दातदुखी, पोटदुःखी, कानदुखी किंवा कोणत्याही वेदना असो…फक्त करा या प्रकारे हिंगाचा उपाय…आपल्या या प्रकारच्या वेदना त्वरित नाहीशा झाल्याच समजा

दातदुखी, पोटदुःखी, कानदुखी किंवा कोणत्याही वेदना असो…फक्त करा या प्रकारे हिंगाचा उपाय…आपल्या या प्रकारच्या वेदना त्वरित नाहीशा झाल्याच समजा

शीर्षक वाचून तुमच्या मनात आतापर्यंत विविध पदार्थांची नावे आली असतील जी पोटाच्या समस्येवर रामबाण आहेत. पण त्यात हिंगाचं नाव आहे का? अनेकांना माहित नाही पण हे खरं आहे की हिंग पोटाच्या समस्येवर खूप गुणकारी आहे.

आपण सहसा पोटाच्या समस्या झाल्या की ओवा वगैरे वापरतो, पण त्याहीपेक्षा हिंग अधिक प्रभावी ठरू शकते. आयुर्वेदात सुद्धा हिंगाला एक औषधी वनस्पती म्हणून मोठे स्थान आहे. यातील गुणधर्म शरीराला अतिशय उपयुक्त ठरतात.

आपले पचनतंत्र आणि मलमार्ग स्वच्छ ठेवण्याचे काम हिंग करते. म्हणून तुम्ही पोटाच्या समस्येवर हिंग वापरलेच पाहिजे. आज या लेखातून आपण जाणून घेऊया की हिंगाचा कशाप्रकारे पोटाशी निगडीत विविध समस्येवर वापर करावा आणि अजून कोणकोणत्या त्रासावर हिंग अतिशय उपयुक्त ठरू शकते. चला तर जाणून घेऊया.

प्रतीकात्मक चित्र

तसेच कधीकधी दातदुखी किंवा इतर समस्या देखील उद्भवतात. परंतु हिंग या सर्व अडचणी दूर करण्यास मदत करू शकते. हिंगमध्ये विविध प्रकारचे अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, जे दातदुखी आणि संसर्ग दूर करण्यास मदत करतात. तुम्ही हिंग पाण्यात उकळा आणि नंतर त्या पाण्याने गुळण्या करा. असे केल्याने दातदुखीपासून आराम मिळतो.

प्रतीकात्मक चित्र

केवळ पोटाच्या समस्या नाही तर हिंग हे कानाच्या वेदनेवर सुद्धा अतिशय प्रभावी ठरते. जर अचानक कधी तुमच्या कानात वेदना होऊ लागल्या तर एक पेनकिलरसारखे हिंग त्यावर काम करेल आणि लवकर आराम मिळवून देईल.

यासाठी छोट्या भांड्यात एक चमचा नारळ तेल गरम करून त्यात हिंगाचा छोटा तुकडा टाका आणि ते त्यात विरघळू द्या. जेव्हा हिंग नारळाच्या तेलात चांगल्या प्रकारे मिसळेल तेव्हा हे मिश्रण थंड करून कानात घाला. नारळाचे तेल स्नायूंना पूर्वस्थितीत आणेल आणि हिंग जळजळ, सूज आणि वेदनेवर काम करेल.

प्रतीकात्मक चित्र

जर तुमच्या पोटात अचानक वेदना होऊ लागल्या आणि तुम्हाला अजिबात ही वेदना सहन होत नसेल, जवळ कोणते औषध सुद्धा नसेल तर आवर्जून हिंगाचा वापर करा. हिंग हे वेदनाशामक म्हणून पोटदुखीवर काम करेल.

दोन चिमुटभर हिंग घेऊन अर्धा चमचा पाण्यात मिसळा. आता हिंगमिश्रित या पाण्यात कापसाचा छोटा तूकडा भिजवून त्याला पोटाच्या नाभीवर ठेवून थोडा वेळ झोपा. यासोबतच हे पाणी पूर्ण पोटावर हलक्या हाताने लावा. पुढील 5 ते 10 मिनिटांत तुम्हाला फरक दिसू लागेल.

आपल्या रोजच्या आहारात हिंगाचा समावेश करणाऱ्यांना कधीच पोट फुगण्याची समस्या होत नाही. नियमित रूपाने हिंगाचा वापर करून जेवण तयार करा आणि खा. तुम्हाला खूप मोठा फरक दिसून येईल. पहिला फरक हा दिसून येईल की तुमची गॅसची समस्या दूर होईल.

ज्या स्त्रियांना आणि मुलींना मासिक पाळीवेळी पोटात खूप वेदना होतात त्यांनी तर आवर्जून हिंगाचा वापर करायला हवा. हिंग घरांत सहज उपलब्ध होत असल्याने तुम्ही कोणताही त्रास झाल्यासही याचा सहज वापर करू शकता.

तसेच बाळाच्या पोटात जंत होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. सगळ्या मुलांना या समस्येला तोंड द्यावे लागते. यावर उपाय म्हणून बाळाच्या आहारात आवर्जून हिंगाचा वापर करावा. थोडीसे हिंग सुद्धा मोठा प्रभाव दाखवू शकते.

यामुळे बाळाचे पोट साफ राहील आणि जंत सुद्धा नष्ट होतील. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे बाळाला लहानपणापासूनच हिंगाच्या चवीची सवय होईल आणि मोठा झाल्यावर तो हिंग खाण्यास टाळाटाळ करणार नाही.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *