केस गळती, कोंडा होणे आणि केस पांढरे यामुळे आपण पण त्रस्त असाल..तर हे आयुर्वेदीक उपाय आपल्यासाठी आहेत…परिणाम आपल्या समोर असतील

केस गळती, कोंडा होणे आणि केस पांढरे यामुळे आपण पण त्रस्त असाल..तर हे आयुर्वेदीक उपाय आपल्यासाठी आहेत…परिणाम आपल्या समोर असतील

आपल्याला माहित आहे की केस गळती, कोंडा होणे आणि केस पांढरे होणे यामुळे कित्येक जण हैराण असतात. केसांना पुरेशा प्रमाणात पोषण न मिळाल्यामुळे केसांच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. घातक रसायने असलेले प्रोडक्टचा वापर करून केसांवर दुष्परिणाम होतात.

हे धोके टाळण्यासाठी साधे आणि सोपे घरगुती उपचार करा. केसांसाठी घरगुती उपचार म्हणून तुम्ही बटाट्याची मदत घेऊ शकता. प्रत्येकाच्या घरामध्ये बटाटा सहजरित्या आढळतो. कारण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बटाट्यापासून तयार केलेले पदार्थ आवडतात.

याचा केवळ खाण्यासाठीच नव्हे तर त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यासाठीही उपयोग केला जाऊ शकतो. केसांसाठी पोषक असलेले घटक बटाट्याच्या सालीमध्ये आहेत. बटाट्याच्या सालीमुळे केसगळती रोखली जाऊ शकते आणि केस देखील नैसर्गिकरित्या काळे होतात. यामुळे बटाट्याची साल कचऱ्यामध्ये फेकण्याऐवजी त्यांचा केसांसाठी वापर करावा. जाणून घेऊया बटाट्याच्या सालीचा कसा करायचा वापर…

केस होतील काळे:-

बटाट्याच्या सालीमध्ये पॉलीफेनोल ऑक्सिडेज  नावाचं एंझाइम असते. या पोषक तत्त्वामुळे केस निरोगी राहण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त लोह, झिंक, कॉपर, कॅल्शिअम, पोटॅशिअम, नियासिन आणि मॅग्नेशिअम हे घटक देखील आहेत. बटाट्याच्या सालीतील या घटकांमुळे केस काळे होण्यास मदत मिळते. केसांची योग्य देखभाल केल्यास समस्या उद्भवणार नाहीत.

​बटाट्याच्या सालीचा वापर कसा करावा:-

गॅसच्या मंद आचेवर एक पॅन ठेवा. पॅनमध्ये पाणी घेऊन ते तीन-पाच मिनिटांसाठी उकळत ठेवा. पाणी कोमट झाल्यानंतर पॅनमध्ये बटाट्याच्या साली टाका आणि पॅनवर झाकण ठेवा. बटाट्याच्या साली ३० ते ३५ मिनिटांपर्यंत उकळू द्या. यानंतर गॅस बंद करा आणि बटाट्याच्या साली १५ ते २० मिनिटांसाठी पाण्यामध्येच राहू द्या.

गाळणी किंवा स्वच्छ सुती कापड्याचा वापर करून पाणी एका वाटीमध्ये गाळून घ्या. या पाण्यामध्ये एक मोठा चमचा गुलाब पाणी मिक्स करा. हे पाणी थंड होऊ द्या. थोड्या वेळानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये हे पाणी भरून ठेवा आणि त्याचा वापर करा.

सर्व प्रथम शॅम्पूनं आपले केस स्वच्छ धुऊन घ्या. यानंतर कंडिशनर लावा. केस नैसर्गिक पद्धतीनं सुकू द्या. यासाठी ड्रायरचा वापर करू नये. केस सुकल्यानंतर कंगवा करा. यानंतर बॉटलमधील पाणी केसांवर स्प्रे करा. सर्व केसांवर हे पाणी स्प्रे करून घ्यावे.

बटाट्याच्या सालीचे पाणी ३० मिनिटे केसांमध्ये राहू द्या. यानंतर साध्या पाण्यानं आपले केस स्वच्छ धुऊन घ्या. केस सुकल्यानंतर सीरम लावा. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा हा उपाय केल्यास केसांच्या समस्या कमी होण्यास मदत मिळेल.

​केस काळे करण्यासाठी दुसरा घरगुती उपाय:-

चहा तयार केल्यानंतर बहुतांश जण चहा पावडर देखील कचऱ्याच्या डब्यात फेकतात. या पावडरचा तुम्ही केस काळे करण्यासाठी वापर करू शकता. चहा पावडरमध्ये टॅनिन अ‍ॅसिड असतं, या घटकामुळे पांढरे केस काळे होतात.

  • सामग्री-
  • १ लीटर पाणी
  • १० चमचे चहा पावडर/ टी बॅग

एका पॅनमध्ये पाणी उकळण्यास ठेवा. त्यामध्ये १० चमचे चहा पावडर टाका. मध्यम आचेवर चहा पावडर उकळत ठेवा. यानंतर गॅस बंद करा आणि चहाचं पाणी थंड होण्यास ठेवून द्या. एका हेअर ब्रशच्या मदतीनं चहा पावडरचं मिश्रण आपल्या केसांना त्यांच्या मुळांपर्यंत लावा. ३० मिनिटांसाठी हा पॅक केसांना लावून ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्यानं केस स्वच्छ धुवा.

किती दिवस करावा लागेल हा उपाय?

केस काळे करण्याचा हा उपाय केल्यास तुमचे पांढरे केस लगेचच काळे होणार नाहीत. पण मार्केटमध्ये मिळणाऱ्या केमिकलयुक्त डायऐवजी ही पद्धती नैसर्गिक आणि दुष्परिणाम विरहीत आहे. केस काळे करण्यासाठी आणि केसांवर नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी याचा प्रयोग एक दिवसाआड करावा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *