जर आपली सुद्धा वयानुसार ऐकण्याची क्षमता कमी झाली असेल…तर आजच करा हे घरगुती उपाय…बहिरेपणा दूर होईल

जर आपली सुद्धा वयानुसार ऐकण्याची क्षमता कमी झाली असेल…तर आजच करा हे घरगुती उपाय…बहिरेपणा दूर होईल

आजकाल मोठ्याप्रमाणात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाममुळे बहिरेपणा हि समस्या सामान्य बाब झाली आहे, पण याच्या कडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. कार, बसेस, ट्रेन यांचे मोठ्याने वाजणारे कर्कश हॉर्न मोठ मोठ्या कंपन्यांचे सायरन यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. सततच्या या त्रासामुळे बहीरेपणा येऊ शकतो,

यामुळे फक्त बहिरेपणा नाही तर शारीरिक व मानसिक त्रास होतो. जेंव्हा समोरची व्यक्ती बोलते तेंव्हा तो बोलत असताना काही विशिष्ट ध्वनी तरंग निर्माण होतात त्यामुळे हवेत कंपन उत्पन होतात,

ज्यामुळे आपल्याला ऐकू येते, पण कमी ऐकू येत असल्यामुळे ही कंपन ऐकू शकत नाही, बहिरेपणा केवळ एका कानाने नाही तर दोन्ही कानाने होऊ शकतो. बहिरेपणा वर भरपूर उपचार उपलब्ध आहेत.

कानाने कमी ऐकू येण्याची कारणे:-

बहिरेपणा ची अनेक कारणे असू शकतात, बहिरेपणा हे नैसर्गीक हि असू शकते तर काहीना बहिरेपणा जन्मजात हि असू शकतो तसेच जसजसे आपले वय वाढत जाते हि समस्या उद्भवते खास करून वृद्धामध्ये हि समस्या जास्त करून आढळते.

कामाच्या ठिकाणी होणारे मोठे आवाज, कानामध्ये होणारे संक्रमण, कानाच्या हाडाची कमी वाढ किंवा जास्त प्रमाणात वाढ, मोबाईल चा सतत वापर, हेडफोन चा वापर, मोठ मोठे साऊंड सिस्टीम मधून निर्माण होणारा आवाज, इत्यादी बहिरेपनाची कारणे असू शकतात.

कानाने कमी ऐकू येण्याची लक्षणे:-

कमी ऐकू येणे किंवा बहिरेपणा यांची लक्षणे आपल्याला काही कालावधी नंतर समजतात, यामुळे याच्यावर वेळेवर उपचार होत नाहीत. पण जेंव्हा पण आपल्याला बहिरेपानाची लक्षणे लक्षात येतील तेंव्हा याच्या कडे दुर्लक्ष करू नका डॉक्टरांकडे जाऊन याच्यावर त्वरित उपचार करावेत,

बहिरेपणाची लक्षणे: कानामध्ये शिट्टी सारखा आवाज येणे, कमी ऐकू येणे किंवा फक्त मोठ्याने ऐकू येणे, फोन वर बोलताना कानात दुखणे, इत्यादी बहिरेपणाची कारणे आहेत ती आपण सहजरीत्या ओळखू शकतो.

बहिरेपणावर उपचार

बहिरेपणावर उपचार होऊ शकतो, योग्य त्या डॉक्टरी सल्याने बहिरेपणावर उपचार होऊ शकतो, तसेच याच्यावर काही घरगुती उपाय देखील आहेत, तुळस व राई चे तेल तसेच राई चे तेल व धने, कांदा यांचा वापर करून आपण बहिरेपनावर उपचार करू शकतो.

कडुलिंबाचे तेल:-

आपल्या कानात कडुनिंबाचे तेल टाकल्याने ऐकण्याची क्षमता सुधारते. कपाशीच्या साहाय्याने दिवसातून तीन वेळा कडुनिंबाचे तेल कानात घाला. असे केल्याने त्वरित आराम मिळेल.

अश्वगंधा:-

ऐकण्याची क्षमता चांगली राहण्यासाठी नियमित अश्वगंधाचे सेवन करा. हे घेतल्यास ऐकण्याची क्षमता चांगली होते. गरम पाणी किंवा दुधासह अश्वगंधा पावडर घ्या. दररोज घेतल्यामुळे बहिरेपणा दूर होईल.

कांदा:-

कानात पांढरया कांद्याचा रस हि गुणकारी असतो. दुधात चिमुटभर हिंग टाका आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून त्याचे २ – ३ थेंब कानात टाका. लसणाच्या ७ – ८ पाकळ्या राई च्या तेलात गरम करा जो पर्यंत त्या पाकळ्या करपत नाही,

नंतर तो तेल गाळून घ्या व थंड झाल्यावर २ – ३ थेंब कानात टाका, एक चमचा बेलाच्या पानाचा रस व डालिंबाच्या पानाचा रस हे दोन्ही रस १०० ग्राम राई च्या तेलात उकळवा थंड झाल्यावर नियमितपणे हा रस कानात टाकल्याने आपल्याला याचे फायदे होतील. कानात डालचीनी चा तेल देखील बहिरेपणावर उपयोगी आहे.

टी ट्री ऑयल:-

चहाच्या झाडाचे तेल देखील ऐकण्याची क्षमता सुधारण्यास मदत करते. या तेलाच्या मदतीने बहिरेपणा नाहीसा होतो. बहिरेपणा झाल्यास, या तेलाने फक्त कानात मालिश करा आणि या तेलाचे काही थेंब कानात घाला. हे तेल कानात घातल्यास रक्त परिसंचरण सुधारते आणि श्रवणविषयक समस्या कमी होतात.

मोहरीचे तेल:-

मोहरीचे तेल कानासाठी चांगले मानले जाते आणि या तेलाच्या मदतीने कमी ऐकण्याच्या समस्येवर मात केली जाते. जर आपल्याला कमी ऐकण्याची समस्या असेल तर मध आणि मोहरीचे तेल मिसळा आणि दिवसातून दोन ते तीन वेळा त्याचे थेंब कानात टाका. ऐकण्याची क्षमता सुधारेल. याशिवाय तुम्ही कानात मोहरीचे तेल हलके गरम करून सुद्धा टाकू शकता.

आले:-

हिंगाचा मुगाएवढा खडा आणि लसणाच्या पाकळीचा चण्याएवढा तुकडा एका तलम सूती कापडात गुंडाळून रात्री झोपतांना कानात ठेवावा व सकाळी काढून टाकावा. ह्याने कानाच्या पडद्याला शेक मिळतो आणि त्यातील ओलसर दमटपणा नाहीसा होतो.

सर्दी ज्याप्रमाणे नाकातून पुढे कानात प्रवेश करते त्याच तत्वावर औषधी चिकित्सा करण्याचा मार्ग देखील नाकातूनच करावा. सर्दीमध्ये ज्याप्रमाणे नस्य चिकित्सा केली जाते, त्याचप्रमाणे षड्बिंदू तेल, पंचेंद्रियवर्धन तेल, अणु तेल ह्या तेलांचा उपयोग प्रकृती आणि लक्षणांनुसार करावा. पोटातून घेण्यासाठी नागगुटी, लक्ष्मीविलास, चित्रकहरीतकी अवलेह ह्यापैकी सुयोग्य औषधाची निवड करावी.

बहिरेपणा व्यतिरिक्त कानांच्या इतर समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी सर्वात प्रथम तुळसीच्या पानांना वाटून त्याचा काढा. त्यांनतर तुळसीच्या रसामध्ये कापुर मिसळून त्याला थोडे गरम करा. त्यानंतर या मिश्रणाचे काही थेंब आपल्या कानात टाका.

तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुळसीच्या रसाला हलके कोमट करूनही तो कानात टाकू शकता. अशाप्रकारे तुम्ही तुळसीच्या पानांनी थोड्याच दिवसात कानांच्या इतर समस्यासह बहिरेपणावर पण मात करु शकता.

बहिरेपणावर तुकसीच्या पानांचे हे उपचार अत्यंत प्रभावी मानले गेले आहेत. त्यामुळे तुम्हीही डॉक्टरांच्या उपचारांना कंटाळले असाल तर एकवेळ ही घरेलू उपचार पद्धती जरूर करून बघा.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *