हाडांचा आजार, मधुमेह, हृदयरोग, शारीरिक अशक्तपणा, लैगिंक दुर्बलता असे कोणतेही रोग असो…फक्त लसणाचे करा हे उपाय…परिणाम आपल्या समोर असतील

हाडांचा आजार, मधुमेह, हृदयरोग, शारीरिक अशक्तपणा, लैगिंक दुर्बलता असे कोणतेही रोग असो…फक्त लसणाचे करा हे उपाय…परिणाम आपल्या समोर असतील

भाज्यांमध्ये आणि वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरला जाणारा लसूण आरोग्यासाठी फायद्याचा आहे. याचे आरोग्यदायक फायदे माहीत असणारे लोक अनेकदा आपल्या बिछान्याखाली लसूण घेऊन झोपतात. अनेकदा सतत आजारी असणाऱ्या लहान मुलांच्या बिछान्याखालीही लसून ठेवले जाते. वेगवेगळ्या आजारांवर लसूण रामबाण उपाय मानला जातो. चला जाणून घेऊया याचे अनेक फायदे.

प्रतीकात्मक तस्वीर

​वजन कमी होते:-

वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर आहारामध्ये लसणचा समावेश करा. यामध्ये अँटी-ओबेसिटी  गुणधर्म असल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त लसूणमुळे शरीरातील फॅट्स देखील कमी होतात. यातील औषधी गुणधर्म वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत.

लसूणच्या तेलामध्येही अँटी ओबेसिटी घटक असतात, जे वजन घटवण्यासाठी अतिशय प्रभावी ठरू शकतं. नियमित सकाळी पाण्यासोबत लसूण खाल्ल्यास पचनाशी संबंधित समस्या देखील कमी होतील.

लसूणमुळे पोट आणि आतड्यांचे  आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. यातील औषधी गुणधर्मामुळे पोटातील लहान आतड्यांचे नुकसान होत नाही. अँटी मायक्रोबिअल  गुणधर्म लहान आतड्यांचे हानिकारक बॅक्टेरियांपासून संरक्षण करते. पण लसूणचे अति प्रमाणात सेवन केल्यास छातीत जळजळ किंवा पोटाच्या समस्या निर्माण होऊ सकतात.

प्रतीकात्मक तस्वीर

​मधुमेहाचा त्रास राहतो नियंत्रणात:-

पाण्यासोबत कच्चे लसूण खाल्ल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. शरीर डिटॉक्स करण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. मधुमेह, नैराश्य आणि कित्येक प्रकारच्या कॅन्सरमुळे तुमचा बचाव देखील होऊ शकतो. लसूणमध्ये अँटी डायबेटीकचे गुणधर्म आहेत. मधुमेहींसाठी लसूण अतिशय लाभदायक आहे.

एक ते दोन आठवडे लसूणचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. सोबत यामुळे कोलेस्ट्रॉल ची पातळी देखील संतुलित राहते.

​यकृत:-

यकृतामध्ये सूज येणे किंवा यकृताशी संबंधित कोणत्याही आजारांपासून तुम्हाला सुटका हवी असल्यास मर्यादित प्रमाणात लसूणचे सेवन करावे. काही जणांना नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा त्रास असतो, यावर उपाय म्हणून तुम्ही लसूण खाऊ शकता. पण समस्या गंभीर असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कोणतेही दुखणे अंगावर काढू नका.

प्रतीकात्मक तस्वीर

सर्दी-खोकला, तापाचा त्रास कमी होतो:-

सर्दी-खोकला, तापाचा त्रास झाल्यानंतर आपली आई किंवा आजी आपल्याला घरगुती उपाय म्हणून लसूण खाण्याचा सल्ला देते. लसूणमध्ये अ‍ॅलिसिन नावाचं कम्पाउंड असतं. यामुळे सर्दी-खोकल्याची समस्या कमी होते. याचे योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास रोग प्रतिकारक क्षमता देखील वाढते. रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असल्यास आपले गंभीर आजारांपासून संरक्षण होते.

​हाडांसाठी:-

हाडे मजबूत व्हावीत, यासाठी नियमित कच्चे लसूण खावे. यामुळे तुमच्या शरीराला कॅल्शिअमचा पुरवठा होतो. ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिस यासारखे गंभीर आजारांचा धोका कमी होतो. याव्यतिरिक्त लसूणमध्ये

प्रतीकात्मक तस्वीर

कोलेस्ट्रॉल:-

शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसूण लाभदायक आहे. लसूणच्या सेवनामुळे शरीरातील हानिकारक कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. अँटी-हायपरलिपिडेमिया गुणधर्मामुळे शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी होते. निरोगी आरोग्यासाठी आपल्या आहारामध्ये लसूणचा समावेश करावा.

 

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *