शनिवारी अशा प्रकारे करा हनुमानाची पूजा …प्रत्येक संकटांतुन तुमची मुक्तता होईल व परिणाम आपल्या समोर असतील.

शनिवारी अशा प्रकारे करा हनुमानाची पूजा …प्रत्येक संकटांतुन तुमची मुक्तता होईल व परिणाम आपल्या समोर असतील.

हनुमानाला ‘संकट मोचन’ म्हणूनही ओळखले जाते. ते भक्तांच्या वेदना आणि दुःखाचे निराकारण करण्यासाठी परिचित आहेत. आजच्या युगात, प्रत्येकाच्या जीवनात नेहमीच काही ना काही संकट येत असते. अशा परिस्थितीत भगवान हनुमान तुम्हाला त्या संकटांपासून मुक्त करू शकतात. हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी शनिवार खूप चांगला मानला जातो. आपण या दिवशी काही विशेष उपाय केल्यास आपल्या जीवनातील सर्व अडचणी संपतात. तर मग त्या उपाययोजना काय आहेत हे आज आपण जाणून घेऊ या.

शनिवारी हनुमान मंदिरात जा आणि काळ्या घोड्याची नाल हनुमानाला अर्पण करा. यानंतर मंदिरामध्ये बसून हनुमान चालीसाचे पठण करावे. जर बकाळ्या घोड्याची नाल उपलब्ध नसेल तर आपण जुन्या खिळ्यापासून बनवलेल्या लोखंडी रिंगा देखील वापरू शकता.

शनिवार हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी काळे तीळ, पीठ आणि साखर एकत्र करून मिश्रण तयार करा. आणि ते खाद्य मुंग्यांना ठेवा. असे केल्यास आपल्या जीवनातील सर्वं दु: ख आणि वेदना कमी होऊ लागतील.

शनिवारी सकाळी लवकर उठून गंगेच्या पाण्याने स्नान करावे. आणि एका भांड्यात मोहरीचे तेल घेऊन त्या तेलामध्ये आपला चेहरा बघा. यानंतर हे तेल एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा. असे केल्यास आपल्या आयुष्यातील सर्व समस्या लवकरच संपतील.

शनिवारी एकाद्या कुत्र्याला खायला घातल्यास आपले बरेच त्रास दूर होतात. या दिवशी आपण ताजी पोळी बनवून त्यावर थोडी मोहरीचे तेल लावून ते कुत्र्यांना खायला द्यावे. असे केल्यास आपल्या कामात येणारे अनेक अडथळे दूर होतील.

शनिवारी संध्याकाळी पिपळाच्या झाडाखाली दोन तुपाचे दिवे लावावे. यानंतर, हात जोडून हनुमानाचे ध्यान करावे. असे केल्यास आपल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील.

जर आपले कोणतेही काम पूर्ण होत नसेल आणि वारंवार व्यत्यय येत असतील तर हा उपाय आपण करू शकतो. शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन, हनुमानाला 108 पानांची हार घाला. लक्षात ठेवा की या माळेच्या प्रत्येक पानावर कुंकू देखील लावावा. असे केल्यास हनुमान लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्वं समस्या दूर होतात.

शनिवारी हनुमान मंदिरात नारळ, हरभरा आणि चिरंजी अर्पण करणेही शुभ मानले जाते. यामुळे आपल्या जीवनात कोणत्याही वाईट गोष्टी घडत नाहीत.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *