जर आपण सुद्धा तांब्याच्या भांड्यातील या गोष्टी सेवन करत असाल…तर त्वरित सावध व्हा…नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. निरोगी राहण्यासाठी, तांब्याच्या पात्रात रात्रभर पाणी ठेवण्याची शिफारस केली जाते आणि सकाळी ते सेवन केले जाते. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पोट, यकृत आणि मूत्रपिंडासाठी फायदेशीर आहे.
तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याचे सेवन करून पाचन तंत्र योग्यरित्या कार्य करते. रोज तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सेवन केल्यास आपले वजनही कमी होते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु अशाही काही गोष्टी आहेत ज्या तांब्याच्या भांड्यात खाऊ नयेत. तांबेच्या भांड्यांमध्ये या गोष्टींचे सेवन केल्यास आपल्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात.
चला तर मग जाणून घेऊया तांबेच्या भांड्यांमध्ये कोणत्या गोष्टी खाऊ नयेत.
दही- दह्यात पोटाचे आजार बरे करणारे बॅक्टेरिया लॅक्टोबेसिलस हे असतात. पण जर दही तांब्याच्या भांड्यात ठेवले तर त्याचा उलट परिणाम आपल्यावर होतो.
दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ तांब्याच्या भांड्यात ठेवू नयेत किंवा या भांड्यातून सेवन करू नये. यामुळे त्यातले सर्व पोषक तत्वे तर नष्ट होतातच शिवाय उल्टी, अपचन, अतिसार यांसारखे पोटाचे विकार सुद्धा होतात.
लोणचं- तांब्याच्या भांड्यात लोणचं ठेवल्यास ते विषारी बनते, ते लोणचं खाल्ल्यास आपल्या पोटात जळजळ, अॅसिडीटी, अपचन, अतीसार अशा अनेक समस्या निर्माण होतात. तांब्याच्या भांड्यात लोणचं ठेवल्यास ते लवकर खराब होतं. त्यामुळे लोणच्यासारख्या आंबट- गोड गोष्टी मातीच्या भांड्यात ठेवाव्यात.
लिंबाचा रस- तांब्याच्या भांड्यात पाणी पिणं हे फायदेशीर आहे हे आपल्याला माहीत आहे. पण तांब्याच्या भांड्यात लिंबाचा रस प्यायल्यास आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतं. लिंबात असलेले नैसर्गिक सायट्रिक अॅसिड तांब्यासोबत एकत्र होतं आणि त्याचा वाईट परिणाम शरीरावर होतो.
ठेवा स्वच्छता
तांब्याची भांडी नेहमी स्वच्छ ठेवा जेणेकरून कॉपर ऑक्साइडची बर त्यावर येणार नाही कारण असे झाल्यास ते शरीरासाठी हानीकारण ठरू शकते. जर असे झाल्यास भांड्यात टाकलेल्या पाण्याचा संपर्क ताब्याशी होत नाही आणि तुम्हाला जसेच्या तसे पाणी प्यावे लागते.
भांडी वापरताना घ्या ही काळजी
जास्त तर घरांमध्ये तांब्याच्या जगांचा आणि ग्लासाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र जर हे जमिनीवर ठेवले तर याचा तुम्हाला कोणताच फायदा मिळणार नाहो त्यामुळे जमिनीचा आणि तांब्याचा संपर्क येणार नाही अशा प्रकारे ही भांडी ठेवा.