आणि म्हणूनच म्हणतात ‘जब ऊपर वाला देता हैं तो छप्पड़ फाड़ के देता हैं’…अशाप्रकारे एका शेतकर्‍याला २७ लाख रुपये भेटले.

आणि म्हणूनच म्हणतात ‘जब ऊपर वाला देता हैं तो छप्पड़ फाड़ के देता हैं’…अशाप्रकारे एका शेतकर्‍याला २७ लाख रुपये भेटले.

असे म्हणतात की ‘जब ऊपर वाला देता हैं तो छप्पड़ फाड़ के देता हैं’ याचे एक कारण असे पण आहे की आपले  नशीब कधीच एकसारखे नसते. कधीकधी आपले दिवस चांगले असतात तर कधीकधी वाईट दिवसांना सामोरे जावे लागते. आता नशिबाचा हा खेळ कसा असतो हे कोणालाच माहीत नसते.

जर आज तुम्ही करोडपती असाल तर पुढच्या क्षणी तुम्ही भिकारी सुद्धा होऊ शकता. पण प्रत्येक गरीब माणसाच्या मनात एकदा असा विचार नक्कीच येतो की काही चमत्कार होवो आणि त्याला पैशाचा खजिना मिळो. सर्व कथांमध्ये आपण हे देखील ऐकतो की पूर्वीच्या काळी लोक जमिनीमध्ये तर कोठे समुद्रात खजिना दफन करतात. तरी, आम्ही आज आपल्याला सांगत असलेला किस्सा कोणती कथा नसून हे एक वास्तव आहे.

उत्तर प्रदेशातील हरदोई या शहराच्या परिसरात एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथे मोनू नावाचा एक शेतकरी राहतो, त्याला जमीनीतुन साधारणता 25 ते 27 लाखांची संपत्ती मिळाली आहे. वास्तविक, मोनूच्या घराच्या मागे एक उध्वस्त पडीक अशी जमीन आहे. तेथे तो काही काम करत होता. यावेळी त्याला अचानक जमिनीत अनेक दागिने सापडले.

गावात ही बातमी एखाद्या आगीसारखी पसरली. तरी मोनूने हा दागिन्यांचा मुद्दा दाबण्याचा प्रयत्न केला. आणि काही वेळातच याची भनक पुरातत्व विभागाला लागली. सुरुवातीला मोनूने दागदागिने मिळल्याच्या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर नंतर एसपी आलोक प्रियदर्शी यांनी एक गोपनीय पथक स्थापन केले.

तपासणी दरम्यान या पथकाला मोनूच्या घरातूनच दागिने मिळाले. अशा परिस्थितीत पोलिसांनी हे दागिने आपल्या ताब्यात घेतली. पुरातत्व विभागासाठी हे प्राचीन दागिने महत्त्वाची असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते.

एका माहितीनुसार, जमिनीतुन सापडलेल्या या दागिन्यांची किंमत 25 ते 27 लाख रुपयांपर्यंत जात होती. यात 650 ग्रॅम सोन्याचे दागिने, 4.5 किलो चांदीचे दागिने होते. त्याशिवाय तीन किलो वजनाचा पितळ धातूपासून बनविलेला लोटाही त्यात सापडला. हे प्रकरण पुरातत्व खात्याशी जोडलेले होते, म्हणून त्या क्षणी त्या वस्तूंवर कोणतीही चौकशी झाली नाही.

दुसरीकडे हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया येत होत्या. एका शेतकर्‍याला जमिनीमधून 25 लाख रुपयांचा खजिना मिळाला आहे यावर लोकांना विश्वास बसत नव्हता. तरी, त्या शेतकऱ्याचा  हा आनंद काही काळच राहिला कारण त्याचा हा खजिना पोलिसांनी ताब्यात घेतला आणि पुरातत्व विभागाकडे सोपविला. आता याला असे म्हणतात की हाथ तो आया पर मुंह ना लगा.

बरं, या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपले काय मत आहे, कृपया टिप्पणी करून आम्हाला नक्की सांगा. तसेच, आपल्याला कधीही असा कोणताही खजिना किंवा पैसा अचानक सापडला आहे का?

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *