जर आपण पण लठ्ठपणाचे शिकार झाला आहात किंवा आपले सुद्धा वजन खूप वेगाने वाढत आहे…तर आजच करा हे आयुर्वेदीक उपाय….परिणाम आपल्या समोर असतील.

जर आपण पण लठ्ठपणाचे शिकार झाला आहात किंवा आपले सुद्धा वजन खूप वेगाने वाढत आहे…तर आजच करा हे आयुर्वेदीक उपाय….परिणाम आपल्या समोर असतील.

लठ्ठपणा किंवा वजन वाढणे ही आजची सर्वात मोठी समस्या आहे आणि जगभरातील कोट्यावधी लोक या समस्येने त्रस्त आहेत. लठ्ठपणाची अनेक कारणे असू शकतात यामध्ये जास्त फॅट असलेले पदार्थ खाणे, व्यायाम न करणे अशी अनेक कारणे लठ्ठपणामागे असू शकतात. पण वास्तविक, शारीरिक हालचालींच्या अभावामुळे आपल्या शरीरात चरबी जमा होण्यास सुरवात होते, ज्यामुळे आपला लठ्ठपणा वाढतो.

लठ्ठपणा हा शारीरिक आणि मानसिक पातळीवर आपल्या जीवनात बरेच बदल आणतो. त्यामुळे जर आपण योग्य वेळी त्याची काळजी घेतली नाही तर आपल्याला  भविष्यात अनेक हानिकारक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. चला तर मग आज या लेखाद्वारे आपण अशा पाच गोष्टींबद्दल जाणून घेऊ ज्यांच्या सेवनाने आपला लठ्ठपणा कमी होऊ शकतो

प्रतीकात्मक तस्वीर

तूप आणि लिंबू गरम पाण्याचे सेवन:-
जर आपल्याला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर यासाठी दररोज सकाळी तूप आणि लिंबू कोमट पाण्यात मिसळून त्याचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील चयापचय वाढते, ज्यामुळे आपल्याला वजन कमी होण्यास मदत होते. तज्ञ डॉक्टर देखील याची शिफारस करतात. यामुळे आपली बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होईल आणि आपल्याला वजन कमी होण्यास मदत होईल.

प्रतीकात्मक चित्र

या गोष्टींपासून बनलेला चहा प्या:-
एक चमचा जिरे, एक चमचे बडीशेप, एक चमचे धणे, एक वेलची आणि थोडा ओवा या सर्व गोष्टी रोज आपल्या सकाळच्या चहामध्ये घालून त्याचे सेवन करावे. दररोज सकाळी हे मिश्रण रिकाम्या पोटी प्यायल्यास आपला लठ्ठपणा कमी होण्यास आपल्याला मदत होईल.

प्रतीकात्मक चित्र

गरम पाण्यात वेलची:-
पाच ते सहा वेलची सोलून घ्या आणि रात्रभर पाण्यात भिजवा आणि सकाळी तेच पाणी गरम करा आणि दिवसातून तीन ते चार वेळा पाण्याचे सेवन आपण करावे ,यामुळे आपल्याला लठ्ठपणा कमी होण्यास मदत होईल.

जेवणापूर्वी भरपूर पाणी प्यावे : आपण दिवसभरात भरपूर पाणी प्यायल्यास आपले वजन नियंत्रित राहते आणि ते कमीसुद्धा होते. जेवणापूर्वी पाणी प्यायल्यामुळे आपली चयापचय क्रिया त्यानंतर सुमारे एक ते दीड तास या काळात २४ ते ३० टक्के वेगवान होते. त्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त कॅलरीज वेगाने वापरल्या जातात आणि  साहजिकच आपले वजन कमी होऊ लागते.

प्रतीकात्मक चित्र

ब्लॅक कॉफी प्यावी : दिवसातून एकदा आणि विशेषकरून नाश्त्याबरोबर जर अजिबात दूध न टाकता, तसेच बिलकूल साखर न घालता एक कप ब्लॅक कॉफी घेतली, तर त्याचा उपयोग वजन कमी करायला होतो.

दूध किंवा साखर नसलेली ब्लॅक कॉफी घेतल्यास आपल्या चयापचय क्रियेची गती ३ ते ११ टक्क्यांनी वाढते आणि त्यामुळे चरबी नष्ट होण्याचे प्रमाण १० ते २९ टक्क्यांनी वाढते. याची परिणती वजन घटण्यात होते असे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे. मात्र, या कॉफीत साखर चुकूनही नको, नाही तर ब्लॅक कॉफीचा हा गुणधर्म नष्ट होईल.

प्रतीकात्मक चित्र

काळी मिरी:-
काळी मिरी आणि आले पाच मिनिटे गरम पाण्यात उकळा आणि नंतर गाळून घ्या. आता त्यात मध आणि लिंबाचा रस मिसळा आणि त्या पाण्याचे सेवन करा यामुळे आपल्याला लठ्ठपणा कमी होण्यास मदत होईल. वास्तविक, काळ्या मिरीमध्ये उपस्थित पाइपरिन चरबी जाळण्यास आपल्याला मदत करते.

ग्रीन-टी प्यावा : तसेच काळ्या कॉफीप्रमाणे ‘हिरवा चहा’ देखील वजन उतरवायला आपल्याला मदत करतो. ग्रीन-टीमध्ये अगदी कमी स्वरूपात कॅफीन असते, पण त्यात कॅटेचिन नावाचे अत्यंत उपयुक्त असे अॅंटिऑक्सिडंट द्रव्य असते. हे द्रव्य कॅफीन समवेत कार्यरत होऊन आपल्या शरीरातील चरबीचे ज्वलन घडवून आणते आणि यामुळे स्थूलत्व कमी होते.

तसेच बऱ्याच संशोधनातून असे दिसून आले आहे, की ग्रीन-टी हा चहा म्हणून किंवा काढा म्हणून नियमित घेतल्यास त्याने आपले वजन घटण्यास मदत होते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *