जर आपल्याला वारंवार लघवीला येत असेल…तर त्वरित करून घ्या आपली तपासणी…आपल्याला होऊ शकते या रोगाची लागण.

जर आपल्याला वारंवार लघवीला येत असेल…तर त्वरित करून घ्या आपली तपासणी…आपल्याला होऊ शकते या रोगाची लागण.

जेव्हा थंडी चालू होईल आणि जर तेव्हा आपण जास्त पाणी प्यायले तर आपल्याला सतत लघवी येते, ही समस्या अनेक लोकांमध्ये दिसून येते. परंतु आपल्याला जर ही समस्या बराच काळ राहिल्यास, त्याकडे दुर्लक्ष करू नका.

बॉम्बे रूग्णालयाचे वरिष्ठ यूरोलॉजिस्ट डॉ. विवेक झा यांच्या म्हणण्यानुसार, जर आपल्याला एखादा गंभीर आजार असल्यास सुद्धा एखादी व्यक्ती सतत लघवीला जाऊ शकते. तर आज आपण या समस्यच्या काही महत्त्वाच्या कारणांबद्दल बोलणार आहोत.

सतत लघवी का येते:-

  • जर आपल्या ओटीपोटाचे स्नायू कमकुवत असतील तर मग वारंवार आणि पुन्हा लघवीला जाण्याची समस्या उद्भवू शकते.

जर आपल्याला सतत लघवी होत असेल तर आपण मधुमेह आणि मूत्रपिंडाची तपासणी एकदा करुन घ्या. जर आपल्याला एकदा मूत्रपिंडाचा आजार आणि मधुमेह असला तरीही एखाद्या व्यक्तीला लघवी बर्‍याच वेळा येते.

तसेच जर आपल्या शरीरात मूत्राशय म्हणजेच मूत्र साठवण्याच्या पिशवीचा आकार कमी असेल तर आपल्याला पुन्हा पुन्हा लघवीला जाण्याची समस्या सुरू होते.

आपण दिवसभरात 7 ते 8 ग्लास पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु जर आपण जास्त प्रमाणत पाणी घेतले तर आपले मूत्राशय त्वरित भरले जाते, ज्यामुळे आपल्याला वारंवार लघवी होते.

तसेच जर एखाद्या व्यक्तीला मुतखड्याचा त्रास असेल तर त्या व्यक्तीच्या मूत्राशयावर दबाव येतो. त्याचमुळे आपली लघवीला जाण्याची समस्या वाढते.

जर आपले मूत्राशय जास्त सक्रिय असेल तर आपल्या शरीरात थोडेसे जरी युरीन असल्यास आपल्याला लघवीला जाण्याची इच्छा होते.

तसेच आपले वय वाढल्यामुळे मूत्राशयाचे मज्जातंतू सुद्धा कमकुवत होऊ लागतात आणि यामुळे आपला मूत्राशय लगेचच पूर्णपणे भरला जातो. त्यामुळेच आपल्याला वारंवार लघवीला येते.

तसेच आपल्या जेव्हा शरीरातील साखरेची पातळी वाढते तेव्हा अतिरिक्त ग्लूकोज मूत्रमार्गे बाहेर येते. यामुळे सुद्धा आपल्याला पुन्हा पुन्हा लघवीला जावे लागू शकते.

तसेच चहा-कॉफीमध्ये चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य हे जास्त प्रमाणत असते आणि यामुळे सुद्धा आपल्याला पुन्हा पुन्हा लघवीला जावे लागू शकते. या व्यतिरिक्त, मद्यपान जास्त प्रमाणात केल्यावरही आपल्याला ही समस्या उद्भवते.

एखाद्या व्यक्तीला यूरिनचा संसर्ग असल्यास किंवा त्याची पुर:स्थ ग्रंथी मोठी झाली असेल तरी त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा लघवीला जाण्याची इच्छा होते.

तसेच जर आपल्याला पुर: स्थ कर्करोग किंवा मूत्रमार्गाचा कर्करोग असेल तर देखील वारंवार लघवी होण्याची समस्या वाढू शकते.

तसेच जर आपल्याला कोणत्याही गोष्टीचा ताण असेल किंवा आपण चिंताग्रस्त असाल, आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटत असेल तसेच या व्यतिरिक्त, एखाद्या व्यक्तीस कोणतीही इतर मानसिक समस्या असल्यास सुद्धा त्या व्यक्तीला सतत लघवीला येते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *