औषधाची खान आहे कारले…आपले अनेक असहय्य आणि दुधर्र आजरावर याप्रकारे गुणकारी आहे कारले…जाणून घ्या कारल्याचे हे फायदे 

औषधाची खान आहे कारले…आपले अनेक असहय्य आणि दुधर्र आजरावर याप्रकारे गुणकारी आहे कारले…जाणून घ्या कारल्याचे हे फायदे 

कारले म्हटले की अनेक जण आपले तोंड मुरडतात. पण कारलं हे आरोग्यवर्धक आहे हे जर आपल्याला कोणी सांगितलं तर ते नक्कीच आपण खाल्ल पाहिजे. आपल्या जिभेची चव कडवट होते. पण आपण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी कोणती नसेल.

ग्रीष्मात आढळणा-या भाज्यांमध्ये कारले एक आहे. त्यात फॉस्फरस भरपूर असते कारल्यामुळे कफ कमी होतो. बद्धकोष्ठ बरे होण्यास कारल्याची मदत होते. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास कारले मदत करते. हेच कारलं अनेकांना गंभीर आजारांपासून दूर ठेवू शकते. चला तर मग जाणून घेऊ की आपल्याला कारल्याचे काय फायदे आहेत.

प्रतीकात्मक तस्वीर

कारलं हे पोटाशी संबंधित कित्येक विकारांवर आपल्याला गुणकारी आहे, एवढचं नाही तर कारल्याचा ज्यूस प्यायल्याने आपले शरीर तंदूरुस्त राहतं आणि त्वचेवरचं तेज सुद्धा वाढतं. हे यामुळे होतं कारण कारलं हे रक्त शुद्धीकरणाचं काम करतं.

हे तर झाले काही मुख्य फायदे पण याव्यतिरिक्त सुद्धा कारल्याचे अनेक फायदे आहेत जे सर्वांना माहित असायला हवेत म्हणजे हे नावडतं कारलं सगळ्यांचं आवडतं होऊन स्वास्थ निरोगी राखण्यास आपल्याला मदत करेल.
प्रतीकात्मक तस्वीर

या समस्यांपासून मुक्तता मिळू शकते:-एका वैज्ञानिक अभ्यासानुसार कारल्याचा ज्यूस प्यायल्याने आपल्या शरीरात इन्सुलिनची मात्र वाढते. इन्सुलिन आपल्या नसांमध्ये अतिरिक्त ग्लुकोज जमा होऊ देत नाही. कारलं हे आपल्या इन्सुलिनला सक्रीय करते.

ज्यामुळे शरीरात तयार होणारी साखर मेदामध्ये परावर्तीत होत नाही. यामुळे चरबी व मेद नियंत्रित ठेवण्यात आपल्याला मदत होते. या शिवाय कारल्यामध्ये खूपच कमी कॅलरी असते ज्यामुळे कॅलरी नियंत्रणात राहते आणि आपले वजन सुद्धा वाढत नाही.

प्रतीकात्मक चित्र

सांधेदुखीमध्ये आराम मिळतो:- ज्याना सांधेदुखीचा त्रास होत आहे त्यांच्यासाठी, विशेषत: गुडघेदुखीसाठी नियमितपणे कारले खावे. यामुळे या समस्येपासून आपल्याला मुक्तता मिळू शकते.

प्रतीकात्मक चित्र
तसेच ज्या लोकांना पचनाशी संबंधित समस्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कारल्याचा ज्यूस खूप गुणकारी ठरतो. अपचन, गॅस, तोंडात आणि गळ्यात उष्णता निर्माण होणे, वारंवार जुलाब होणे यांसारख्या समस्या उद्भवत असतील तर त्यावर कारल्याचा ज्यूस हा एक साधा आणि खूप प्रभावी उपाय आहे.

पण आपल्याला नेहमी एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कारल्याचा ज्यूस आपण कसाही पिऊ नये. यासाठी कारण प्रत्येक व्यक्तीची शारीरिक स्थिती वेगवेगळी असते आणि प्रत्येकाच्या शरीरावर कारल्याचा ज्यूस वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव टाकू शकतो.
प्रतीकात्मक चित्र
कारले हे आपल्या निरोगी शरीरासाठी जितके फायदेशीर आहे तितकाच तो फायदेशीर आहे आपल्या त्वचेसाठी सुद्धा आपल्याला हे जाणून घेतल्यावर आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे की खाज, जळजळ, सूज, फोड येणे ह्या सारख्या त्वचेच्या समस्या न होऊ देण्याचे महत्त्वपूर्ण काम कारले करते.

ज्यांना घामोळ्यांची खूप समस्या आहे किंवा ज्यांना पित्ताचा मोठा त्रास आहे त्यांनी कारल्याचा ज्यूस घेण्यास हरकत नाही, याचा त्यांना फायदाच होईल.

प्रतीकात्मक चित्रकारल्याच्या ज्यूस मध्ये आपल्या डोळ्यांची दृष्टी वाढवणारा बीटा-कॅरोटिन हा घटक असतो. सोबतच मोमर्सिडीन आणि चॅराटिन रेटीना आर्टरीज मध्ये साखर जमा होण्यास प्रतिबंध करतात. म्हणून कारल्याचा ज्यूस हा फक्त डोळ्यांची दृष्टी वाढवण्यातच उपयुक्त नाही तर जास्त साखर वाढल्याने कमजोर होणारी दृष्टी सुद्धा सुस्थितीत आणण्यात मदत करतो. म्हणून ज्या कोणा व्यक्तीला डोळ्यांच्या नजरेची समस्या असेल त्यांनी न चुकता कारल्याच्या ज्यूसचे सेवन करायला हवे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *