डोकेदुखी, मधुमेह, कर्करोग, तणाव, मुरूम…असे कोणतेही रोज किंवा समस्या असो…फक्त तुळशीच्या पानांपासून उपाय…त्वरित आराम मिळालाच समजा

डोकेदुखी, मधुमेह, कर्करोग, तणाव, मुरूम…असे कोणतेही रोज किंवा समस्या असो…फक्त तुळशीच्या पानांपासून  उपाय…त्वरित आराम मिळालाच समजा

तुळशीच्या घरात असण्याने फक्त सकारात्मक उर्जाच प्राप्त होत नाही, तर ब-याच आजारांपासून आपल्याला सुटका देखील मिळते. तसेच आयुर्वेदामध्येही गुणकारी तुळशीचे मोठे योगदान आहे.

घराच्या अंगणात आणि बाल्कनीत लावली जाणारी तुळस हिंदू धर्मात पुजनीय आणि पवित्र मानली जाते. तुळस हे फक्त एक हिरवं रोप नसून तिच्यातील अनेक औषधी गुणधर्मांमुळे गंभीर रोगांशीदेखील सामना करणं सोपं होतं म्हणूनच तिला ‘क्वीन ऑफ हर्ब्स’ देखील म्हटलं जातं.

प्रतीकात्मक चित्र

विविध आजांरावर गुणकारी असणारी ही तुळस सौंदर्याच्या दृष्टीने त्वचा आणि केस यासाठीही लाभदायक ठरते. हिंदु धर्मातील घराघरांत तुळशीची सकाळ संध्याकाळ पुजा केली जाते. तुळशीची पाने घरगुती उपायांमध्येही वापरली जातात. त्याचा सुगंधही खूप सुंदर असतो.

तसेच काही खाद्यपदार्थांमध्येही त्याचा वापर केला जातो. तर आज आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत की, तुळशीत कोणकोणते गुणधर्म आहेत आणि त्याचा वापर कुठे कुठे केला जातो? सध्या करोना व्हायरसमुळे  सर्व जग त्रासलेलं असताना तुम्ही इतकंच लक्षात ठेवा की,

आपली रोगप्रतिकारक क्षमता अधिक असेल तर आपल्याला कोणताही रोग होऊ शकत नाही. ब-याचदा रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी लागणा-या गोष्टी आपल्या घरातच असतात. त्यापैकी एक म्हणजे तुमच्या घरातील बहरलेली पवित्र तुळस! तुम्हीही जाणून घ्या या पवित्र तुळशीपासून होणारे फायदे.

प्रतीकात्मक चित्र

रोगप्रतिकारकक्षमता वाढवण्यासाठी:-

तुळशीच्या बियांमध्ये फ्लेवोनाईड आणि फेलोनिक असल्याने ते आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करतात. तुळशीमध्ये असणारे अटीऑक्सिडंट शरीराला होणा-या फ्री रेडीकल्सच्या प्रभावापासून संरक्षित करतात.

जर तुम्ही रोज दिवसातून एकदा जरी तुळशीची पाने चघळलीत किंवा त्याचा पानांचा चहा करुन प्यायला तर त्यापासून तुमच्या शरीराला अनेक चांगले फायदे होऊ शकतात. कारण आपली व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असेल तर आपण कोणत्याही आजाराचा सामना सहज करू शकतो.

कॅन्सरसाठी लाभदायक:-

न्सर सर्वात भयंकर आजार असला तरी आयुर्वेदामध्ये त्यासाठीही इलाज आहे. तुळशीमध्ये युजेनाल कंम्पाऊंड हा घटक असल्याने तो कॅन्सरवर मात करण्यास मदत करतो.

ब-याच अभ्यासांमध्येही सांगितले गेले आहे की, तुळस कॅन्सरवर प्रभावशाली आहे. त्यामुळे रोज तुळशीची पाने चघळणा-या व्यक्तींना कॅन्सर होण्याची संभावना फार कमी असते. दहा ग्रॅम तुळशीच्या पानांचा रस 20 ते 30 ग्रॅम ताजे दही किंवा 2 ते 3 चमचे मधाबरोबर नियमित घेतल्यास हे कॅन्सरवर गुणकारी औषध ठरते.

तर आळस, इन्फेक्शन, आळस, हदयरोग, अलर्जी, लठ्ठपणा, खोकला, त्वचारोग, दंतदुखी अशा अनेक त्रासांवर तुळस अत्यंत उपयुक्त मानली जात असून त्याचा वापर रक्तशुद्धीकरणासाठीही होतो.

तुळस घरात असल्याने ऑक्सिजनची कमतरता कधीच घरात जाणवत नाही, म्हणजेच शुद्ध हवा खेळती राहण्यास मदत होते. तसेच तिच्या पावित्र्यामुळे आपलेही जीवन सुखी होऊन जाते.

प्रतीकात्मक चित्र

सर्दी-पडश्यापासून मुक्तता;-

सं तर सर्दी-पडसं हा खूपच साधा आजार आहे पण यामुळे लोकं अगदी हैराण होतात. पण तुळशीच्या मदतीने तुम्ही सर्दी-पडश्याला बरं करण्यासोबतच त्यापासून कायमची सुटका देखील मिळवू शकता. तुळशीतील अॅंटीस्पास्मोडीक घटक सर्दी-पडश्यापासून मुक्तता मिळवून देतात.

तसंच तुळस तापासाठी देखील उपयुक्त मानली जाते. तापाची तीव्रता अधिक असल्यास अर्धा लीटर पाण्यात वेलची पावडर, साखर आणि दूध याबरोबर तुळशीची पाने उकळून घ्यावी. तीन तासांच्या अंतराने हा काढा रुगणाला दिल्यास ताप कमी होतो. यासोबतच तुळशी, काळेमिरे आणि खडीसाखर मिसळून प्यायल्यानेही सर्दी-पडसे ठिक होते.

प्रतीकात्मक चित्र

मुरूमांना करा बाय-बाय:-

तरुण वयातील मुलींपासून मध्यमवयीन स्त्रीयांपर्यंत अनेकांना मुरूमांचा त्रास असतो. हा त्रास दूर करण्यासाठी मुलींचे सदैव काही ना काही घरघूती उपचार सुरू असतात.

त्याचाही फायदा झाला नाही तर बरेच जण डॉक्टरकडे धाव घेतात. पण मुरूम किंवा पुरळांपासून मुक्तता हवी असल्यास तुळशीपासून बनवलेल्या लेपाइतकं श्रेष्ठ गुणकारी असं काहीच नाही. हा लेप तयार करण्यासाठी तुळशीची काही पाने, संत्र्याची साल घेऊन त्यात गुलाबजल मिसळा आणि त्याची पेस्ट तयार करा.

ही पेस्ट १५ मिनिटे चेह-यावर लावून ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमच्या चेह-यावरील मुरूम जाऊन चेहरा उजळण्यास सुरूवात होईल. याव्यतीरिक्त तुम्ही तुळशीच्या पानांच्या रसात चंदन पावडर टाकून त्याचाही रस बनवू शकता. तुळस रक्त शुद्ध करून टॉक्सिनचे प्रमाण कमी करत असल्याने आणि तुळशीच्या पानात अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरीयल तत्व असल्याने या समस्या दूर होतात.

डोकेदुखी व तणावातून सुटका:-

या धावपळीच्या जगात बरेच लोक मानसिक त्रासातून जात असल्यामुळे ते नकळतच तणावयुक्त जीवन जगताना दिसतात. ब-याचदा औषधांचा काहीही उपयोग न झाल्याने ते लोक घरघूती उपचार करतात. तुळशीच्या पानांमध्ये अॅंटीस्ट्रेससारखे घटक उपलब्ध असतात.

त्यामुळे ते माणसाला मानसिक तणावातून मुक्त करतात. तसेच तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने तणावातून येणा-या नकारात्मक विचांरावर मात करणे देखील सोपे होते. तुळशीची पाने डोकेदुखीवरील रामबाण उपाय म्हणून ओळखली जातात. तुळशीच्या वाळलेल्या पानांची गरम पाण्यात वाफ घेणे हा सर्वात चांगला उपाय आहे.

त्यासाठी एक चमचा वाळलेली तुळशीची पाने दोन कप पाण्यात टाकून एका मोठ्या भांड्यात गरम करावे. एका मोठ्या कपड्याने चेहरा झाकून त्याची 5 ते 10 मिनिटे वाफ घ्यावी. तसेच तुळशीची पाने वाटून चंदनाच्या लेपाबरोबर डोक्यावर लावणेही उत्तम!

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *