अनेक रोगांसाठी रामबाण उपाय आहे कोथिंबीर….जाणून घ्या कोथिंबीरीचे आरोग्यदायी फायदे…मिळेल अनेक रोगापासून आपल्याला आराम.

अनेक रोगांसाठी रामबाण उपाय आहे कोथिंबीर….जाणून घ्या कोथिंबीरीचे आरोग्यदायी फायदे…मिळेल अनेक रोगापासून आपल्याला आराम.

जेवणाचा स्वाद वाढविणारी, रुचकर, सुगंधी कोथिंबीर स्वयंपाकात वापरली जाते. अनेक पदार्थाच्या सजावटीसाठीसुद्धा कोिथबिरीचा वापर केला जातो. कोिथबिरीचा गंध भूक वाढवितो, मन प्रसन्न करतो. कोथिंबिरीच्या देठांचा उपयोग भाजीच्या रशासाठी करता येतो.

याला पांढरी जांभळसर रंगाची छत्रीच्या आकाराची गुच्छामध्ये फुले येतात. कालांतराने त्याचे रूपांतर फळामध्ये होते. यालाच धणे असे म्हणतात. या धण्यांचा उपयोग त्याला असणाऱ्या सुगंध व चवीमुळे गरममसाला करण्यासाठी होतो. तसेच यापासून धण्याची डाळही बनविता येते. चला तर मग कोथिंबीरिचे आपल्याला असणारे फायदे जाणून घेऊ.

धणेचे सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते - सूचक चित्र

शरीराराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तसेच शरीराचा थकवा जाऊन उत्साह वाढविण्यासाठी २ चमचे धणे व अर्धा इंच आलं एक ग्लास पाण्यात उकळावे व हे पाणी गूळ घालून आटवावे व तयार झालेला धण्याचा चहा प्यावा. हा चहा प्यायल्याने भूकसुद्धा वाढते.

कोथिंबिरीचे सेवन मूत्रपिंडासाठी फायदेशीर आहे - सूचक चित्र

कोथिंबीरीच्या वापराचे अनेक फायदे आहेत. कोथिंबीर ताज्या ताकात टाकून पिल्यानं अपचन, मळमळ, अतिसार आणि आतड्याला आलेली सूजपासून बचाव करता येतो. तसेच मासिक पाळीत अधिक रक्तस्त्राव होत असल्यास सहा ग्राम धणे अर्धा लीटर पाण्यात उकळून घ्या. पाणी अर्ध झाल्यानंतर त्यात साखर मिसळून ते गरम पाणी प्या… फायदा होईल. अर्धा ग्लास पाण्यात दोन चमचे धणे टाकून पिल्यानं पोटदुखी बसते.

हिरव्या धणे खाल्ल्याने पोट संबंधित समस्या दूर होतात - सूचक चित्र

पोटदुखीपासून मिळतो आराम :

आपल्याला पोटदुखीमुळे होणाऱ्या वेदनाही कोथींबिरीमुळे दूर होतात. गॅस, अपचन झाले असल्यास आंबट नासलेल्या ताज्या टाकत कोथिंबिरीचा रस,हिंग आणि काळे मीठ टाकून घेतल्यास आपल्याला फरक पडतो.

कोलेस्ट्रॉल रूग्णांना - सूक्ष्म छायासाठी हिरव्या धणेचे सेवन देखील फायदेशीर आहे

कोथिंबीर ही दाह थंड करणारी आहे आणि शरीरातील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म यात आहेत. त्याचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रण आणि पाचनशक्ती सुधारते. तसेच कोथिंबीर ही मधुमेहासाठी एक चांगला पर्याय आहे. मधुमेही लोकांनी कोथिंबीरीचा उपयोग रोजच्या जेवणात केलाच पाहिजे.

टोकन फोटो

कोथिंबीरीचे पाणी मधुमेह नियंत्रित करण्याचा एक चांगला उपाय आहे. एका अभ्यासानुसार कोथिंबीरीच्या बियामध्ये म्हणजेच धण्यांमध्ये अशी संयुगे आढळतात, जी रक्तामध्ये आढळल्यास अँटी-हायपरग्लैकेमिक, इन्सुलिन डिस्चार्जिंग आणि इन्सुलिन तयार करतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते. कोथिंबिरीचे पाणी दररोज जर मधुमेहाच्या रुग्णांनी घेतले तर त्यांच्यासाठी ते खूपच फायदेशीर आहे.

डोळ्याची दृष्टी वाढविण्यासाठी हिरव्या धणेचे दररोज सेवन केले पाहिजे - सूचक चित्र

कोथिंबीरीच्या सेवनाने दृष्टी चांगली होते. डोळ्यांसाठी हे एक उत्तम औषध आहे. कोथिंबीरीची पाने बारीक करून पाण्यामध्ये उकळून घ्यावीत. हे पाणी गाळून त्याचे काही थेंब डोळ्यात टाकल्यास डोळ्यातून पाणी येण्याची समस्या दूर होते.

 

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *