहीत, त्यांना ही समस्या होत नाही. उशी न वापरल्याने पिंपल्स येण्याची समस्याही कमी होते. कारण उशीचे कव्हर नेहमी धुतले जात नाहीत, त्यामुळे त्यातील धुळ-कण यांमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

चांगली झोप लागते:

उशी डोक्याखाली घेऊन झोपल्याने अनेकदा काही लोकांना थकवा जावणतो. याचा अर्थ तुमची चांगली आणि पुरेशी झोप होत नाहीये. जेव्हा एखादी व्यक्ती उशीचा वापर न करता झोपली तर त्याची चांगली झोप होऊ शकते. तसेच इतरही काही समस्या दूर होतात. झोप पूर्ण झाल्यवर तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटतं.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *