हाडे, हृद्य, मजबूत राहील शिवाय पोटाच्या समस्याही दूर होतील… जाणून घ्या चटकदार ‘लिंबाच्या लोणच्या’चे फायदे…आपल्या अनेक आरोग्यविषयक समस्या..

हाडे, हृद्य, मजबूत राहील शिवाय पोटाच्या समस्याही दूर होतील… जाणून घ्या चटकदार ‘लिंबाच्या लोणच्या’चे फायदे…आपल्या अनेक आरोग्यविषयक समस्या..

भारतीय खाद्यपदार्थाचे ताट साधारणपणे लोणच्याशिवाय अपूर्ण मानले जाते. लोणचे खूप मसालेदार असते आणि अन्नाची चव देखील वाढवते. लोणच्यामध्ये बर्‍याच प्रकारचे मसाले वापरले जातात, जे लोणच्याची चव आणखी वाढवतात

लोणच्याचे बरेच प्रकार आहेत, पण लोणच्याचे सर्व प्रकार आरोग्यासाठी फायदेशीर नसतात. काही लोणच्यांमध्ये कमी तेल आणि कमी मसाले वापरळे जातात. लिंबाचे लोणचे हे त्यापैकीच एक लोणचे आहे. यात फक्त मीठ वापरले जाते आणि लिंबाचा रसही शरीरासाठी घातक नाही. चला तर, चटकदार लिंबाच्या लोणच्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया…

रक्त प्रवाह नियंत्रित होतो.:-


निरोगी जीवनासाठी शरीरात रक्ताचा योग्य प्रवाह खूप महत्वाचा आहे. याचे मुख्य कारण असे आहे की, रक्तामध्ये शरीराच्या प्रत्येक भागासाठी लागणारे ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्त्वे असतात.

रक्तातील चढ-उतारांमुळे उच्च किंवा निम्न रक्तदाबाची समस्या येऊ शकते. लिंबाच्या लोणच्यामध्ये तांबे, पोटॅशियम, लोह आणि कॅल्शियम हे घटक आढळतात. हे सर्व घटक रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.

हाडे मजबूत होतात:-


निरोगी जीवनासाठी शरीरात रक्ताचा योग्य प्रवाह खूप महत्वाचा आहे. याचे मुख्य कारण असे आहे की, रक्तामध्ये शरीराच्या प्रत्येक भागासाठी लागणारे ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्त्वे असतात. रक्तातील चढ-उतारांमुळे उच्च किंवा निम्न रक्तदाबाची समस्या येऊ शकते. लिंबाच्या लोणच्यामध्ये तांबे, पोटॅशियम, लोह आणि कॅल्शियम हे घटक आढळतात. हे सर्व घटक रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते:-


कोरोना व्हायरस आणि इतर रोग टाळण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवणे फार महत्वाचे आहे. असे बरेच घटक आहेत, जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. लिंबाच्या लोणच्यात अँटीऑक्सिडेंट्स आणि व्हिटामिन बी कॉम्प्लेक्स असतात, जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

हृदय निरोगी राहते:-


हृदय हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. तो रक्त पंप करतो आणि शरीराच्या सर्व भागात पाठवतो. जंक फूडचे सेवन केल्याने हृदयावर परिणाम होतो आणि बरेच रोग देखील होतात. परंतु संतुलित आहार घेतल्यास हे टाळता येते. लिंबाच्या लोणमध्ये चरबी आणि कोलेस्ट्रॉल नसते. त्याचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहते.

पाचक प्रणाली:-


कमकुवत आहार आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक पाचक समस्या उद्भवतात. लिंबू लोणचे या समस्या टाळण्यासाठी फायदेशीर आहे. यात एंजाइम असतात, जे शरीरातील टॉक्सिक घटक काढून टाकण्यास मदत करतात. यामुळे पाचक प्रणाली मजबूत राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते.

लिंबाप्रमाणेच लिंबाची सालही अत्यंत फायदेशीर असते. तर मग आता लिंबाची साल फेकून देण्याची चूक करू नका. तर ती अशी उपयोगात आणा.

लिंबाच्या सालीत व्हिटॉमिन ए, सी, पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर यांसारखे अनेक पोषकघटक असतात. मेडिकल एक्सपर्ट्सनुसार लिंबाची सालही लिंबू पाण्यापेक्षा अधिक उपयुक्त असते.

व्हिटॉमिन सी आपल्या त्वचेसाठी अत्यंत गरजेचे आहे. लिंबाच्या सालीत ते भरपूर प्रमाणात असते. याच्या वापरामुळे त्वचेचा कॅन्सर, हृदयाचे आजार दूर होण्यास मदत होते.

महत्त्वाचे म्हणजे ताण दूर करण्यास लिंबाच्या सालीची मदत होते. यात काही प्रमाणात फ्लेवानॉयड असते. त्यामुळे आपला ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस दूर होतो.

बदलत्या काळानुसार आपली जीवनशैलीही अत्यंत बदलली आहे. अधिकतर लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी लिंबाची साल उपयुक्त ठरते.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *