चवीला कडू पण आरोग्याचे दृष्टीने आहेत हे सर्वात महत्वाचे पदार्थ…याच्या सेवनाने आपले जवळपास अनेक रोग होतात नाहीसे

सध्या, सर्व लोक आपले आरोग्य राखण्यासाठी बर्‍याच गोष्टींचा वापर करतात. काही गोष्टी चवी मध्ये गोड असतात, तर काही गोष्टी चवीमध्ये कडू असतात पण जर तुम्हाला चांगले आरोग्य टिकवायचे असेल तर त्यासाठी चव बघायची  नसते.

बहुतेक लोक स्वादिष्ट खाद्यपदार्थाचे सेवन करतात जे कधीकधी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतात, परंतु अशा काही कडू गोष्टी आहेत ज्यांना चव चांगली नसते, परंतु ते आपल्याला आरोग्याशी संबंधित बरेच फायदे देतात.

कारले कडू चवीची असल्याने अनेकांना आवडत नाहीत. मात्र कारले चवीला जरी कडवट असले तरीही आरोग्यासाठी मात्र खूपच उपयोगी असतात. कारल्यात अनेक आवश्यक पोषकघटक असतात.

कारले हे प्रामुख्याने व्हिटॅमिन-C ने समृद्ध असते. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास, हाडांच्या आरोग्यासाठी आणि जखमा लवकर भरून येण्यासाठी व्हिटॅमिन-C चे महत्वाचे कार्य असते. याशिवाय कारल्यात भरपूर असणारे व्हिटॅमिन-A हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी हितकारक असते.

कारल्यात फायबर्स, फोलेट, पोटॅशियम, झिंक आणि आयर्न (लोह) यासारखी महत्वाची पोषकतत्वेही मुबलक प्रमाणात असतात. तसेच कारल्यात कॅटेचिन, गॅलिक ऍसिड, एपिकॅचिन आणि क्लोरोजेनिक ऍसिड यासारखी महत्वाची अँटिऑक्सिडेंट असतात. ही अँटिऑक्सिडेंट आपल्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात व कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात.
कारले:-


कारले खाण्याचे हे आहेत फायदे:-
रक्तातील साखर आटोक्यात ठेवते..
कारल्याच्या नियमित सेवनाने रक्तातील साखर कमी होते. तसेच टिश्यूजपर्यंत साखर पोहचवून नैसर्गिकरित्या इन्सुलिन स्त्रावाची निर्मिती होण्यासही यामुळे मदत होते. त्यामुळे मधुमेहामध्ये कारले उपयुक्त असते. यासाठी मधुमेही व्यक्तींनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आहारात कारल्याची भाजी जरूर समावेश करावी.

कॅन्सर होण्यापासून रक्षण करते..
कॅन्सरला अटकाव करणारे अनेक घटक कारल्यात असतात. कारल्यात असणाऱ्या कॅटेचिन, गॅलिक ऍसिड, एपिकॅचिन आणि क्लोरोजेनिक ऍसिड अशा महत्वाच्या अँटिऑक्सिडेंटमुळे कॅन्सर होण्यापासून रक्षण होते. यासाठी कॅन्सरसारखा आजार टाळण्यासाठी कारल्याच्या भाजीचा आहारात जरूर समावेश असावा.
कॉफी:-

कॉफीमध्ये असलेलं कॅफेन आपल्या मेंदूमधील डोपामीनची लेवल वाढवतं. त्यामुळे तुमची स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता यांसारख्या मेंदूशी जोडलेल्या क्रिया चांगल्या होतात. तसेच यामुळे तुमची एनर्जी लेव्हलही वाढते.

ब्लॅक कॉफी वजन कमी करण्यासाठी मदत करते. कॅफेन शरीरातील मेटाबॉलिकचे प्रमाण वाढवते. त्यामुळे शरीरातील फॅट लवकर बर्न होतात. तसेच ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन लवकर घटवण्यासाठीही मदत होते.
मेथीचे दाणे:-

तुम्हाला दैनंदिन आयुष्यात सतत लहान सहान सर्दी, खोकला, पोटदुखी, सांधेदुखी असे आजार त्रस्त करत असतील तरत मेथीचे दाणे तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. विशेषतः तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असल्यास, मेथी दाण्याने नक्कीच तुम्हाला आरामदायी वाटतं. यामधील असलेल्या लोह आणि कॅल्शियमच्या पोषक तत्वामुळे हाडांना मजबूती आणि निरोगीपणा मिळतो.

तसंच मेथीच्या दाण्यांमुळे येणारी सूज कमी करण्यासाठी जास्त फायदा होतो. त्यासाठी तुम्हाला एका ग्लासात गरम पाणी घेऊन त्यात मेथी पावडर आणि आल्याची पावडर ज्याला सुंठ म्हणतात एकत्र करून दिवसातून कमीत कमी दोन वेळा प्या. त्यामुळे तुमची सांधेदुखी निघून जाईल. तसंच पोटदुखीसाठी एक चमचा मेथी दाणे तव्यावर भाजून गरम पाण्याबरोबर घ्या. तुमची पोटदुखी बंद होईल.
एपल साइडर विनेगर:-

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा फार पूर्वीपासून औषधाच्या स्वरुपात वापर करण्यात येत आहे. याशिवाय कित्येक प्रकारच्या पाककृतींमध्येही याचा उपयोग केला जातो. निरोगी आरोग्य आणि सडपातळ शरीरासाठी तुम्ही आपल्या डाएटमध्ये अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा समावेश करू शकता. यातील औषधी गुणधर्मामुळे शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जाण्यास मदत मिळते.

ज्यामुळे आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊन राहत नाही. पचन प्रक्रिया सुरळीत सुरू असेल तर आपल्या चेहऱ्यावरही नैसर्गिक चमक येते. या व्हिनेगरमध्ये कमी प्रमाणात कॅलरी असतात. ज्यामुळे आपले वजन देखील नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. पण याचे कसे आणि किती प्रमाणात सेवन करावे, याचा सल्ला डॉक्टरांकडून घेणे आवश्यक आहे

ग्रीन टी:-

आजकाल वजन कमी करण्यासाठी ‘मसाला चहा’ ऐवजी ‘ग्रीन टी’ घेण्याला प्राधान्य दिलं जातं. ग्रीन-टी हे एक ‘आरोग्यदायी पेय’ म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे. इतर चहापेक्षा ग्रीन-टी मध्ये अॅंटिऑक्सिडंट जास्त प्रमाणात असतात.

ग्रीन-टी मधील फायटोकेमिकल्स, पॉलिफेनॉल, इन्झायमी आणि अमिनो अॅसिड तुमच्या  मनाला निवांत करतात. ग्रीन टीमुळे तुमची त्वचा नितळ होते, चयापचयाचे कार्य सुधारते. ग्रीन-टीमुळे केवळ तुमचं मनच शांत होतं असे नाही तर तुमच्या संपूर्ण शरीराच्या स्वास्थासाठी ग्रीन टी फायदेशीरच ठरते.

जगभरात चहा हे पेयं लोकप्रिय आहे. चहाची निर्मिती प्रथम चायना आणि मग भारतात झाली. अनेक शतकांपासून चहाच्या गुणकारी गुणधर्मांवर संशोधन करण्यात येत आहे. थोडक्यात ग्रीन टी हे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असं पेय आहे.

प्रत्येकी आठ औंस अथवा 230 मिली चहामध्ये 30 ते 50 मिली कॅफेनचा घटक असतो. ग्रीन-टीमध्ये कॅफेनचे प्रमाण किती असावे हे पूर्णपणे चहाचे उत्पादन व रोपांची वाढ कोणत्या विभागात झाली आहे यावर अवलंबून असू शकते.

थोडक्यात सांगायचे झाल्यास कोवळी पाने व कळ्यांमध्ये जास्त प्रमाणात कॅफेन असू शकते तर ग्रीन-टीच्या जुन पानांमध्ये तुलनेने कमी प्रमाणात कॅफेन असते. जर तुम्हाला ग्रीन-टीमधील कॅफेनच्या दुष्परिणामांविषयी चिंता वाटत असेल. तर मुळीच काळजी करू नका कारण ग्रीन-टी मधील EGCG आणि थेनिन या दुष्परिणामानां दूर ठेवते. थोडक्यात ग्रीन-टी हे एक सुरक्षित पेयं आहे.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *