आपल्या यकृतासाठी घातक आहेत हे पाच पदार्थ…आजच आपल्या आहारातून या गोष्टी काढून टाका…नाहीतर आपले यकृत निकामी झालेच समजा.

आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा खूप महत्वाचा असतो. जर आपल्या शरीराचा कोणताही भाग निकामी झाला तर शरीर अनेक प्रकारच्या रोगांना निमंत्रण देते. यामुळे, शरीराच्या प्रत्येक भागाची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. आपण सध्या आपल्या शरीराच्या बाहेरील अवयवांकडे खूप लक्ष देतो, परंतु शरीराच्या अंतर्गत अवयवांचे कार्य व्यवस्थित चालू आहे की नाही याची सुद्धा काळजी घेणे फार महत्वाचे आहे.
अशा परिस्थितीत यकृत देखील आपल्या शरीराचा एक विशेष अवयव आहे ज्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. यकृत खराब झाल्यास शरीराच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. आपण बर्याचदा आपल्या जेवणाकडे लक्ष देत नाही आणि अनवधानाने आपल्या यकृताला त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागते. चला तर मग जाणून घेऊ की आपल्या आहारात असे कोणते पदार्थ आहेत ज्यामुळे आपल्या यकृताला मोठे नुकसान होऊ शकते.
साखर:-
आपण दिवसरात्र चहा, खीर असे अनेक जास्त प्रमाणात साखर असलेले पदार्थ खातो यामुळेच यकृताचे जास्तीत जास्त नुकसान होते. साखर आपल्या आरोग्यासाठी सर्वात वाईट असते. साखरेला पांढरे विष म्हणतात. साखरेमुळे शरीराचा लठ्ठपणा वाढवतोच शिवाय त्याचा यकृताच्या कार्यावरही वाईट परिणाम होतो. ब्राऊन शुगर खाल्ल्यानेही खूप असा आपल्याला फा-यदा होत नाही. शक्य असेल तेथे साखरेचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करा. साखरेऐवजी आपण गुळाचे सेवन करू शकता.
मसाले:-
भारतात राहून ही गोष्ट टाळणे थोडे अवघडच आहे. तरी, मसाले यकृताचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. जास्त तिखट मसालेदार जेवणाचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. कधीकधी अति मसाल्यांचा वापर योग्य नसतो, परंतु दररोज मसालेदार जेवण करणे योग्य मानले जात नाही. आवश्यकतेपेक्षा जास्त मसाले वापरू नये.
दारू:-
कोणती ही गोष्ट मर्यादेत घेतली तर ती शरीरासाठी चांगली असते पण त्याच्या अति सेवनामुळे शरीराची हानी होते. अशा परिस्थितीत अल्कोहोल मर्यादित प्रमाणात घेणे शरीरासाठी चांगले आहे. पण, आपण अल्कोहोलचे अधिक सेवन करण्यास सुरवात केली तर त्याचे यकृतावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे अल्कोहोलचे सेवन न केलेले कधीही चांगले.
व्हिटॅमिन सप्लीमेंट:-
आपण बर्याचदा ऐकले असेल की आपल्या शरीरासाठी जीवनसत्त्वे खूप महत्वाची असतात. आणि ही जीवनसत्त्वे आपणाला फळे किंवा जेवणाच्या माध्यमातून मिळतात. जर आपल्या शरीरात जीवनसत्वाची कमी असेल तर बऱ्याचदा आपल्याला डॉक्टर गोळ्या व टॅबलेट खाण्यास देतात. तथापि, अशा गोळ्याचा यकृतावर देखील गंभीर परिणाम होतो. यातही आपण व्हिटॅमिन ए घेतल्यास ते आपल्या शरीरासाठी खूप धोकादायक ठरू शकते.
सॉफ्ट ड्रिंक:-
जरी आपल्याला उन्हाळ्यात सॉफ्ट ड्रिंक घेतल्यावर आराम वाटत असला तरीही सॉफ्ट ड्रिंक आपल्या संपूर्ण शरीरासाठी खूप हानिकारक आहे. अशा प्रकारचे पेय आपल्या शरीरावर वाईट परिणाम करते. तसेच, ते यकृतासाठी सुद्धा खूप घातक साबित होते. यात साखरेचे प्रमाण खूप असते त्यामुळे यकृतावर त्याचा गंभीर परिणाम होतो.