रक्ताची कमतरता, गुप्तरोग, हाडांचे आजार, सांधेदुखी, बद्धकोष्टता…असे कोणतेही आजार असो…फक्त करा याप्रकारे मनुक्याचे सेवन…

रक्ताची कमतरता, गुप्तरोग, हाडांचे आजार, सांधेदुखी, बद्धकोष्टता…असे कोणतेही आजार असो…फक्त करा याप्रकारे मनुक्याचे सेवन…

उत्तम आरोग्यासाठी ड्रायफ्रुट खाण्याचा सल्ला दिला जातो. किमान एक मूठ तरी ड्रायफ्रुट खावे असे सांगितले जाते. ड्रायफ्रुटमधील मनुका हा प्रकार अनेकांना आवडतोच असा नाही.काही जणांना दाताखाली गोड आवडत नाही म्हणून ते चिवडा, लाडूमधील मनुका कटाक्षाने बाहेर काढून टाकतात. पण जर तुम्ही काळे मनुके खात नसाल तर आजपासूनच ते खायला घ्या. कारण काळ्या मनुक्याचे अफाट फायदे आहेत. म्हणूनच आज जाणून घेऊया काळे मनुके खाण्याचे फायदे.

काळा मनुका म्हणजे काय:-

द्राक्ष वाळवून त्यापासून मनुका बनतो हे सर्वसाधारणपणे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण काळ्या मनुक्याबाबत अनेकांना प्रश्न पडतो. काळा मनुका नेमका कशापासून बनवला जातो? किंवा कोणत्या प्रतीचा काळा मनुका हा आरोग्यासाठी चांगला असतो. या बद्दल अनेकांना शंका असते.

द्राक्षांच्या प्रकारावरुन मनुक्याचे प्रकार ठरलेले असतात. म्हणजे हिरवा, काळा, जांभळा,चॉकलेटी अशा रंगांमध्ये मनुके मिळतात. फळांच्या वेगवेगळ्या प्रकारांनुसार मनुक्यामध्ये प्रकार मिळतात. आता तर बाजारात सिडलेस द्राक्ष मिळतात त्यामुळे मनुक्याचे सिडलेस असे प्रकार पाहायला मिळतात. चांगल्या दुकानातून आणि चांगल्या ठिकाणाहून तुम्ही मनुके घेतल्यास उत्तम

काळ्या मनुक्यांचे सेवन करण्याच्या पद्धती-

काळे मनुके तुम्ही नुसते सुद्धा खाऊ शकता. यामध्ये तुम्हाला वेगळे कष्ट घ्यावे लागत नाही.

शिवाय जर तुम्हाला आणखी वेगळ्या पद्धतीने मनुके खायचे असतील तर तुम्ही मनुके रात्री पाण्यात भिजत घाला. रात्रभर मनुके पाण्यात भिजत घातल्यामुळे ते फुगतात. अशा मनुक्यांचे सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते कारण मनुक्यांमधील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा अधिक फायदा आपल्याला अशा सेवनामुळे होतो.

उपाशी पोटी जर तुम्ही काळ्या मनुक्यांचे सेवन केले तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा मिळू शकेल.

दुधात कुस्करुन जर तुम्ही मनुक्यांचे सेवन केले तरी देखील तुम्हाला चालू शकते. रात्रभर मनुके भिजत घाला. सकाळी छान मिक्सरमधून दुधासोबत फिरवून घ्या. तयार शेक तुमच्यासाठी परिपूर्ण असून तुम्हाला लवकर भूक लागत नाही.

दिवसातून केवळ दोनवेळाच तुम्ही मनुक्याचे सेवन करु शकता.

डोळ्यांचे आरोग्य सुधारते:-

तुम्हाला नजरेसंदर्भाील काही तक्रारी असतील तर तुम्ही काळ्या मनुक्याचे सेवन करायला हवे कारण डोळ्यांच्या आरोग्यासाठी काळा मनुका महत्वाचा असतो.  काळ्या मनुक्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट तुमच्या डोळ्याचे आरोग्य सुधारते तुमचा नजरेचा दोष कमी करते. या शिवाय तुमची दृष्टी अधिक चांगली करण्यास मदत करते.

अनेमिया करते कमी:-

रक्ताच्या कमतरतेमुळे होणारा अनेमियाचा त्रास तुम्हाला असेल तुम्ही काळ्या मनुक्याचे सेवन करायला हवे.किंवा तुमच्या शरीरातील रक्त कमी झाले असतील तरी देखील काळा मनुका खायला हवा. काळ्या मनुक्यामधील व्हिटॅमिन B, आर्यन आणि कॉपर तुमच्यातील रक्त वाढवण्यास मदत करते.

teeth

दातांसाठी चांगले:-

दातांना किड लागणे, दात दुखणे आणि दात तुटणे अशा तक्रारी असतील तर तुम्ही काळ्या मनुक्याचे सेवन करायला हवे. कारण काळ्या मनुक्यामध्ये oleanolic acid असते. जे तुमच्या दातांसाठी चांगेल असते. त्यामुळे तुम्हाला दातांसंदर्भात काही तक्रारी असतील  तर तुम्ही काळे मनुके खायला हवेत.

हाडांना आणते बळकटी:-

हाडांच्या बळकटीसाठी कॅल्शिअम महत्वाचे असते. जर तुम्हाला अंडी किंवा दूध आवडत नसेल तर तुम्ही काळ्या मनुक्याचे सेवन करा. काळ्या मनुक्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअम असते. त्यामुळे तुमच्या हाडांना बळकटी मिळते. म्हणूनच तुमच्या हाडांना बळकटी येण्यासाठी तुम्ही काळा मनुका खा.

सेक्ससंदर्भातील तक्रारी करते दूर:-

काळ्या मनुक्यामध्ये Arginine नावाचा घटक असतो. हा घटक पुरुषांसाठी आवश्यक असतो. जर सेक्सची इच्छा कमी झाली असेल किंवा तुमच्या पार्टनरला त्याची काहीच आवड नसेल तर तुम्ही त्याच्यामधील सेक्स प्लेझर वाढवण्यासाठी मनुका फायदेशीर ठरतो. दिवसातून किमान दोनवेळा तरी तुम्ही तुमच्या जोडीदाराला मनुके खायला द्या.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *