सावधान! अगरबत्ती मुळे होऊ शकतात हे गंभीर रोग…. संशोधनातून आले समोर…होऊ शकतो हा गंभीर कॅन्सर…त्यामुळे त्वरित सावध व्हा अन्यथा

सावधान! अगरबत्ती मुळे होऊ शकतात हे गंभीर रोग…. संशोधनातून आले समोर…होऊ शकतो हा गंभीर कॅन्सर…त्यामुळे त्वरित सावध व्हा अन्यथा

पूजाअर्चा, सण- समारंभ म्हटले की भारतीय घरा-घरात उद्बत्तीचा मंद  सुगंध दरवळतो.  अगरबत्ती लावल्याशिवाय पूजा संपन्न झाल्यासारखे वाटतच नाही.  पण अतिप्रमाणात किंवा काही विशिष्ट लोकांना अगरबत्तीचा त्रास होऊ शकतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ?  म्हणूनच या ‘7’ समस्यांपासून दूर राहण्यासाठी अगरबत्ती  जाळण्यापूर्वी नक्की विचार करा.

घरात देवासमोर अगोदर दिवा आणि अगरबत्ती लावून तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करत असाल तर थोडा वेळ थांबा आणि विचार करा… अगरबत्तीचा सुवास तुमच्या घरात दरवळत असेल पण, कदाचित हीच अगरबत्ती तुमच्या आणि कुटुंबीयांच्या जीवाला धोकादायक ठरू शकते.

प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात घरात अगरबत्त्या जाळल्या तर त्यांचा धूर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. पाहुयात… कसा परिणाम होतो या अगरबत्त्यांचा तुमच्या आरोग्यावर…

 वैज्ञानिक काय म्हणतात:-

उद्बत्तीचा धूर असह्य झाल्यास अनेकदा काही जण सतत शिंकताना किंवा खोकताना तुम्ही पाहिलं असेल… बाजारात स्वस्त मिळतात म्हणून घरात अगरबत्त्या आणून जाळल्या तर त्यांमध्ये असलेलं कार्बन मोनोक्साईड घरात पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे फुफ्फुसांच्या पेशींचे नुकसान होऊन श्वसनाचे विकार जडण्याची शक्यता असते.

अस्थमाचा त्रास होतो:-
जळणार्‍या अगरबत्तीमधून कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन अशी प्रदूषक श्वासनलिकेच्या मार्फत तुमच्या फुफ्फुसात जातात… सतत असा दूर श्वासनलिकेतून फुफ्फुसात गेल्यास अस्थमाचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही रुग्णांमध्ये अगरबत्तीचा धूर सिगारेटइतकाच त्रासदायक असतो.

त्वचा विकार जडण्याची शक्यता 
दीर्घकाळ अगरबत्तीचा धूर श्वसनाच्या मार्गातून फुफ्फुसात गेल्यास त्वचेसोबतच डोळेदेखील चुरचुरण्याची शक्यता लहान मुलांमध्ये व वयोवृद्धांमध्ये आढळते. सरोज सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल्सचे प्रमुख त्वचारोगतज्ञ डॉ. अनील गांजो यांच्या मते, अगरबत्तीमुळे नाक, पापण्या अशा नाजूक त्वचा असलेल्या भागांवर अ‍ॅलर्जी दिसण्याची शक्यता अधिक असते. अगरबत्तीच्या धूरामुळे अशा ठिकाणि खाज येणे, अ‍ॅलर्जी उठणे दिसून येते.

मज्जासंस्थेचे कार्य बिघडते
अगरबत्तीच्या धुराचा तुमच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो. यामुळे डोकेदुखी, एकाग्रता न होणे, विसरभोळेपणा वाढणे अशा समस्या  वाढतात. अगरबत्तीमुळे घरात प्रदूषण वाढते.अनेक घातक प्रदूषकांमुळे मेंदूचे कार्य प्रभावित होण्याची शक्यता असते.

श्वसनाच्या कर्करोगाची शक्यता वाढते
अगरबत्तीमुळे कर्करोग होऊ शकतो. हा विचार तुम्ही केलात का? जर्नल ऑफ अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, दीर्घकाळ अगरबत्तीच्या धुरात राहिल्यास अप्पर रेस्परेटरी ट्रॅकचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक बळावते.


संशोधकाच्या मते याचा धुरामुळे कर्करोग आणि मेंदूमध्ये गाठ ट्यूमर होण्यासारखे आजार उद्भवू शकतात. दक्षिण चीन तंत्रज्ञान विद्यापीठातसाऊथ चीन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी संशोधन करण्यात आले.

त्यामध्ये असलेले रसायन डीएनए मध्ये बदल करण्याबरोबरच शरीरात जळजळ आणि कर्करोगाच्या धोक्याला वाढवू शकतात. ब्रिटिश लंग्स फाउंडेशनचे वैधकीय सल्लागार डॉक्टर निक रॉबिन्सन म्हणाले की धूप कांडीच्या धुरासह अनेक प्रकारचे धूर ही विषारी असू शकतात. एक दुसऱ्या संशोधनानुसार उदबत्ती आणि धुपकांडीच्या धुरामध्ये अनेक प्रकारचे आढळणारे पॉलिएरोमॅटीक हायड्रोकार्बन पीए) मुळे दमा, कर्करोग,डोकेदुखी आणि खोकला होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते.

वास्तविक, उदबत्तीला बनविण्यासाठी बरीच प्रकाराची तेल, रसायन, लाकूड, बनावटी अत्तर आणि इतर बऱ्याच वस्तू वापरल्या जातात. उदबत्तीमध्ये बेंझिन, ब्युटाडाइन आणि बेंझो पायरेन घटक जास्त प्रमाणात असतं. या रसायनांमुळे ल्युकेमिया आणि फुफ्फुस, त्वचा,आणि मूत्राशयाचे कर्करोग होऊ शकतात.

तथापि शास्त्रज्ञाचा मतानुसार बांबू जाळल्याने आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. उदबत्ती बांबूच्या कांडीवर रासायनिक घटकांचे वापर करून बनविली जाते. या मध्ये बनावटी अत्तर मिसळतात. हे जाळल्याने बांबू देखील पेटतो आणि अत्तर देखील. बांबूमध्ये शिसे आणि भारी धातू आढळते. दोन्ही घटके जळल्याने हानिकारक घटक आपल्या श्वासेतून शरीरात पोहोचतात जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *