मधुमेहाच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरतील जांभळाच्या बिया… तसेच या रोगांवरही गुणकारी आहेत जांभळाच्या बिया

मधुमेहाच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरतील जांभळाच्या बिया… तसेच या रोगांवरही गुणकारी आहेत जांभळाच्या बिया

जांभळाचे आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. जांभळाचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी करण्यात येतो. जांभूळ आहे हे फळ मधुमेह, मुतखडा, अतिसार, मुरडा, संग्रहणी, याकृत रोग आणि रक्तजन्य विकारात अतिशय लाभदायक आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभळाच्या बिया या चूर्णाच्या स्वरूपात देणे सर्वोत्तम उपाय मानला जातो

जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे, यात काही शंकाच नाही. परंतु, त्याच्या बियांचे देखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जांभळाच्या बियांमध्ये अनेक हेल्दी कंपाऊंडस असतात. मधुमेह नियंत्रित ठेवण्याबरोबरच शरीरातून हानिकारक केमिकल्स बाहेर टाकण्यास जांभळाच्या बियांचा उपयोग होतो. चला तर, जांभूळ खाऊन बिया फेकून देण्यापूर्वी त्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया…

मधुमेह:-


जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे, यात काही शंकाच नाही. परंतु, त्याच्या बियांचे देखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जांभळाच्या बियांमध्ये अनेक हेल्दी कंपाऊंडस असतात. मधुमेह नियंत्रित ठेवण्याबरोबरच शरीरातून हानिकारक केमिकल्स बाहेर टाकण्यास जांभळाच्या बियांचा उपयोग होतो. चला तर, जांभूळ खाऊन बिया फेकून देण्यापूर्वी त्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया…

जांभळाच्या बीमध्ये अँटी-डायबेटीस गुणधर्म आढळतात. त्यात असलेल्या अल्कोलीड्स केमिकलमुळे स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यास आळा बसतो आणि म्हणूनच रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राखले जाते. टाईप-2 मधुमेह असलेल्या रूग्णांमध्ये रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी या बिया उपयुक्त ठरतात

 पोट निरोगी ठेवण्यास मदत करते:-


पचन संस्था स्वच्छ करण्यासाठी आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठी जांभूळ उपयुक्त ठरतं. बियांचा अर्क जखम किंवा आतड्यातील अल्सर  आणि इन्फेकशन दूर करण्यास फायदेशीर आहे. जुलाब झाल्यास जांभळाच्या बियांची पावडर साखरेत मिसळून दिवसातून २-३ वेळा घ्या.

रक्तदाब नियंत्रण


जांभळाच्या बीमध्ये अल्कोलीड्स केमिकल आढळते. सर्व संशोधनात असे दिसून आले आहे की, हाय बीपी कमी करण्यात अल्कोलीड्स आम्ल खूप उपयुक्त आहे. अशा परिस्थितीत, उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना रक्तदाब कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो. बर्‍याच तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, अॅलिक अॅसिडच्या वापरामुळे रक्तदाब सुमारे 36 टक्के कमी केला जाऊ शकतो.

 शरीर डिटॉक्स करते:-


जांभळात  भरपूर प्रमाणात असतात. हे अँटिऑक्सिडंट शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स बाहेर टाकण्यास मदत करतात. त्याचबरोबर अँटिऑक्सिडंट एन्झाइम्स सुरक्षित ठेवतात. यामुळे जांभूळ डिटॉक्सिफिकेशन मध्ये मदत करते आणि इम्यून सिस्टिमचे कार्य सुरळीत करते. तसंच जांभळामध्ये अधिक प्रमाणात  कंपाऊंडस असतात. ते अँटिऑक्सिडंट अॅक्टिव्हिटी उत्तमरीत्या पार पाडतात.

वजन कमी करण्यास मदत करते:-


बेरी फायबरने समृद्ध असल्याने हे पोट सुरक्षित ठेवण्यास आणि वजन कमी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात मदत करू शकते. तसेच जांभळाची बी पाण्यात उगाळून चेहऱ्यावरती लेप केल्याने चेहऱ्यावरती आलेल्या तारुण्यपिटिका म्हणजेच मुरुमे बरे होण्यास मदत होते. मुलतानी माती, चंदन पावडर व जांभूळ पावडर यांचे एकत्रित मिश्रण करून याचा लेप चेहऱ्यावरती नियमित लावल्यास मुरमे नाहीसे होतात

दात आणि हिरड्या चांगल्या आरोग्यासाठी देखील जांभूळ खूप फायदेशीर आहे. याच्या बियांमध्ये कॅल्शियम असते. त्याचा वापर केल्याने दात आणि हिरड्या मजबूत राहतात. जर बोलण्यात काही अडचण येत असेल, तर जांभळाच्या बियांच्या काढ्याने गुळण्या करा.

यामुळे आवाज स्पष्ट होतो. जर आपल्याला गॅस्ट्रिक समस्येमुळे त्रास होत असेल तर, जांभळाच्या बिया वापरल्यास या समस्येपासून आराम मिळू शकेल. पावडर किंवा जांभळाच्या बियांचा अर्क प्यायल्याने गॅसची समस्या दूर होते.

पावडर कशी बनवाल?:-


जांभळाच्या बिया स्वच्छ धुवून, त्या उन्हात वाळवा. उन्हात व्यवस्थित वाळल्यानंतर सोलून घ्या. त्यांनतर या बिया चांगल्या वाळल्यानंतर चांगल्या बारीक वाटून पावडर करून घ्या. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा पावडर मिसळून प्या

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *