आळूच्या पानांचे आश्यर्यकारक असे फायदे…लठ्ठ लोकांसाठी व मधुमेह रुग्णांनासाठी तर वरदान आहे आळूचे पान…जाणून घ्या फायदे

आळूच्या पानांचे आश्यर्यकारक असे फायदे…लठ्ठ लोकांसाठी व मधुमेह रुग्णांनासाठी तर वरदान आहे आळूचे पान…जाणून घ्या फायदे

पावसाळ्यात ताजी रानभाजी मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध असते. त्यापैकी अनेकांची आवडती रानभाजी म्हणजे अळू. अळूचे फदफदे, पंचमीला केली जाणारी आळूच्या पानाची भाजी ते अगदी कुरकुरीत अळूवड्या अशा विविध स्वरूपात अळू आहारात घेतला जातो. नैसर्गिकरित्या अळूला खाज असल्याने त्याचा आहारात समावेश करणे

आजकाल अनेकांना किचकटीचे वाटते. परंतू त्यामधील हे आरोग्यदायी गुणधर्म जाणून घेतल्यास त्याची चव चाखण्याचा मोह तुम्हांलाही आवरता येणार नाही. म्हणूनच आहारतज्ञ  कांचन पटवर्धन यांनी अळूचा आहारात समावेश करण्यामागील दिलेली ही ‘7’कारणं नक्की जाणून घ्या

हृदय निरोगी राहते:-

हृदय निरोगी ठेवते:-

हृदय शरीराच्या इतर अवयवांकडे रक्त पुरवठा करते. परंतु, जेव्हा चरबी जमा झाल्यामुळे या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात, तेव्हा शरीरातील रक्ताचा प्रवाह थांबतो. हे टाळण्यासाठी अरबी पाने खूप फायदेशीर असतात. या पानांत नायट्रेट असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो:-


उच्च रक्तदाब ग्रस्त असलेल्यांनी त्यांच्या आहारात अरबी पानांचा नियमित समावेश केला पाहिजे. यामध्ये चरबी अजिबात नसते आणि सोडियमचे प्रमाणही कमी असते. अरबीचे पान नियमितपणे खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित होतो.

दृष्टी सुधारते:-


या पानांमध्ये विविध प्रकारचे पौष्टिक घटक आढळतात. त्यात आढळणारी बीटा कॅरोटीन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. अरबीची पाने खाल्ल्याने दृष्टी वाढते. अरबी पानांमध्ये व्हिटामिन ए देखील आढळतो, जो डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे

रक्तातील साखर नियंत्रणात राहते;-


मधुमेह असलेल्या लोकांसाठी अरबी पाने फायदेशीर ठरतात. जीवनशैलीतील सुधारणेसह, दररोज अरबी पाने सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित केली जाते. यात प्रतिरोधक स्टार्च असतो, जो सहजपणे शरीरात शोषला जात नाही.

आयर्नची झीज भरून निघते:-

रक्ताच्या कमतरतेमुळे वाढणारा अ‍ॅनिमियाचा त्रास रोखण्यास अळू मदत करते. अळूमध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन सी उपलब्ध असल्याने आयर्न शोषून घेण्याची क्षमतादेखील सुधारते.

वजन कमी होते:-


लठ्ठपणा ही एक सामान्य समस्या आहे. जास्त तेलकट पदार्थांचे सेवन केल्याने शरीरात चरबी जमा होते. अरबी पानांमध्ये फारच कमी कॅलरी आढळतात. यात आहारातील फायबर देखील असते,

जे वजन कमी करण्यास मदत करते. विविध गुणांनी समृद्ध असल्याने, अरबी पाने शरीराच्या अनेक विकारांवर विजय मिळविण्यास मदत करतात. हे केवळ रक्तातील साखर नियंत्रित करतेच, परंतु डोळ्यांची दृष्टी देखील वाढवते.

अळूच्या पानांमध्ये फायबर घटक अधिक आणि कॅलरीज अत्यल्प प्रमाणात आढळतात. त्यामुळे हा अल्काईन स्वरूपाचा, थंड प्रवृत्तीचा आहे. यामुळे वजन घटवणार्‍यांच्या, मधुमेहीच्या च्या आहारात फायदेशीर ठरते. तसेच बद्धकोष्टता त्रास कमी करण्यास अत्यंत फायदेशीर आहे.

अळूच्या पानांमधून केवळ फायबरचा पुरवठा होतो. परंतू त्याच्या सोबतीला डाळीचा समवेश केल्यास प्रोटीन्सचादेखील पुरवठा होतो. त्यामुळे हे एक उत्तम आणि परिपूर्ण आहार बनते. अळूवडीतही बेसनाचा समावेश असल्याने त्या अधिक रूचकर आणि आरोग्यदायी बनतात.

परंतू अळूवडीचा उंडा वाफवल्यानंतर डीप फ्राय करण्याऐवजी शॅलो फ्राय करून बनवल्यास अधिक आरोग्यदायी होतो. तसेच फोडणीला अतिप्रमाणात तीळ लावून विनाकारण फॅट्सचे प्रमाण वाढवू नका. अळूवडीप्रमाणेच त्याची पातळ भाजी बनवता येऊ शकते. यामध्ये अळूची पानं डाळीसोबत शिजवून त्याचा आहारात समावेश करा.

अळूचा आहारात समावेश करताना कोणती काळजी घ्याल:-

अळूला नैसर्गिकरित्या खाज असल्याने तो स्वच्छ आणि नीट साफ करणे आवश्यक आहे. तसेच अळू अपुरा शिजवल्यास लूज मोशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तो योग्यरित्या शिजवा.

तसेच गाऊटच्या रुग्णांनी, युरिक अ‍ॅसिड अधिक प्रमाणात असलेल्यांनी अळू कमी खावा. तसेच काहींना अळूची अ‍ॅलर्जी असू शकते. त्यामुळे अळूवर ताव मारण्याआधी त्याची अ‍ॅलर्जी नाही याची खात्री करून घ्यावी.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *