हे भारतातील सर्वांत श्रीमंत भिकारी…ज्याच्याकडे आज मुंबईमध्ये आहेत आलिशान फ्लॅट…त्याची रोजची कमाई जाणून आपले सुद्धा होश उडतील

हे भारतातील सर्वांत श्रीमंत भिकारी…ज्याच्याकडे आज मुंबईमध्ये आहेत आलिशान फ्लॅट…त्याची रोजची कमाई जाणून आपले सुद्धा होश उडतील

भिकारी श्रीमंत असतात, त्यांच्याकडे खूप पैसे असतात, एवढं बोलून आपण भिकारी ते भिकारीचं असं करून दुर्लक्ष करतो, पण या भिकारीच्या संपत्ती पुढे आपण भिकारी असल्याचं आपल्याला दिसून येईल.जगातला प्रत्येक व्यक्ती आपलं घर चालवण्यासाठी आणि कुटुंबासाठी काम करत,

असतो. एखाद्या व्यक्तीची कमाई किती असेल याचा अंदाज साधारणता आपण त्याच्या लाईफस्टाईलवरुन ठरवतो. मात्र, काही लोकांची जीवनशैली पाहून तुम्ही चुकूनही अंदाज लावू शकणार नाही, की ते भिकारी आहेत किंवा भीक मागून उपजीविका करतात.

काही भिकारी तर असेही आहेत, ज्यांची कमाई आणि संपत्ती ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. तर, वाचा भारतातील अशा 5 भिकाऱ्यांबद्दल ज्यांच्याकडे अपार्टमेंट, भरपूर बँक बॅलन्स आहे. मात्र, तरीही ते रस्त्यावर भीक मागतात.

देशातील सर्वात श्रीमंत 5 भिकाऱ्यांच्या यादीत पहिलं नाव येतं मुंबईच्या परेळमधील भरज जैन यांचं. त्यांच्याकडे मुंबईमध्ये दोन फ्लॅट आहेत. याची किंमत तब्बल 140 लाख इतकी आहे. याशिवाय भीक मागून प्रत्येक महिन्याला ते जवळपास 75 हजार रुपये कमवतात. या यादीत दुसरं नाव आहे कोलकातामधील लक्ष्मी.

लक्ष्मीनं वयाच्या सोळाव्य वर्षीच भिक मागण्यास सुरुवात केली होती. 1964 पासून आतापर्यंत भीक मागून त्यांनी लाखो रुपयांची संपत्ती जमवली आहे. सध्याच्या काळात लक्ष्मी भीक मागून दररोज 1 हजार रुपये कमावते. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मुंबईमधील गीता आहे.

रिपोर्टनुसार, मुंबईच्या चरनी रोडजवळ भीक मागणाऱ्या गितानं एक फ्लॅट विकत घेतला आहे. दररोज भीक मागून ती तब्बल 1500 रुपये कमावते. यानुसार तिची महिन्याची कमाई 45 हजार इतकी आहे.

चौथ्या नंबरवर नाव आहे चंद्र आजाद यांचं. 2019मध्ये एका रेल्वे दुर्घटनेत चंद्र आजाद यांचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांना तपासादरम्यान त्यांच्या संपत्तीबद्दल माहिती मिळाली. यात त्यांच्या बँक खात्यात 8.50 लाख रुपये असून 1.5 रोख असल्याचंही समोर आलं होतं. बिहारच्या पटना येथील प्लॅटफॉर्मवर भीक मागणारे पप्पू श्रीमंत भिकाऱ्यांच्या लिस्टमध्ये पाचव्या

 स्थानी आहेत.

एका दुर्घटनेत पप्पू यांना आपला पाय गमवावा लागला होता. यानंतर त्यांनी रेल्वे स्टेशनवर भीक मागण्यास सुरुवात केली. पप्पूकडे जवळपास 1.25 कोटीची संपत्ती आहे.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *