तणाव असुदे किंवा वजन कमी करणे असो…फक्त याप्रकारे करा अक्रोडाचे सेवन…मिळू शकतात असे अनेक आरोग्यदायी फायदे

तणाव असुदे किंवा वजन कमी करणे असो…फक्त याप्रकारे करा अक्रोडाचे सेवन…मिळू शकतात असे अनेक आरोग्यदायी फायदे

अक्रोड हा सुकामेव्यातील एक प्रमुख प्रकार आहे. इंग्रजीमध्ये अक्रोडाला Walnut असं म्हणतात. सामान्यतः अक्रोड सुकामेव्यात मिसळून खाल्ले जातात. मात्र अक्रोडाचा वापर अनेक पदार्थांमध्ये समावेश केला असतो. अक्रोड केक, चॉकलेट, कुकीज, लाडू, मसाले दूध, आईस्क्रिममध्ये केला जातो. अक्रोडामुळे मेंदूचे कार्य सुरळीत होते. याशिवाय अक्रोडामध्ये अनेक आरोग्यदायी फायदे दडलेले आहेत.

याशिवाय अक्रोडाचे तेलदेखील त्वचा आणि केसांचे सौदर्य वाढविण्यासाठी वापरले जाते. तसंच अक्रोडाच्या कच्चा फळापासून मुंरबा, चटणी, सरबत तयार केले जाते. अक्रोडाचे नियमित सेवन केल्याामुळे अनेक आरोग्य समस्या कमी होतात यासाठीच दररोज मूठभर सुकामेव्यामध्ये अक्रोडाचा समावेश जरूर करा.

प्रतीकात्मक तस्वीर

वजन नियंत्रणात राहते:

आजकाल बदलेल्या जीवनशैलीमुळे वजनावर नियंत्रण ठेवणंं कठीण जातं. पुढे मग मधुमेह, रक्तदाब, ह्रदय समस्या निर्माण झाल्यास डॉक्टर तुम्हाला वजनावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देतात. मात्र अक्रोडामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. शिवाय यामुळे रक्तातील साखर वाढत नसल्यामुळे मधुमेहींनी अक्रोड खाण्यास काहीच हरकत नाही.

प्रतीकात्मक तस्वीर

ह्रदय विकाराचा धोका कमी होतो:-

अक्रोडामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात  असते. ज्यामुळे ह्रदयाचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. अक्रोड खाण्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. अक्रोडामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढत नाही ज्यामुळे तुम्हाला ह्रद विकार होण्याचा धोका कमी होतो.

प्रतीकात्मक तस्वीर

मेंदूचे कार्य सुरळीत होते:-

अक्रोड हे फळ आकाराला मेंदूच्या आकाराप्रमाणे दिसते. पण एवढंच नाही दररोज अक्रोड खाण्यामुळे तुमच्या मेंदूचे कार्यदेखील सुरळीत होऊ शकते. अक्रोडामध्ये असे काही आरोग्यदायी घटक असतात ज्यामुळे तुमची समरण शक्ती वाढू शकते. शिवाय निर्णयक्षमता, एकाग्रता आणि पटकन निराश होण्याची सवय यामुळे कमी होते. तुम्हाला त्वरीत उस्ताही वाटू लागतं. म्हणूनच जेव्हा तुम्हाला निराश आणि उदास वाटतं तेव्हा अक्रोड खाण्याची सवय लावा.

प्रतीकात्मक तस्वीर

कॅन्सरचा धोका कमी होतो

अक्रोडातील अॅंटि ऑक्सिडंट घटकांमुळे कॅन्सरच्या रोगापासून तुमचे रक्षण होऊ शकते. आजकाल या रोगाचा प्रभाव वाढत चालला आहे. त्यामुळे जर तुम्हाला यापासून स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करायचे असेल तर दररोज सकाळी सुकामेवा सेवन करण्याची सवय लावा. सुकामेव्यामध्ये इतर पदार्थांसोबत अक्रोडाचा समावेश जरूर करा.

शूक्राणूंची संख्या वाढते:-

अक्रोड खाण्यामुळे पुरूषांच्या शूक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढते. बऱ्याचदा स्पर्म काऊंट कमी असल्यामुळे पुरूषांमध्ये वंधत्वाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जर तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असाल तर दररोज अक्रोड अवश्य खा.

केस आणि त्वचेसाठी उत्तम:-

अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई आणि भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात. ज्यामुळे तुमच्या केसांचे  आणि त्वचेचे सौंदर्य वाढण्यास मदत होते. यासाठी चेहरा आणि केसांना आठवड्यातून एकदा अक्रोडाचे तेल लावा ज्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगला फायदा दिसून येईल

अक्रोड किती प्रमाणात खावे?

अक्रोड शरीरासाठी कितीही उपयुक्त असले तरी ते प्रमाणात खाणे गरजेचे आहे. कारण अती प्रमाणात कोणतीही गोष्ट खाण्याने तुम्हाला दुष्पपरिणाम भोगावे लागू शकतात. यासाठीच दिवसभरात मूठभर अथवा 4 ते 5 अक्रोड खाण्यास काहीच हरकत नाही.

अक्रोड कोणी खाऊ नये ?

ज्यांना अक्रोड खाण्यामुळे पित्ताचा त्रास होतो, अंगावर पित्त उठते, पुरळ अथवा खाज येते अशा लोकांनी अक्रोड खाऊ नयेत. गरोदर महिला आणि लहान मुलांना अक्रोड खाण्यास देण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या

अक्रोड कसे खावे ?

अक्रोड हे एका कठीण कवचामध्ये बंद असलेलं फळ आहे. त्यामुळे ते फोडून ते खावं लागतं. दररोज सकाळी नास्ता करताना मूठभर सुकामेवा खावा. त्यामध्ये तुम्ही अक्रोडाचा  समावेश करू शकता. जर तुम्हाला शक्ती आणि बुद्धीत वाढ होण्यासाठी अक्रोड खायचं असेल तर रात्री अक्रोड पाण्यात भिजवून सकाळी ते दूधासोबत खाल्लास चांगला फायदा होऊ शकतो.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *