जर आपल्याला सतत थकवा जाणवत असेल किंवा सतत जांभई येत असेल…तर त्वरित सावध व्हा नाहीतर आपल्या मेंदूवर होऊ शकतो आघात…त्वरित करा हे उपाय

जांभई येणे ही आपल्या शरीराची एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे जी प्रत्येक मानवावर होते. आपल्याला बर्याच वेळेस असे वाटते की जेव्हा जेव्हा आपण दुसर्याला जांभई देताना पाहतो तेव्हा आपणाला सुद्धा जांभई येऊ शकते घेता. काही जांभई क्षणीक असून काहीवेळा एकादी जांभई काही सेकंदांची असते.
मात्र अनेकदा आपल्याला सततही जांभई येते. २०१३ मध्ये इंटरनॅशनल जर्नल ऑफ अप्लाइड अँड बेसिक मेडिकल रिसर्चमध्ये एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की जांभई आपल्या मेंदूचे तापमान नियंत्रित करण्यास आपल्याला मदत करते. तथापि, वारंवार किंवा जास्त प्रमाणात जांभई येणे हे शरीरातील बर्याच समस्यांचे कारण असू शकते. जर आपल्याला सुद्धा सतत जांभई येत असेल तर मग या गोष्टीची लक्षणे असू शकतात.
थकवा येणे:-
जर आपल्याला सतत जांभई येत असेल आणि आपण खूप थकलेले असाल, पण जर हे आपल्या सोबत वारंवार घडत असेल तर आपण डॉक्टरांकडून आपली तपासणी करुन घ्यावी. हे शरीरातील इतर कोणत्याही समस्येचे कारण देखील असू शकते. सर्वसाधारणपणे अपूरी झोप, थकवा, कंटाळा आदी कारणांमुळे जांभई येते, असे म्हटले जाते. पण वारंवार जांभई येत असेल तर त्यामागे अनेक धोके असू शकतात.
एका संशोधनानुसार, वारंवार जांभई येणं हे ब्रेन ट्युमरचेही संकेत देतात. त्याचप्रमाणे ह्रदय विकाराचा झटका येणे, एपिलेप्सी, शरीरातील तापमान नियंत्रित नसणे, इत्यादी समस्या जांभईमुळे डोकंवर काढतात. त्यामुळे वेळेतच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
एपिलप्सी:-
एपिलप्सी ही एक कंडीशन असून मेंदूच्या काही भागाचे कायमस्वरूपी नुकसान झाल्याने त्याची निर्मिती होते. त्यामुळे मेंदूकडून दिल्या जाणार्या संकेतांपैकी एक म्हणजे जांभई ! त्यामुळे चाचणी करून त्याचे निदान करणे अधिक फायदेसहीर ठरते. प्रामुख्याने मेंदूचे कार्य मंदावल्याने हा जांभईचे प्रमाण वाढते.
काही औषधांचा दुष्परिणाम :-
आरोग्य विषयक काही समस्या वगळता औषधांच्या परिणामामुळे देखील मरगळ किंवा सुस्ती येऊ शकते. यामुळे जांभई येण्याचे प्रमाण वाढते. अॅन्टी डीप्रेसंट, काही पेनकिलर यांमुळे जांभई येऊ शकते.
वारंवार जांभया येत असतील तर झोप अपुरी झाली असल्याचे हे लक्षण असल्याचे आपण मानतो. मात्र केवळ झोप अपुरी झाली असली तरच सतत जांभया येतात असे नाही. यामागे अन्य काही कारणेही असू शकतात. ही कारणे जाणून घेऊ या. सातत्याने येणाऱ्या जांभया हे मानसिक तणावाचे लक्षण असू शकते. मानसिक तणाव जास्त असेल, तर त्याचा परिणाम मेंदूच्या सक्रियतेवरही होत असतो. त्यामुळे मेंदूला सक्रीय ठेवण्यासाठी प्राणवायूचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी वारंवार जांभया येऊ लागतात.