‘कुछ कुछ होता है’ मधील हा छोटा सरदार करत आहे या मार्गाने लग्न…पाहून आपले होश उडतील.

‘कुछ कुछ होता है’ मधील हा छोटा सरदार करत आहे या मार्गाने लग्न…पाहून आपले होश उडतील.

‘कुछ कुछ होता है’ ही बॉलीवूडची सर्वात मोठी हिट फिल्म होती आणि आजही लोकांना या चित्रपटाचे प्रत्येक पात्र चांगलेच आठवणीत आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि काजोल यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या आणि हा चित्रपट एक रोमँटिक चित्रपट होता. या चित्रपटात बरेच कलाकार होते, त्यातील एक लहान सरदारही होता. हा छोटा सरदार लोकांना त्यावेळी खूपच आवडला होता. तथापि, आता हा छोटा सरदार मोठा झाला आहे आणि लवकरच लग्न करणार आहे.

‘कुछ कुछ होता है’ मध्ये लहान सरदारांची भूमिका परजन दस्तूर याने साकारली होती. परजन दस्तूर याचा या चित्रपटात एक डायलॉग होता जो आजही खूप लोकप्रिय आहे. हा डायलॉग असा होता की ‘तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ या एका डायलॉग ने प्रजान दस्तूर अगदी छोट्या वयात प्रसिद्ध झाला.

परजन दस्तूर आता मोठा झाला आहे आणि पुढच्या वर्षी त्याचे सुद्धा लग्न होणार आहे. २८ वर्षीय परझान दस्तूरने नुकतेच आपल्या मैत्रिणीशी लग्न करण्याची घोषणा केली आहे. त्याने आपल्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर लोकांसोबत शेअर केली आहे.

एक पोस्ट शेअर करताना त्याने लिहिले आहे की, ‘एक वर्षापूर्वी तिने मला हो बोले होते आणि आता मी ४ महिन्यांनंतर लग्न करणार आहे.’ परजन दस्तूरने त्याची मैत्रीण डेलना श्रॉफचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो डेलना प्रपोज करताना दिसत आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोत तो डेलनाला खूपच रोमँटिक मार्गाने प्रपोज करत आहे. शेअर केलेल्या चित्रात परजन गुडघ्यावर बसून डेलनाला रिंग देताना दिसत आहे.

आम्ही आपणाला सांगू इच्छितो की त्याने एक वर्षापूर्वीच डेलना श्रॉफशी साखर पुडा केला होता. असे म्हटले जाते की जाते की या दोघाची भेट कॉलेज मध्ये झाली होती आणि तितेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. कित्येक वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत होते. आत्ता त्यांचे लग्न होणार आहे कदाचित त्यांचे लग्न फेब्रुवारी महिन्यात होईल असे सांगितले जात आहे.

अनेक चित्रपटामध्ये केले आहे काम:- 

परजन दस्तूर याने अनेक चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले आहे. मोहब्बतें, कहो ना प्यार है, हाथ का अंधा, ब्रेक नंतर, हम तुम परजानिया, कभी खुशी कभी गम, कहता है दिल बार बार, सिकंदर आणि पॉकेट मम्मी अशा चित्रपटात त्याने काम केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त तो बर्‍याच जाहिरातींमध्येही दिसला आहे. धारा रिफाईंडच्या जलेबीच्या जाहिरातींमधून त्याला बरीच ओळख मिळाली. काही वर्षांपूर्वी तो रेन या शॉर्ट फिल्ममध्ये ही दिसला होता.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *