मोड आलेले कडधान्ये खाण्याचे आरोग्यदायी असे फायदे…आपण अनेक रोगांना या प्रकारे ठेवू शकता दूर…रोज सकाळी याप्रकारे करा त्याचे सेवन

मोड आलेले कडधान्ये खाण्याचे आरोग्यदायी असे फायदे…आपण अनेक रोगांना या प्रकारे ठेवू शकता दूर…रोज सकाळी याप्रकारे करा त्याचे सेवन

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा बाहेरचे पदार्थ खाण्यास प्राधान्य दिले जाते. त्यातही पिझ्झा, बर्गरसारख्या जंक फूडला जास्त मागणी असते. पण अशा खाण्यातून शरीरास आवश्यक पोषक घटक पुरेशा प्रमाणात मिळत नाहीतच उलट त्याचा शरीराला त्रासच होतो आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

चांगल्या आरोग्यासाठी पोषक अन्न खाणे गरजेचे असते. त्यासाठी रोजच्या आहारात पालेभाज्यांबरोबरच कडधान्यांचा वापर करणे गरजेचे आहे. त्यातही मोड आलेली कडधान्ये म्हणजे स्प्राऊट्स  आपल्या आरोग्यासाठी चांगली असल्याने रोजच्या आहारात त्यांचा समावेश असणे गरजेचे असते.


आपल्याकडे महाराष्ट्रात कडधान्यांना मोड आणून खाण्याची जुनी आणि चांगली परंपरा असून ती खरोखरच आरोग्यदायी आहे. मोड न काढलेल्या कडधान्यामध्ये टॅनीन, फायटीक एसिड आणि ट्रिप्सीन इनहीबीटर ही तीन अशोषक द्रव्ये असतात. टॅनीनमुळे लोहाच्या शोषणात अडथळा होतो आणि फायटीक आम्लामुळे चुन्याचे शोषण कमी होते. ट्रिप्सीन इनहिबीटरमुळे ट्रिप्सीन नावाच्या एन्जाइम (विकर) निर्मितीमध्ये अडथळा येतो.


त्यामुळे कडधान्यांचे पचन नीट होत नाही आणि पोट जड होते. कडधान्य रात्रभर भिजत ठेवली तर त्यातील टॅनीन आणि फायटीक एसिडचे प्रमाण कमी होते. ती मोड आणून चांगली शिजवल्यानंतर ट्रिप्सीन इनहिबीटरचाही नाश होतो.

अशोषक अथवा घातक द्रव्ये पूर्णपणे नष्ट होण्यासाठी कडधान्ये शिजवताना त्यामध्ये आमसूल आणि चिंच यासारखे थोडेसे आंबट पदार्थ टाकले जातात. तसेच ती ती तेलात तळून शिजवण्याऐवजी वाफेवर शिजवल्याने त्यातील पोषकतत्त्व कायम राहतात. वास्तविक मोडाची सर्वच धान्य आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यातही मोड आलेली मटकी आणि मुग पचायला हलके आणि आरोग्यासाठी उत्तम असतात.

मोडाच्या धान्यांमध्ये ए, बी, सी, डी आणि के व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असते. त्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि लोहही असते. फायबर, फॉलेट, ओमेगा 3 फॅटी एसिडदेखील असतात. त्यातून शरीराला पुरेसे पोषक घटक मिळतात. अनेक प्रकारची तृणधान्य, कडधान्य, विविध डाळी, बिया, फळांच्या बियांना मोड आणून त्यांचा आहारात समावेश करता येतो.

मूत्रपिंड रोग


अंकुरित धान्याचे सेवन केल्यामुळे ह्रदयरोगाची समस्या दूर होते. यासाठीच रोज तुमच्या आहारात  एका तरी अंकुरित धान्याचा समावेश करा. अंकुरित धान्यामुळे ह्रदयविकार येण्याचा धोका कमी प्रमाणात होतो. अंकुरित धान्यामधील पोषततत्त्व रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवतात. ज्यामुळे ह्रदयरोगापासून तुमचा बचाव होतो.

अंकुरित धान्य सेवन करताना कोणती सावधगिरी बाळगावी:-

धान्य भिजवताना ते  आधी व्यवस्थित निवडून घ्या, धान्यात भेसळ नसल्याची खात्री करून घ्या धान्य भिजत ठेवण्यापूर्वी ते दोन ते तीन वेळी धुवून स्वच्छ करा, धान्य शिजवताना ते तेलात तळण्याऐवजी वाफेवर शिजवा. ज्यामुळे त्यातील पोषकतत्त्व नष्ट होणार नाहीत. मोड आलेले धान्य जास्त दिवस ठेवून खाऊ नका बाजारात विकत मिळणारे मोड आलेले धान्य खरेदी करण्याऐवजी घरातच धान्य भिजत ठेवून त्याला मोड आणा.

स्प्राउट्स खाण्याचा योग्य मार्ग:-


सकाळी नाश्ता करताना अंकुरित धान्य खाणे नेहमीच चांगले असते. कारण त्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश आणि उत्साही राहता. शिवाय सकाळी नाश्ता करताना अंकुरित धान्य खाण्यामुळे तुम्हाला दिवसभर वारंवार भुक लागत नाही. मात्र रात्रीच्या वेळी अंकुरित धान्य खाण्याचा त्रास होऊ शकतो. रात्री असे  पदार्थ खाण्यामुळे अपचन होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी रात्री अंकुरित धान्य खाण्याऐवजी दुपारच्या जेवणात त्याचा समावेश करा.

अंकुरित धान्य खाण्यामुळे होणारे दुष्परिणाम:-

अंकुरित धान्य जरी तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असले तरी अती प्रमाणात अंकुरित धान्य खाणे नक्कीच योग्य नाही. अती प्रमाणात  अंकुरित धान्य खाण्यामुळे पोटात गॅस, अपचन होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तुम्हाला पित्त अथवा अॅसिडिटीचा त्रास असेल रात्रीच्या वेळी अंकुरित धान्य मुळीच खाऊ नका.

अकुंरित धान्य तयार करण्याची योग्य प्रकिया कोणती:-

पाच ते सहा तास एखादे धान्य भिजवून मग ते रात्रभर एका स्वच्छ ओल्या कापडात गुंडाळून ठेवू शकता. ओल्या कापडाच्या उबदारपणामुळे धान्याला मोड फुटतात. कडधान्य भिजवण्यापूर्वी आधी ते चार ते पाचवेळा स्वच्छ धुवून घ्या.

रात्रभरात धान्याला मोड फुटू शकतात. हिवाळ्यात मोड उगवण्यास वेळ लागतो. मात्र उन्हाळ्यात हिच प्रक्रिया अगदी जलद पद्धतीने होते. आजकाल धान्याला मोड आणण्यासाठी काही भांडी तयार करण्यात आली आहेत. बाजारात ही भांडी सहज उपलब्ध  असतात. तुम्ही या भांड्याच्या मदतीनेदेखील धान्याला मोड आणू शकता.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *