मधुमेह असलेल्या रुग्णांनी अजिबात करू नये या पाच पदार्थांचे सेवन…अन्यथा आपल्याला गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागेल…पडू शकते महागात

मधुमेह असलेल्या रुग्णांनी अजिबात करू नये या पाच पदार्थांचे सेवन…अन्यथा आपल्याला गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागेल…पडू शकते महागात

मधुमेह आपल्या देशाची वाढती समस्या आहे. या जगात मधुमेहींच्या गणनेमध्ये आपला दुसरा नंबर येतो. प्रत्येक पाचव्या भारतीय नागरिकाला मधुमेह असून ही फार काळजीची बाब आहे. मधुमेहाची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्याची काही लक्षणे नसतात. उदा. जेव्हा आपल्याला संसर्ग झाला की ताप येतो, पोट बिघडले की मग पोट दुखते- पण मधुमेहात मात्र असे काहीही होत नाही.

मधुमेहाची जी लक्षणे आहेत- खूप भूक लागणे, खूप तहान लागणे, खूप लघवी होणे, ही रक्तातील साखर फार जास्त प्रमाणात वाढल्यावरची लक्षणे आहेत.

पण रक्तातील साखर हळूहळू जास्त होते. सर्वसाधारण प्रमाणापेक्षा थोडी जास्त साखर रक्तात असताना जर कळली तर त्यावर त्वरित इलाज-पथ्य करून ती आटोक्यात आणता येते. परिणामी मधुमेहामुळे शरीरात होणारी गुंतागुंत  टाळता येते.

पण ही थोडी वाढलेली साखर रक्ताचा तपास केल्यावरच कळते. त्यामुळे रक्ताचा तपास करणे आवश्यक आहे. जर आपल्या आई-वडील किंवा बहीण-भावाला मधुमेह असेल तर मधुमेहाची चाचणी नियमित रूपाने करणे आवश्यक आहे. मधुमेह  झाल्यावर त्याचे पथ्यपाणी व इलाज करण्यापेक्षा तो टाळता यावा यावर भर दिला पाहिजे.

प्रतीकात्मक तस्वीर
द्राक्षे : रक्तातील साखरेची पातळी योग्य राखायची असेल तर द्राक्षाचे सेवन करणे टाळावे. कारण द्राक्षही गोड असतात. एक कप द्राक्षांतून शरीरात 23 ग्रॅम साखर जाऊ शकते.

डाळिंब : डाळिंब रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवते परंतु त्यातही साखरेचे प्रमाण अधिक असल्याने त्याचे सेवन केल्यास मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.

प्रतीकात्मक तस्वीर

केळी –

जर आपल्याला केळी आवडत असतील आणि मधुमेह असेल तर आपण केळी खाणे बंद केले पाहिजे. वास्तविक, केळी खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांना केळी त्रास देतो. यामुळे त्यांच्या साखरेची पातळी अनियंत्रित होऊ शकते.

लीची – सर्वाधिक जास्त नैसर्गिक असलेल्या फळांमध्ये लीची या फळाचा समावेश होतो. एक कप लीचीमध्ये २९ ग्रॅम नैसर्गिक साखर असते जी रक्तातील साखरेचं प्रमाण वाढवते. त्यामुळे मधुमेही व्यक्तींनी या फळाचं सेवन कटाक्षाने टाळावं.

प्रतीकात्मक चित्र

आंबा : आंबा हा वर्षातून एकदाच मिळणार्‍या फळांपैकीएक आहे आणि बहुतेकांना आंबा खूप आवडतो. परंतु त्यातही नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आंब्याचे सेवन करणे शक्यतो टाळले पाहिजे. सर्वसाधारणपणे एका आंब्यामध्ये 45 ग्रॅम इतकी नैसर्गिक साखर असते.

चेरी – सर्वाधिक लोकप्रिय फळ म्हणजे चेरी. लहानांपासून थोरांपर्यंत अनेकांना आवडणाऱ्या या फळामध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साखर असते. एक कप चेरीमध्ये १८ ग्रॅम शुगर असते. मधुमेही व्यक्तींनी जर चेरी खाल्ली तर त्यांच्यासाठी ती धोकादायक आहे.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *