जर आपल्याला सुद्धा आपल्या फुफ्फुसांना तसेच यकृताला निरोगी ठेवायचे असेल…तर आजचं करा हे उपाय…आपले निरोगी आयुष्याकडे एक पाऊल पडलेच समजा

जर आपल्याला सुद्धा आपल्या फुफ्फुसांना तसेच यकृताला निरोगी ठेवायचे असेल…तर आजचं करा हे उपाय…आपले निरोगी आयुष्याकडे एक पाऊल पडलेच समजा

यकृत व फुफ्फुसे तुमच्या शरीरातील महत्वाचे अवयव असून त्यांची निगा राखणे फार गरजेचे आहे.बदललेली जीवनशैली व चुकीचा आहार यामुळे आपणच या अवयवांचे नुकसान करत असतो.मात्र काही पदार्थ खाण्याने या अवयवांचे नुकसान नक्कीच टाळता येऊ शकते.

सुपरफूड्स व्हिटॅमिन व मिनरल्स या पोषणमुल्यांनी परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्या सेवनामुळे आजार दूर ठेवणे व निरोगी आयुष्य जगणे शक्य होते.या सुपरफूडमध्ये भाज्यांसह मासे व दूधाचे पदार्थ देखील असू शकतात. या पदार्थांमुळे विशेषत: तुमच्या शरीरातील यकृत व फुफ्फुसे या महत्वाच्या अवयवांचे कार्य सुधारते.

हळद:-

भारतीय व दक्षिण आशियायी भागात स्वयंपाकासाठी प्राचीन काळापासून हळद हा मसाल्याचा पदार्थ वापरण्यात येतो.हळदीमध्ये असलेल्या सक्रिय Curcumin घटकांमध्ये जखमा ब-या करण्याची क्षमता असते.हळद अन्टीऑस्किडन्ट,अन्टी-इनफ्लै मटरी,अन्टीबायोटीक व रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक असतात.तसेच हळदीमध्ये अन्टी-कॅन्सर,

अन्टी-कोलेस्टे रॉलेमिक व हेपेटोप्रोटेक्टीव्ह घटक देखील असतात.अन्नाचे पचन व शरीरातील फॅट्स कमी करण्यासाठी यकृतातील पाचकरसाला हळदीमुळे चालना मिळते.फॅटी लिव्हर डिसीज मध्ये यकृताच्या पेशींमध्ये होणारा दाह यामुळे कमी होतो.काही अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की हळदीमध्ये असलेल्या या घटकामुळे अति धुम्रपानामुळे फुफ्फुसांमध्ये साठणारा Plaque कमी होतो ज्यामुळे चैन स्मोकर व्यक्तीला फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याचा धोका असतो.

गिलोय आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. याद्वारे आपण बर्‍याच आजारांपासून दूर राहू शकतो. कोरोना कालावधीत, लोकांमध्ये त्याची मागणी खूप मोठी आहे, कारण यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती बळकट होण्यास खूप मदत होऊ शकते.

इतकेच नाही तर गिलोयमध्ये आढळणारी अँटीमाइक्रोबियल गुणधर्म फुफ्फुसांना विषाणूंमुळे होणा-या आजारांपासून वाचविण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त, गिलोयचे सेवन जळजळ कमी करण्यास देखील मदत करते. आरोग्य माहिती वेबसाइट १ एमजी डॉट कॉमच्या मते, आयुर्वेद,

आचार्य यांचे आचार्य बालकृष्ण आणि योगगुरू बाबा रामदेव यांचे म्हणणे आहे की गिलॉय विषयी आयुर्वेदिक ग्रंथांमधून बर्‍याच फायद्याच्या गोष्टीही समोर आल्या आहेत. ते म्हणतात की आयुर्वेदात गिलॉय हे एक केमिकल मानले जाते जे आरोग्यासाठी चांगले आहे.

ओमेगा ३ युक्त पदार्थ-ओमेगा ३ युक्त पदार्थ यकृताच्या कार्यामधील  ची पातळी कमी करतात.यामुळे लठ्ठ व मधूमेहींच्या यकृताचे नुकसान होण्यापासून बचाव करता येतो.या पदार्थांमुळे श्वसनमार्ग मजबूत होतो त्यामुळे श्वसनविकारांपासून बचाव करता येतो.ओमेगा ३ युक्त पदार्थांमध्ये बदाम,पिस्ता,अक्रोड,फ्लॅक्स सीड,चीया सीड,सोयाबीन,पालक, सारखे फॅटी फीश यांचा समावेश असतो.

व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ-व्हिटॅमिन सी असलेले पदार्थांमुळे एन्झाइमची निर्मिती वाढते ज्यामुळे यकृताचे नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्सिफीकेशन करणे सोपे होते व फुफ्फुसांमधून संपूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होतो.जसे की द्राक्ष,किवी,पेरु,संत्री व लिंबासारखी लिंबूवर्गीय आंबट फळे,स्टॉबेरी,अननस,लाल व हिरवी सिमला मिरची

हिरव्या पालेभाज्या-हिरव्या पालेभाज्या कच्चा,वाफवून अथवा त्यांचा रस करुन आहारात घेतल्याने यकृत व फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते.या भाज्यांमध्ये हरितरंगद्रव्य मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्याचा यकृत व फुफ्फुसांमधील रक्त शुद्ध करण्यास मदत होते.या

भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर डिटॉक्सिफीकेशन करण्याची क्षमता असल्याने त्यामुळे यकृताचे संरक्षण करता येते.या भाज्यांमध्ये मॅग्नेशियम व पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे फुफ्फुसे निरोगी रहाण्यास मदत होते.यासाठी आहारात पालक,लेट्यूस,कोबी,मस्टर्ड ग्रीन,पातीचा कांदा,गव्हाकुंर, पुदिना व कोथिंबिरीची पाने यांचा समावेश करा.

लसूण-लसणामध्ये सल्फर,एलिसिन व सेलेनियम चे प्रमाण भरपूर असल्यामुळे त्याचा यकृतातील इन्झायमी सक्रिय करुन शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकण्यास मदत होते.लसणामधील अन्टी-इनफ्लैमटरी व इन्युन बिल्डींग प्रॉपर्टीजमुळे अस्थमा व फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *