जेव्हा ऑक्सिजनची पातळी कमी होते तेव्हा कापूर, लवंग,ओव्याचा वास घेणे आहे फायदेशीर , या दाव्याचे सत्य घ्या जाणून 

जेव्हा ऑक्सिजनची पातळी कमी होते तेव्हा कापूर, लवंग,ओव्याचा वास घेणे आहे फायदेशीर , या दाव्याचे सत्य घ्या जाणून 

संपूर्ण देश सध्या कोरोना विषाणूच्या साथीने  लढत आहे आणि 24 तासांत 3 लाख कोरोनाची नवीन प्रकरणे समोर आली आहेत. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सरकार लोकांना घरातच राहून मास्क लावण्याचा सल्ला देत आहे. दरम्यान, एक घरगुती उपाय बराच  व्हायरल होत आहे. ज्या अंतर्गत लोकांना कापूर, लवंग, ओवा आणि नीलगिरीचे तेल यांचा वास घेण्यास सांगितले जात आहे .

मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी स्वत: हा उपाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे आणि लोकांना कापूर, लवंगा, निलगिरीचे तेल आणि ओवा यांची छोटी कापडी पिशिवी बनवून आपल्या जवळ  ठेवण्यास सांगितले आहे. या पिशिवीचा वेळोवेळी वास घेत रहा. असा दावा केला जात आहे की या पिशवीचा वास घेतल्याने श्वास घेण्यात त्रास होत नाही आणि शरीरात ऑक्सिजनची पातळी कायम राहते .

मुख्तार अब्बास नक्वी यांनी फेसबुकवर त्याला ‘हेल्थ की पोतली’ असे कॅप्शन दिले आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ‘त्यात नीलगिरीच्या तेलाचे काही थेंब मिसळून कापूर, लवंगा आणि ओवा अशी एक कापडी छोटी पिशवी तयार करा आणि दिवसा-दररोज कामादरम्यान अधूनमधून हुंगणे चालू ठेवा… यामुळे ऑक्सिजनची पातळी कायम राखण्यास मदत होते. त्यांनी पुढे असेही लिहिले आहे की बर्‍याच रुग्णवाहिकादेखील ह्या छोट्या पिशव्या ठेवत आहेत.

हा दावा किती खरा आहे?

हल्ली व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या पिशवीचा उल्लेख केला जात आहे आणि लोकांनी ही पिशवी आपल्याकडे ठेवावी आणि वेळोवेळी त्याचा वास घ्यावा असे सांगितले जात आहे. तथापि, यादरम्यान, बरेच लोक असेही म्हणत आहेत की हा उपाय प्राणघातक आहे आणि त्याचा वास घेण्यामुळे इतर आजार होऊ शकतात. या सामग्रीवर बरेच संशोधन केले गेले आहे. ज्यामध्ये असे मानले गेले आहे की या गोष्टींचा कोरोना विषाणूशी काहीही संबंध नाही.

विज्ञानानुसार, कापूर एक ज्वलनशील पांढरा स्फटिकासारखा पदार्थ आहे. ज्याला तीव्र सुगंध आहे. वेदना आणि खाज सुटल्यास हा  प्रभावी आहे. कापूराने आपले बंद नाक उघडते . ज्यामुळे ते विक्स वेपोरपमध्ये अल्प प्रमाणात वापरले जाते. परंतु कापूर बंद नाक उघडण्यासाठी फायदेशीर आहे की नाही याचा अभ्यास केला गेलेला नाही. आतापर्यंत हा दावा देखील सिद्ध झाला नाही की त्याचा वास घेण्यामुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते. औषधी नसलेला कापूर हानिकारक मानला जातो.

अमेरिकन असोसिएशन ऑफ पॉइझन कंट्रोल सेंटरच्या अहवालानुसार अमेरिकेत कापरामुळे झालेल्या विषाचे जवळपास 9,500 प्रकरणे आढळली आहेत. त्यापैकी 10 लोकांचे जीव धोक्यात आले होते आणि काही लोक यामुळे अपंगही झाले होते. हे संशोधन वर्ष 2018 मध्ये करण्यात आले होते. एफडीए कापूराला जीवघेणा मानतो. यामुळे शरीरात विषबाधा होऊ शकते. ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

लवंग, दालचिनी, जायफळ आणि तुळशीत कंपाऊंड युजेनॉल असते. जे टॉक्सिसिटीचे कारण आहे. लवंगामुळे ऑक्सिजनची पातळी वाढू शकते. हा मुद्दा अद्याप सिद्ध झाला नाही. त्याचप्रमाणेन ओवा आणि निलगिरी तेल याबाबत कोणतेही संशोधन झालेले नाही. ज्यामध्ये असा दावा केला गेला आहे की ते ऑक्सिजनची पातळी वाढवतात.

sarika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *