जर आपल्याला सुद्धा असेल दाद, खाज, खुजली तर आजच करा हा आयुर्वेदीक उपाय…काहीदिवसातंच आपल्याला मिळेल यापासून मुक्तता

जर आपल्याला सुद्धा असेल दाद, खाज, खुजली तर आजच करा हा आयुर्वेदीक उपाय…काहीदिवसातंच आपल्याला मिळेल यापासून मुक्तता

या लेखाद्वारे आपण सर्वसाधारणपणे लोक ज्याला जला नायटा, दाद अथवा गजकर्ण संबोधतात अशा बुरशीजन्य संसर्गाबाबत माहिती घेणार आहोत. याचे सर्वसाधारण प्रकार – रिंगवर्म, अ‍ॅथलेटस्‌ फूट व जॉक इच आहेत.

रिंगवर्म – यामध्ये गोलाकार लालसर चट्टे उमटतात. हे कुठल्याही कृमीमुळे होत नाही.अ‍ॅथलेटस्‌ फूट – पायाच्या बोटांमध्ये खाज, आग अथवा चिरा आढळतात. जॉक इच – यामध्ये मांड्याच्या आतील बाजूस लालसर खाजवणारे चट्टे उमटतात.

सर्वसाधारणपणे उन्हाळा व पावसाळा या दोन ऋतूंमध्ये हाआजार उद्‌भवतो. मागील वर्षभरात या आजारात बरीच वाढ झालेली आढळून येते. हा एक संसर्गजन्य आजार आहे व त्वचेच्या स्वच्छतेशी याचा संबंध येतो. हा आजार जास्त धोकादायक नसला तरी त्रासदाक आहे. वेळीच उपचार न केल्यास सामाजिक व मानसिक आरोग्य धोक्यात येते.

रिंगवर्म त्वचेशी संबंधित एक मोठी समस्या आहे, ती वेळेत दुरुस्त न केल्यास ती एक भयंकर रूप धारण करू शकते. दाद एक विशेष प्रकारची बुरशीमुळे उद्भवते आपण हे जाणून आश्चर्यचकित व्हाल की हे टाळूच्या त्वचेवर देखील होते ज्यामुळे केस मुळांपासून नाहीसे होऊ लागतात. यामुळे आपल्या त्वचेवर लहान लाल पुरळ उठायला सुरुवात होते आणि मग ते खूप वेगाने पसरते. पण ते मांडी दरम्यान, बोटाच्या आणि संपूर्ण शरीरावर कुठेही असू शकते.

त्वचेला खाज सुटण्याची अनेक कारणे आहेत. कधी एखाद्या वस्तूची किंवा पदार्थाची अॅलर्जी झाल्याने, कोणत्या जंगली झाडांना हात लागल्याने, किडे चावल्याने, एखादा साबण किंवा प्रसाधन वापरल्याने किंवा त्वचेचा एखादा विकार उद्भविल्याने त्वचेला खाज सुटू शकते. त्वचेला खाज सुटण्याबरोबरच त्वचेवर फोड येणे, बारीक पुरळ येणे, त्वचा लालसर होणे अश्याही समस्या उद्भवू शकतात. या समस्या टाळण्यासाठी किंवा यांचे प्रमाण कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय आजमावता येतील.

आतापर्यंत, आपण खाज टाळण्यासाठी विविध उपाय केले असतीलच,पण जर आपण हा उपाय केला तर हा उपाय आपल्यासाठी वरदान ठरू शकतो हा उपाय करण्यासाठी, आपल्याला फक्त दोन गोष्टी आवश्यक आहेत ज्या आपल्या घरात सहज सापडतील आणि ती म्हणजे कपूर आणि नारळ तेल.

यासाठी प्रथम आपल्याला 2 चमचे नारळ तेल घ्यावे लागेल आणि या तेलात दोन कापूरचे तुकडे घालावे, नंतर हे दोन घटक चांगले मिसळा आणि आता हे कपूर मिश्रित तेल एका लिंबाच्या आपल्या संक्रमणावर लावा.

या कारणास्तव लिंबूचा वापर करावा लागतो जेणेकरून आपल्याला संसर्गाचा धोका होत नाही, परंतु लिंबाचा उपयोग करून आपल्याला त्रास होत असेल तर आपण ही पेस्ट फक्त आपल्या हातांनी त्वचेवर लावू शकता. 2 दिवस या रेसिपीचा नियमित वापर केल्यावर आपल्याला दाद व खाज सुटण्यापासून पूर्णपणे आराम मिळेल आणि त्याबरोबर शांततापूर्ण जीवन मिळेल.

तसेच आपण हा देखील उपाय करू शकता, आपल्याला माहित आहे की त्वचेसाठी खोबरेल तेलाचा वापर अतिशय प्राचीन काळापासून होत आला आहे. हे तेल लावल्याने खाज कमी होतेच, शिवाय त्वचेची आग होत असेल तर ती वेदनाही त्वरित शमते. हे तेल गरम न करता तेसेच हाताच्या बोटांनी चोळून लावावे, आणि त्यानंतर त्वरित स्नान करणे टाळावे.

बेकिंग सोडा, किंवा खाण्याचा सोडा हा पदार्थ सर्वांच्याच घरी असतोच. जर त्वचेला खाज सुटून पुरळ आले, तर बेकिंग सोडा पाण्यामध्ये मिसळून त्याची पेस्ट लावल्याने खाज आणि पुरळ दोन्ही कमी होते. याशिवाय आंघोळीच्या पाण्यामध्ये बेकिंग सोडा घालून त्याने स्नान केल्यासही खाज कमी होण्यास मदत होते.

तुळशीची पानेही त्वचेवरील खाज कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. पाच ते सहा तुळशीची पाने ठेचून घेऊन खोबरेल तेलामध्ये मिसळावीत आणि हे तेल खाज सुटलेल्या ठिकाणी लावावे. हे तेल त्वचेवर किमान अर्धा तास राहू देऊन त्यानंतर धुवून टाकावे. ज्यांना त्वचेला खाज सुटण्याची समस्या वारंवार सतावत असेल, त्यांनी हा उपाय आठवड्यातून किमान तीन दिवस करावा.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *