जेव्हा करिश्मा कपूरच्या बेडरूमध्ये घुसला होता चोर…तेव्हा वेळीच लक्ष गेले नसते तर कदाचित आज….त्या रूममध्ये घडले होते असे काही कि…

जेव्हा करिश्मा कपूरच्या बेडरूमध्ये घुसला होता चोर…तेव्हा वेळीच लक्ष गेले नसते तर कदाचित आज….त्या रूममध्ये घडले होते असे काही कि…

आपल्याला माहित आहे कि या जगात बॉलिवूड स्टार्सचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे आपल्यातील अनेक लोकांना सेलिब्रिटींचं वैयक्तिक आयुष्य जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. आता आपल्यामधीलच काही लोक टीव्हीवर हँडसम दिसणारा अभिनेता आणि ब्युटीफूल दिसणारी अभिनेत्री लहानपणी कसे बरे दिसत असतील, असा विचार करून कित्येक जण त्याच्या मागे पुढे फिरत असतात किंवा त्यांना भेटण्याचा प्रयत्न करत असतात.

त्यामुळे काही अति उत्साही लोकांमुळे अनेक अशा घटना घडत असतात, आणि अशीच एक घटना अभिनेत्री करिश्मा कपूरशी संबंधित घडली होती, निळ्या आणि सुंदर डोळ्यांसाठी प्रसिद्ध असलेली करिश्मा कपूर एकदा तिच्या घरात एकटी होती आणि या वेळी तिच्यासोबत एक अतिशय विचित्र घटना घडली होती. या अपघातात करिश्मालाही चांगलाच धक्का बसला होता.

एकदा करिश्मा कपूर तिच्या घरात एकटी होती आणि त्यावेळी तिच्या घरात काही फर्निचरचे काम चालू होते. या संबंधात एक सुतार तिच्या घरात काम करत होता आणि तेव्हा घरी काम करत असताना त्या सुतारला कळले की घरात करिश्मा एकटी आहे. तेव्हा या संधीचा फायदा घेत त्याने करिश्माच्या शयनगृहात प्रवेश केला. या दरम्यान, एक व्यक्ती आपल्या खोलीत घुसला आहे हे देखील करिश्माला कळले नाही.

बेडरूमध्ये काही मौल्यवान सामानही होते. त्या कारपेंटरने त्यावेळी करिश्माचे पर्स चोरली आणि तिथून पळ काढला. या सुतारने तिच्या बेडरूममध्ये प्रवेश केला आणि संधी मिळताच करिश्माची पर्स चोरली पण नंतर जेव्हा करिष्माला या चोरीबद्दल कळले तेव्हा तिला पूर्णपणे धक्का बसला. तिच्या उपस्थितीत घरात चोरी झाल्याचे करिश्माच्या लक्षात आले आणि काय करावे तिला सुचेनासेच झाले होते.

तातडीने करिश्माने चोरी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आणि पोलिसांनी चोराला पकडत चोरीला गेलेली पर्सही करिश्माला परत मिळवून दिली होती. तसेच आता करिश्मा कपूर एकटीने तिच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करत आहे.

वेगवेगळ्या ब्रँडमध्येही करिश्माने गुंतवणूक केली आहे. या माध्यमातून तिला चांगले उत्पन्न मिळते. पती संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मिळालेल्या पोटगीच्या रकमेतूनही ती आजही आलिशान आयुष्य जगते. 2016 मध्ये करिश्मा व संजय कपूरचा घटस्फोट झाला. यासाठी तिला बरीच मोठी कायदेशीर लढाई लढावी लागली होती.

विशेष म्हणजे अभिनेत्री करिश्माने बॉलिवूडमध्ये ‘प्रेम कैदी’ चित्रपटाद्वारे पदार्पण केले. त्यावेळी जवळजवळ प्रत्येक स्टार-सुपरस्टारबरोबर त्याने स्क्रीन शेअर केली होती. सुंदर अभिनेत्री करिश्मा कपूरने ‘राजा हिंदुस्तानी’, ‘राजा बाबू’, ‘दिल तो पागल है’, ‘बीवी नंबर वन’ सारखे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. मात्र यानंतर, तिने लग्न केले आणि चित्रपटांपासून लांब गेली.

तसेच आपल्याला माहित असेल कि 90 च्या दशकात करिश्मा कपूरचा बॉलिवूडमध्ये चांगलाच दबदबा होता. मात्र लग्नानंतर करिश्मा अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. म्हणायला काही वेबसीरिज व जाहिरातीत ती दिसते. पण ते पुरेसे नाही, अशात सुद्धा लोलो लक्झरी आयुष्य जगते आहे.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *