जाणून घ्या चिकू खाण्याचे फायदे…जर आपण याप्रकारे केले चिकूचे सेवन तर आपले सुद्धा हे पाच रोग मुळापासून नष्ट झालेच समजा…

जाणून घ्या चिकू खाण्याचे फायदे…जर आपण याप्रकारे केले चिकूचे सेवन तर आपले सुद्धा हे पाच रोग मुळापासून नष्ट झालेच समजा…

मे महिन्याचा अखेरचा आठवडा सुरू असून तापमानात वाढ झाल्यामुळे प्रचंड उकाडा जाणवायला लागला आहे. कडाक्याच्या उन्हापासून शरिराला थंडावा मिळावा म्हणून आहारात गारेगार काकडी, कलिंगड, संत्री, खरबूज आणि चिकूसारख्या फळांचा समावेश केला जातो. या सर्व फळांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. आज आपण चिकू खाल्यास तुमच्या शरीरास आरोग्यदायी फायदे कोणते होतात त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

चिकूमध्ये लोह, फॉस्फरस, कॅल्शिअम, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद व आद्र्रता भरपूर प्रमाणात असतात. तसेच ‘अ’ जीवनसत्त्व मोठय़ा प्रमाणावर असते. तर अल्प प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व आणि नसíगक फलशर्करा भरपूर प्रमाणात असते. चिकू मधीलया गुणधर्मामुळे थकलेल्या, दमलेल्या, अशक्त झालेल्या निरुत्साही व्यक्तीस चिकूचे सेवन हे अमृतासमान आहे.

प्रतीकात्मक चित्र

प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत:-

शरीरातील उर्जा वाढण्यासाठी चिकू अतिशय उपयुक्त असतो. छोट्या दिसणाऱ्या या फळात व्हिटॅनिम सी असते. लहान मुलांनी आणि ज्येष्ठांनी चिकू आवर्जून खायला हवा. शरीरातील अँटीऑक्सिडंटसची पातळी चांगली ठेवण्यासाठी चिकू उपयुक्त ठरतो. यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास चांगली मदत होते. शरीरावर आक्रमण करणाऱ्या कोणत्याही समस्येशी नैसर्गिकपणे सामना करण्याची ताकद चिकूमुळे वाढते. त्यामुळे विविध आजारांपासून आपले संरक्षण होते.

प्रतीकात्मक चित्र

वजन कमी करण्यासाठी चिकू देखील उपयुक्त मानला जातो. खरं तर, फायबर त्यात भरपूर प्रमाणात आढळते आणि म्हणूनच त्याचे सेवन केल्यामुळे आपले पोट लवकरच भरले जाते, यामुळे आपण जेवण कमी प्रमाणत करतो आणि त्यामुळेच याचा उपयोग आपल्याला वजन कमी करण्यासाठी होतो. आपणही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच चिकूचे सेवन करा.

प्रतीकात्मक चित्र

हाडे होतात मजबूत:-

हाडांच्या मजबूतीसाठी सर्वात जास्त गरजेचे असतात ते कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि आयर्नसारखे मिनरल्स. चिक्कूमध्ये हे सर्व मिनरल्स आढळतात. त्यामुळे हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही आजच चिक्कूचं सेवन करायला सुरुवात करा. लहान मुलांना हे फळ जास्तीत जास्त खायला द्यायला हवं, जेणेकरुन त्यांच्या हाडांचा विकास चांगला होईल.

प्रतीकात्मक चित्र

अन्न पचनाची समस्या असल्यास चिकुचे सेवन करा त्यातील फायबर बद्धकोष्ठता दूर करते. चिकू खाल्याने त्वचेची चमक कायम राखण्यास मदत मिळेल. चिकूमध्ये व्हिटॅमिन ई असते जे आपल्या त्वचेला ओलावा देते आणि आपली त्वचा निरोगी आणि सुंदर बनवते. म्हणून चिकू खाणे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे.

जळजळ होण्यास प्रतिबंध:-

अनेकांना विविध कारणांनी छातीत आणि पोटात जळजळल्यासारखे होते. मात्र त्यावर आराम मिळवायचा असेल तर चिकू अतिशय उपयुक्त ठरतो. गोळ्या औषधे घेण्यापेक्षा चिकू खाणे हा सोपा आणि घरगुती उपाय आहे. त्यामुळे आहारात चिकू आवर्जून खा.

अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट:-

चिक्कूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोषक तत्वे असतात. व्हिटॅंमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी यात अधिक प्रमाणात असतात. जर तुम्ही नियमीत चिक्कू खाल्ले तर तुमची त्वचा हेल्दी आणि मॉइश्चराइज होईल. अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असल्या कारणाने या फळामुळे त्वचेवर होणाऱ्या सुरकुत्यांपासूनही बचाव होणार आहे. त्यासोबतच हे फळ खाल्ल्याने केसही मुलायम होतात आणि केसगळतीही थांबते. त्यामुळे हे फळ जास्तीत जास्त खावे.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *