ही तीन फळे आपल्याला देऊ शकतात निरोगी आणि सदृढ आयुष्य…फक्त त्याचे याप्रकारे करा सेवन…आपले अनेक गंभीर रोग नाहीसे झालेच समजा

ही तीन फळे आपल्याला देऊ शकतात निरोगी आणि सदृढ आयुष्य…फक्त त्याचे याप्रकारे करा सेवन…आपले अनेक गंभीर रोग नाहीसे झालेच समजा

आरोग्यासाठी फळे ही सर्वात उत्तम हे आता सर्वानीच मान्य केले आहे. आंबा, सफरचंद, संत्री, केळी, किलगड अशा आपल्याकडच्या फळांचे गुण सर्वसाधारणपणे माहिती असतात.

मात्र गेल्या दोनेक वर्षांत थायलंड- मलेशिया-चीनवरून येत असलेल्या विदेशी फळांनी बाजारात लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली आहे. ही फळे कोणी खावी, कोणी खाऊ नये याविषयी अनेकांच्या मनात शंका असतात. त्यांचे निरसन करण्याचा हा प्रयत्न.

प्रतीकात्मक तस्वीर

किवी
हा मूळचा चीनचा रहिवासी. न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी किवीच्या तपकिरी रंगाशी साम्य असल्याने या फळाचे नाव किवी ठेवण्यात आले. न्यूझीलंड, फ्रान्स, इटली, जपान व अमेरिकेत जास्त लागवड होते. आता भारतातही उत्तर व ईशान्येकडील भारतातील राज्यात लागवड करून निर्यातही केली जाते. साधारणत ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत किवीचा हंगाम असतो.

हिरव्या रंगाच्या किवीला थोडेसे गोड, आंबट, आम्लयुक्त अशी मजेशीर चव लागते. हे फळ छोटे आणि अंडाकृती असते. त्वचा अस्पष्ट तपकिरी रंगी आणि अर्धपारदर्शक असते. आतून हिरवट द्रव असलेल्या गरामध्ये पांढऱ्या पेशींची जुळवाजुळव आढळते व काळ्या रंगाच्या खाण्यायोग्य बिया असतात.

कोणी खावे ?
’किवीमध्ये ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचे व शरीरातील कमकुवत पेशींना सुदृढ बनवण्याचे काम करते, तसेच शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर  टाकण्यास मदत करते.  संधिवात , आमवात, दमा यासारख्या रोगांवर किवी हे फळ गुणकारी ठरते . ह्या फळामध्ये तंतूचे प्रमाण अधिक असल्याने मधुमेहींसाठीही उपयोगी ठरते.

’किवीमध्ये नसíगकरित्या रक्त पातळ कमी करण्याचे गुणधर्म असल्याने कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असलेल्या, तसेच हृदयविकार असणाऱ्यांसाठी हे फळ उपयुक्त आहे.

’पाणी व पोटॅशियम अधिक असल्याने लघवीच्या जागेवर खाज येत असल्यास किवा जळजळ होत असल्यास किवी खाल्ल्याने  फायदा होतो.

प्रतीकात्मक तस्वीर

लीची
अतिशय मधुर, रसाळ. उन्हाळ्यात जिभेला शीतलता देणारे फळ. हे देखील फळ मूळचे दक्षिण चीनमधले. बाहेरील कवच गुलाबी रंगाचे तर आतील गर मात्र पांढरे रसाळ, मधुर व अर्धपारदर्शी. मे ते ऑक्टोबर ह्या दरम्यान लीची बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. भारतात बिहार व पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक लागवड केली जाते.

कोणी खावे ?
लीची हे शक्तिवर्धक, रक्ताभिसरण वाढवणारे, रक्ताशी निगडीत असलेले विकार काढून टाकणारे फळ आहे. त्यातील रासायनिक गुणधर्मामुळे पचनक्रियासंवर्धक तसेच निद्रानाशमुक्त करणारे आहे. भारतात लीचीच्या ‘बी’पासून बनवलेला चहा वेदनाशामक म्हणून उपयोगात आणला जातो.

ह्या फळामध्ये पोटॅशियम व तांबे ही खनिजे जास्त प्रमाणत असल्याने हृदयविकार तसेच यकृताच्या आजारावर  गुणकारी आहे. या फळाला त्वचेचा खास दोस्त मानला जातो, ते त्यातील ओलीगोनॉल रसायनामुळे. या रसायनामुळे सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते.

प्रतीकात्मक तस्वीर

ड्रॅगन फ्रूट
आकर्षक रंगाचे परंतु तरीही ड्रॅगन या भितीदायक नावाने ओळखले जाणारे हे फळ. या फळाचे मूळ स्थान मेक्सिको आणि अमेरिका आहे. सध्या तरी भारतात मोठय़ा प्रमाणावर लागवड होत नसल्याने श्रीलंका व चीनमधून आयात केले जाते. वर्षभर हे फळ उपलब्ध असते.

कोणी खावे ?
बाहेरून दिसायला गडद गुलाबी रंगाचे व आतला गर पांढरा असून  खाण्यायोग काळ्या बिया असतात. अतिशय मोहक असे हे फळ  चवीला मात्र बऱ्यापकी सौम्य व बेचव असते. यातील पोषक तत्वे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या फळात असलेली कबरेदके आतडय़ांना निरोगी ठेवण्यास मदत करते.

जीवनसत्व ‘ब’ भरपूर असल्याने मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यास उपयुक्त ठरते. तणाव कमी करणारे तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे हे फळ आहे. त्वचा टवटवीत, तजेलदार व चकचकीत ठेवण्यास हे फळ उपयोगी ठरते. शर्करेचे प्रमाण अल्प असल्याने मधुमेहासोबत रक्तदाब व ह्रदयविकार रुग्णांसाठी हेफळ वरदान आहे. त्यातील अ‍ॅण्टिऑक्सिडंट पेशी सुदृढ ठेवण्यास मदत करतात.

प्रतीकात्मक तस्वीर

पीच
हे फळ त्याच्या विशिष्ट रंगासाठी प्रसिद्ध आहे. बाहेरून फिकट नािरगी व थोडी पिवळ्या रंगाची छटा असणारे हे फळ आतून मात्र अतिशय रसाळ व मधुर आहे. हे फळ मुळचे चीनमधले असून भारतात एप्रिल ते जूनपर्यंत बाजारात दिसते.
कोणी खावे ?
ह्या फळामध्ये साखरेचे प्रमाण कमी असल्याने मधुमेहीसाठी हे फळ योग्य. थोडय़ा प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व असल्याने अ‍ॅण्टिऑक्सिडंटचे काम करते. जीवनसत्त्व ‘अ’, ‘ई’ व ‘के’चे प्रमाण भरपूर असल्याने डोळ्यांचे आजार- रातांधळेपणा, मोतीिबदू, नजर कमी होणे या सर्व तक्रारी कमी करण्यास मदत करते.

पीचमध्ये फ्लुराइड हा घटक असल्याने दातांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास तसेच हाडांची मजबुती कायम ठेवण्यास भर टाकते. सायनासिटीसशी संबंधित आजारावरही हे फळ चांगला उपाय आहे.

हे फळ दररोज खाल्ल्यास त्वचेवर येणाऱ्या बारीक रेषा तसेच पुटकुळ्या येण्याचे प्रमाण कमी होते म्हणूनच याचा वापर भरपूर प्रकारच्या सौंदर्यसाधने बनवण्यास करतात. या फळाचा नसíगक गर चेहऱ्यावरील सुरकुत्यांवर लावल्यास त्वचा ताजीतवानी ठेवण्यास मदत करते.

उच्च रक्तदाबाची तक्रार असलेल्या व्यक्तींनी जास्त प्रमणात पोटॅशिअम व कमी सोडीअम असलेले अन्न खाणे चांगले. पीचमध्ये भरपूर पोटॅशिअम व सोडिअम नगण्य असल्याने उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी हे खाल्ले पाहिजे .

 

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *